Youth Olympic Games 2018 : भारताच्या सिमरनला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 08:25 PM2018-10-14T20:25:11+5:302018-10-14T20:25:45+5:30
महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे पदक पटकावले आहे.
नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू सिमरनने युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली. महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे पदक पटकावले आहे.
Simran’s Silver medal was not only India’s first in #Wrestling at this @BuenosAires2018 but was also the 8th overall, thus equalling India’s previous best haul from 2010.
— SAIMedia (@Media_SAI) October 14, 2018
Our young champs have done us proud!👏🏻#IndiaAtYOG@youtholympics#SAI#TeamIndia#KheloIndia🇮🇳 pic.twitter.com/NGzaSVtYdG
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरनने अमेरिकेच्या इमिली शिल्सनला चांगली लढत दिली. पण अंतिम फेरीत सिमरनला विजय मिळवता आला नाही. इमिलीने सिमरनवर अंतिम फेरीत ११-६ असा विजय मिळवला आणि सुवर्णपदक पटकावले.