चुरशीच्या लढतीत प्रो कबड्डीचं विजेतेपद पटना पायरेटसकडे, अंतिम सामन्यात यू मुम्बाचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2016 10:52 PM2016-03-05T22:52:07+5:302016-03-06T00:05:04+5:30
पाटणा पायरेट्सने भक्कम पकडी व तुफानी चढाया असा अष्टपैलू खेळ केलेल्या गतविजेत्या यू मुंबाचा ३ गुणांनी पराजय करत चषक आपल्या नावे केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - तिसऱ्या मोसमातील प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यातील चुरशीच्या लढतीत पटना पायरेट्सने यू मुम्बाला हरवत प्रो कबड्डीची फायनल जिंकली आहे. सामन्याच्या सुरवातीलाच (यु मुम्बा 6- पाटणा पायरेट्स 15) पटना पायरेट्सने सामन्यात आघाडी घेतली होती.
पहिल्या सत्रात पाटानाकर खेळाडू पुर्णपणे मुंबईकरावर हवी झाले होते. पहिल्या सत्राचा खेळ संपला त्यावेळी पाटणा पायरेट्सचे १९ गुण तर यू मुम्बा ११ गुण होते. पण सामना जसा शेवटाकडे झुकला तशी यू मुम्बा- पाटणा पायरेट्स लढत रंगतदार स्थितीत आली. सामन्याच्या उत्तरार्धात यू मुम्बांच्या खेळाडूंनी मुसंडी मारत (पाटणा पायरेट्स २८ गुण तर यू मुम्बा २७ गुण) गुणांचे अंतर कमी केले होते.
पाटणा पायरेट्सने भक्कम पकडी व तुफानी चढाया असा अष्टपैलू खेळ केलेल्या गतविजेत्या यू मुंबाचा ३ गुणांनी पराजय करत चषक आपल्या नावे केला. गतविजेत्या यू मुंबाने उपांत्य सामन्यात बंगाल वॉरीयर्सचा ४१-२९ असा धुव्वा उडवून सलग तिसऱ्या मोसमात प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर पुणेरी पलटनला ४०-२१ने लोळवत पटना पायरेट्सने उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती.