युवा राष्ट्रकुल : भारतीय खेळाडूंची लक्षवेधी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:36 AM2017-07-20T04:36:52+5:302017-07-20T04:36:52+5:30

युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या ज्युडो स्पर्धेत भारतीयांनी चमकदार कामगिरी करताना एक सुवर्ण आणि ३ कांस्यपदकांची कमाई केली.

Youth Commonwealth: Indicative performance of Indian players | युवा राष्ट्रकुल : भारतीय खेळाडूंची लक्षवेधी कामगिरी

युवा राष्ट्रकुल : भारतीय खेळाडूंची लक्षवेधी कामगिरी

Next

नवी दिल्ली : युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या ज्युडो स्पर्धेत भारतीयांनी चमकदार कामगिरी करताना एक सुवर्ण आणि ३ कांस्यपदकांची कमाई केली.
हरियाणाच्या सोनीने ७३ किलो वजनी गटात एकहाती वर्चस्व राखताना आॅस्टे्रलियाच्या निकोलिच उरोसला नमवले. अंतिम सामन्यात सोनीने निकोलिचला १-० असे पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले. दुसरीकडे, आशिषने जेन प्रोसेर हॅरी याला १०-० असे लोळवून कांस्यपदकाची कमाई करताना शानदार कामगिरी केली. आशिषच्या दमदार खेळापुढे हॅरीलने सपशेल नांगी टाकली.
मुलींच्या गटात मध्य प्रदेशच्या अंतिम यादवनेही आपली चमक दाखवताना ४८ किलोगटात रेपचेसमध्ये बहामासच्या रसेल जास्मिनला २-० असा धक्का देत कांस्य पटकावले. अन्य एका लढतीत मणिपूरच्या रेबिना देवीने ५७ किलो वजनीगटात कांस्यपदकावर कब्जा केला. दरम्यान, युवा राष्ट्रकुलमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ज्युडो खेळामध्ये भारताने ४ पदकांची कमाई करताना अभिमानास्पद कामगिरी केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Youth Commonwealth: Indicative performance of Indian players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.