Youth Olympic Games 2018 : भारताची नेमबाज मेहुली घोषला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 08:35 PM2018-10-08T20:35:38+5:302018-10-08T20:40:23+5:30
Youth Olympic Games 2018: भारताच्या 18 वर्षीय नेमबाज मेहुली घोषने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल गटात रौप्यपदक जिंकले.
ब्युनोस आयरिस : भारताच्या 18 वर्षीय नेमबाज मेहुली घोषने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल गटात रौप्यपदक जिंकले. पात्रता फेरीत आघाडीवर असलेल्या मेहुलीने अंतिम फेरीत 248 गुणांची कमाई केली. 2018 वर्षातील तिचे हे तिसरे पदक ठरले. तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल सांघिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल अशा दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
Just in: India get 3rd Silver medal of Youth Olympic Games-2018 (Buenos Aires) via Mehuli Ghosh in 10m Air Rifle #YouthOlympics#BuenosAires2018pic.twitter.com/Ft67n9oZ7R
— India_AllSports (@India_AllSports) October 8, 2018
Many congratulations to @GhoshMehuli ! What a wonderful performance ! Congratulations to coach Suma and @Joydeep709 for their wonderful work. pic.twitter.com/jwhmBhMlit
— Abhinav Bindra OLY (@Abhinav_Bindra) October 8, 2018
महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम
भारताच्या 18 वर्षांखालील महिला संघाने युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात उरुग्वेचा 2-1 असा पराभव केला. 5 ए साईड हॉकी सामन्यात भारताकडून लाल्रेम्सियामीने ( 1 व 19 मि.) दोन्ही गोल केले. उरुग्वेकडून मॅगडलेना वेर्गा ( 10 मि. ) हीने एक गोल नोंदवला. भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रीयावर 4-2 असा विजय मिळवला होता.
Young forward Lalremsiami scores twice to help the Indian Under-18 Women's Hockey Team clinch their second victory at the 3rd Youth Olympics Buenos Aires 2018 against Uruguay on 8th October 2018. #IndiaKaGamepic.twitter.com/MrOenvOcY1
— Hockey India (@TheHockeyIndia) October 8, 2018