युवराजच्या "त्या" कृत्यामुळे पाकिस्तानी चाहते झाले फिदा
By Admin | Published: June 5, 2017 07:23 PM2017-06-05T19:23:20+5:302017-06-05T19:24:55+5:30
पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामाना म्हणजे मैदानातील युद्धच असते. या सामन्यात प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 : पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामाना म्हणजे मैदानातील युद्धच असते. या सामन्यात प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. अशावेळी दोन्ही संघातील खेळाडू अक्रमक होतात आणि स्लेजिंग होत. भारत-पाक सामन्यत आपण खूपवेळा स्लेजिंग पाहिलं असेल. हरभजन-शोयब अख्तर, गंभीर-आफ्रीदी, सेहवाग-अख्तर यांच्यातील स्लेजिंग तर जगजाहीर आहे. भारत-पाक हा सामना इतर सामन्यांच्या तुलनेत वेगळा असतो. या सामन्यात उभय संघाचे खेळाडू मोठ्या जबाबदारीने मैदानात खेळण्यासाठी उतरतात. खेळताना मैदानात अनेकदा खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्याही घटना घडतात. मात्र काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सामन्यात वेगळाच प्रसंग अनुभवायला मिळाला. पाकिस्तानचा गोलंदाज वाहब रियाज गोलंदाजी करत असताना स्ट्रेच आल्याने अचानक कोसळला. त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या युवराज सिंहने जवळ जाऊन त्याची विचारपूस करुन त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात अनेकदा खेळाडूंमधील खुन्नस दिसून येते. मात्र असे प्रसंग क्वचितच घडतात. या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकून सामनावीराचा मानकरी ठरलेल्या युवराजने पाकिस्तानी चाहत्यांचीही मनं जिंकली. भारताने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानचा भारताने 124 धावांनी पराभव करत विजय साजरा केला. या सामन्यात युवराजने वादळी खेळी करताना 32 चेंडूत 53 धावां करत संघाला मोठ्या धावसंख्या उभारण्यास मदत केली.