युकी, सोमदेव, मिनेनी यांना ‘टॉप’ योजनेत आणणार : क्रीडामंत्री
By admin | Published: September 18, 2015 12:06 AM2015-09-18T00:06:06+5:302015-09-18T00:06:06+5:30
टेनिसपटू युकी भांबरी, सोमदेव देवबर्मन आणि साकेत मिनेनी यांना रियो आॅलिम्पिकसाठी असलेल्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत स्थान देण्यात येईल, अशी
नवी दिल्ली : टेनिसपटू युकी भांबरी, सोमदेव देवबर्मन आणि साकेत मिनेनी यांना रियो आॅलिम्पिकसाठी असलेल्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत स्थान देण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गुरुवारी दिली.
भारत आणि चेक प्रजासत्ताकदरम्यान येथे आयोजित डेव्हिस चषक प्ले आॅफ लढतीचा ड्रॉ काढल्यानंतर सोनोवाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, की आम्ही या तिन्ही खेळाडूंना टॉप योजनेत सहभागी करून घेऊ.
युकी सध्या देशाचा नंबर वन टेनिसपटू आहे. शांघाय चॅलेंजरच्या रूपात त्याने नुकताच चौथा चॅलेंजर किताब जिंकला. सोमदेव हा राष्ट्रकुल आणि आशियाडचा सुवर्ण विजेता आहे. मिनेनी हा डेव्हिड चषकात बोपन्नासोबत दुहेरीचा खेळाडू राहिला आहे. मंत्रालयाने मंगळवारी बॅडमिंटनमधील प्रसिद्ध दुहेरी
जोडी ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा यांना टॉप योजनेत सहभागी करून घेतले. (वृत्तसंस्था)