Youth Olympic Games 2018 : प्रविण चित्रावेलने जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात 12 पदकं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 09:02 AM2018-10-17T09:02:35+5:302018-10-17T09:02:52+5:30

Youth Olympic Games 2018: भारताच्या प्रविण चित्रावेलने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मुलांच्या तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

Youth Olympic Games 2018: Praveen Chitravel bag bronze, 12 medals in India's account | Youth Olympic Games 2018 : प्रविण चित्रावेलने जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात 12 पदकं

Youth Olympic Games 2018 : प्रविण चित्रावेलने जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात 12 पदकं

Next

ब्युनोस आयरिस : भारताच्या प्रविण चित्रावेलने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मुलांच्या तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने दुसऱ्या टप्प्यात 15.68 मीटर उडी घेताना हे पदक निश्चित केले. युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे 12 वे पदक ठरले. भारताने एकूण 3 सुवर्ण, 8 रौप्य आणि 1 कांस्यपदकाची कमाई केली आहे.



प्रविणने पहिल्या टप्प्यात 15.84 मीटर उडी मारली होती आणि त्याने एकूण 31.52 मीटरची नोंद करताना हे पदक जिंकले. क्युबाच्या जॉर्डन फॉर्च्युन ( 34.18 मी.) आणि नायजेरियाच्या इनेह ओरीत्सेमेयीवा ( 31.85 मी. ) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.


 

पाहा व्हिडीओ

 

Web Title: Youth Olympic Games 2018: Praveen Chitravel bag bronze, 12 medals in India's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.