युवराज-धोनीचे झंझावात, इंग्लंडपुढे 382 धावांचे आव्हान
By admin | Published: January 19, 2017 02:07 PM2017-01-19T14:07:31+5:302017-01-19T17:33:50+5:30
भारताने 50 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 381 धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंड संघाला विजयासाठी 382 धावांचे आव्हान देण्यात आले
Next
ऑनलाइन लोकमत
कटक दि. 19 - आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर चौथ्या विकेटसाठी अनुभवी जोडी युवराज-धोनीने 38.2 षटकात केलेल्या 256 धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने 50 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 381 धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंड संघाला विजयासाठी 382 धावांचे आव्हान देण्यात आले. इंग्लडकडून ख्रिस वोक्सने धारधार गोलंदाजी करताना भारतीय संघाची आघाडीची फळी उध्वस्त केली. वोक्सने दहा षटकात तीन षटके निर्धाव टाकताना चार बळी घेतले.
दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच वोक्सने लोकेश राहुल(5), कर्णधार विराट कोहली(8) आणि धवन(11) यांना स्वस्तात बाद करत भारताला अडचणीत आणले. 25 धावा फलकावर लागल्या असताना भारताचे तीन फलंदाज तंबूत गेले होते. मैदानावर असलेल्या अनुभवी युवराज-धोनी यांच्या जोडीवर संघाची मदार सर्वस्वी अवंलबून होती. युवराज-धोनी जोडीने सुरुवातीला सावध फलंदाजी करतनाच धावसंख्या हलती ठेवली. युवराजने 56 चेंडूत आपले अर्धशतक केले. त्यानंतर युवराज आधिक आक्रमक झाला. त्यानंतर त्याने इंग्लडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यावेळी युवाराज सिंगने 14 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. युवराजने 98 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि 15 चौकारासह शतक पुर्ण केले. युवराजने आपले वैयक्तित धावसंखेचा विक्रम देखिल मोडीत काढला. युवराजने 127 चेंडूचा सामना करताना तीन षटकार आणि 21 चौकारांसह 150 धावांची खेळी केली. यावेळी त्याने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
धोनीने युवराजला सुरेख साथ देत संयमी फलंदाजी करत आपले शतक केले. युवराज बाद झाल्यानंतर धोनीने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतं चौकार षटकारांची बरसात केली. धोनीने 122 चेंडूचा सामना करताना सहा षटकारासह 10 चौकार लगावत 134 धावांची खेळी केली. धोनीने शेवटच्या षटकात केदार जाधावसह(22) संघाची धावसंख्या वाढवली. केदारने आपल्या छोट्या खेळीत एक षटकार आणि तीन चौकार लगावले. धोनी-जाधव यांनी 18 चेंडूत झटपट 42 धावांची भागीदारी करत संघाती धावसंख्या वाढवली.
कटक सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. लियाम प्लंकेट याला इंग्लंडच्या संघात संधी देण्यात आली आहे. तर भारतीय संघात देखील उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमार याला संधी देण्यात आली आहे.