युनिस खानचा विक्रम, ओलांडला 10 हजार धावांचा टप्पा
By admin | Published: April 24, 2017 07:04 AM2017-04-24T07:04:12+5:302017-04-24T07:08:53+5:30
वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खान
Next
>ऑनलाइन लोकमत
किंगस्टन, दि. 24 - वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खान याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने 10 हजार धावांचा टप्पा पार करुन पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम नोंदवला.
पाकिस्तानकडून यापूर्वी जावेद मियांदाद यांच्या नावे हा विक्रम होता. मियांदाद यांनी 8832 धावा केल्या होत्या. युनिसने अबूधाबी येथे इंग्लड विरुद्धच्या कसोटी सामन्यात हा विक्रम मोडला होता. 39 वर्षीय युनिसने आज चहापानानंतर रोस्टन चेसच्या चेंडूवर धाव घेत या विक्रमाला गवसनी घातली. जवळपास 53 च्या सरासरीने त्याने 208 व्या डावात हा टप्पा पार केला. आतापर्यंत 13 फलंदाजांनी दहा हजार धावा फटकावण्याची किमया साधली आहे.
दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाकिस्तानच्या 2 बाद 184 धावा झाल्या होत्या. बाबर आजम 78 तर युनिस 58 धावांवर खेळत होते. विंडिजने पहिल्या डावात 286 धावा केल्या आहेत.