युवराजचं ऑस्ट्रेलियाच्या दौ-यात पुनरागमन
By admin | Published: December 19, 2015 07:27 PM2015-12-19T19:27:50+5:302015-12-19T19:27:50+5:30
ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारताचा एकदिवसीय सामन्यांचा व टी-२० सामन्यांचा संघ जाहीर झाला आहे. भारताचा धडाकेबाज व जिगरबाज फलंदाज युवराज सिंगचं टी-२० संघामध्ये
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारताचा एकदिवसीय सामन्यांचा व टी-२० सामन्यांचा संघ जाहीर झाला आहे. भारताचा धडाकेबाज व जिगरबाज फलंदाज युवराज सिंगचं टी-२० संघामध्ये पुनरागमन झाले असून, त्याची कामगिरी चमकदार झाल्यास येत्या टी-२- वर्ल्डकपमध्ये पुन्हा युवीची जादू बघायला मिळण्याची आशा आहे. रवींद्र जाडेजाचंही पुनरागमन झाले असून स्टुअर्ट बिन्नीला बसवण्यात आलं आहे. गुरुकिरत मान, रिषी धवन व बरिंदर सरीन या नव्या खेळाडुंना एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी देण्यात आली आहे.
नवीन खेळाडुंना संधी मिळेल व ते चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा संदीप पाटील यांनी व्यक्त केली असून, टी-२० वर्ल्ड कपसाठी हा दौरा म्हणजे चांगलाच सराव ठरेल असे ते म्हणाले. युवराज सिंगचं संघातील पुनरागमन ही आनंदाची बाब असून कप्तानासह सगळेच खेळाडू त्याच्यासह खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे पाटील म्हणाले.
ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ: महेंद्र सिंग ढोणी, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद शामी, अक्षर पटेल, गुरुकिरत मान, रिषी धवन आणि बरिंदर सरन
ऑस्ट्रेलिया दौ-यातील T-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: महेंद्र सिंग ढोणी, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद शामी, सुरेश रैना, हरभजन सिंग, एच पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा