Youth Olympic Games 2018 : भारताच्या सुरज पनवारचे विक्रमी रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:40 PM2018-10-16T12:40:33+5:302018-10-16T12:42:49+5:30
Youth Olympic Games 2018: भारताच्या सुरज पनवारने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
ब्युनोस आयरिस : भारताच्या सुरज पनवारने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. त्याने दुसऱ्या टप्प्यात 20 मिनिटे 35.87 सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. नव्या नियमानुसार युवा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक प्रकारात स्पर्धकांना दोन वेळा सहभाग घ्यावा लागतो आणि त्यानंतर अव्वल तीन स्पर्धकांची निवड केली जाते.
India won their 1st medal in #Athletics at @BuenosAires2018 as #SurajPanwar won SILVER in the men’s 5000m race walk.🥈
— SAIMedia (@Media_SAI) October 16, 2018
Many congratulations to you, Suraj! 👏🏻🎉
It is India’s 11th medal at these #YouthOlympics.🇮🇳#IndiaAtYOG#SAI@afiindia#KheloIndia🏃♂️ pic.twitter.com/VQeFEQmUsT
17 वर्षीय पनवारने पहिल्या टप्प्यात 20 मिनिटे 23.30 सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान घेतले होते. पनवारने एकूण 40 मिनिटे 59.17 सेकंदाची वेळ नोंदवली. सात मिनिटांच्या फरकाने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इक्वेडोरच्या पॅटीन ऑस्करने 40 मिनिटे 51.86 सेकंदासह सुवर्णपदक नावावर केले, तर प्युओर्तो रिकोच्या जॅन मोरेयूने कांस्यपदक जिंकले.
Here’s India’s #MedalTally at the conclusion of events from yesterday at @BuenosAires2018. #SurajPanwar’s silver in men’s 5000m race walk pushed our medal tally to 11 & was our 1st #Athletics medal at these #YouthOlympics.#IndiaAtYOG#TeamIndia@youtholympics#KheloIndia🇮🇳 pic.twitter.com/Cj9wFkSHNZ
— SAIMedia (@Media_SAI) October 16, 2018
या स्पर्धेतील अॅथलेटिक्समधले भारताचे हे पहिलेच आणि एकंदर तिसरे पदक आहे. यापूर्वी अर्जुन ( थाळी फेक) आणि दुर्गेश कुमार ( 400 मीटर अडथळ्याची शर्यत) यांनी 2010 च्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
Suraj Panwar won India's first athletics medal of #BuenosAires2018 by claiming silver in the men's 5000m race walk
— IAAF (@iaaforg) October 16, 2018
He hopes that it will inspire the youth of India to strive hard to win a medal for their country too 🇮🇳 💫
Recap: https://t.co/ZU6FwmSJ4Npic.twitter.com/kKwXgzfFlG