युवराज - धोनीची सर्वात मोठी भागीदारी
By admin | Published: January 19, 2017 05:43 PM2017-01-19T17:43:34+5:302017-01-19T18:11:58+5:30
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने शानदार फलंदाजी करत पुनरागमन केले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कटक, दि. 19 - इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने शानदार फलंदाजी करत पुनरागमन केले. त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संयमी फलंदाजी करत चागंली साथ दिली. युवराज-धोनी यांनी आपली वैयक्तिक शतक पुर्ण केली. पाच षटकात भारताचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर युवराज-धोनीने 38.2 षटकात 256 धावांची भागीदारी केली.
युवराज-धोनी जोडीच्या क्रिकेट करीयर मधील सर्वात मोठी भागीदारी आहे. 2011 नंतर दोघांध्ये झालेली ही पहिलीच शतकी भागीदारी आहे. कटक येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराज सिंगने धडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करत 14 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. युवराजने 98 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि 15 चौकारासह झंझावाती शतक पूर्ण केले. युवराज सिंगने आजच्या सामन्यात 127 चेंडूचा सामना करताना तीन षटकार आणि 21 चौकारासह 150 धावांची खेळी केली. तर, महेंद्रसिंग धोनीने 122 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार लगावत 134 धावांची खेळी केली. तसेच, या सामन्यात युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
दरम्यान, या दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लडला 382 धावांचे आव्हान दिले आहे.