टी २० विश्वचषकातून युवराज आऊट, मनिष पांडे इन
By admin | Published: March 30, 2016 04:12 PM2016-03-30T16:12:32+5:302016-03-30T16:12:32+5:30
अष्टपैलू सिक्सर किंग युवराज दुखापतीमुळे टी २० विष्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेची संघात निवड करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - वेस्टइंडिज विरुद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्यापुर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू सिक्सर किंग युवराज दुखापतीमुळे टी २० विष्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेची संघात निवड करण्यात आली आहे. शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्द खेळताना त्याला झखम झाली होती.
युवराजच्या जागी अजिंक्य रहाणे किंवा पांडेला संधी मिळण्याची शक्यता आहे. ट्वेंटी-२0 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुध्द रविवारी झालेल्या सामन्यात युवराज सिंग धाव घेताना जखमी झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पोहचल्यानंतर लगेचच एमआरआय स्कॅनिंग करुन घेतले आहे. त्याची दुखापत जास्त असल्यामुळे बीसीसीआयने युवराजच्या जागी मनिष पांड्येची निवड केली आहे.
मात्र, संपूर्ण स्पर्धेत राखीव बेंचवर बसलेल्या रहाणेचे पारडे जड आहे.
दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार कप्तान महेंद्रसिंह धोनी युवराजच्या जागी पवन नेगीचा समावेश करण्याला पसंती दिली आहे. मात्र रवी शास्त्री अजिंक्य रहाणेला खेळवू इच्छित आहेत. युवराज सिंगला दुखापत झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने मनीष पांडेला बोलावल्यामुळे त्यालाच खेळवलं जाईल अशी माहिती मिळीली होती. विराट कोहलीनेदेखील मनीष पांडेलाच पसंती दिल्याचं कळत आहे.
सुरु असलेल्या या वादामुळे नेमकं कोणाला खेळवलं जाईल ? याबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचं दिसून येतं आहे. गुरुवारी 31 मार्चला वानखेडे मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सेमी फायनल सामना होणार आहे.