युवराजचे खेळणे संदिग्ध, मनिष पांडेला पाचारण
By admin | Published: March 29, 2016 02:34 AM2016-03-29T02:34:30+5:302016-03-29T02:34:30+5:30
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग जखमी झाल्यामुळे त्याला पर्याय म्हणून कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेला पाचारण करण्यात आले आहे, युवराज जर तंदुरुस्त नाही झाला
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग जखमी झाल्यामुळे त्याला पर्याय म्हणून कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेला पाचारण करण्यात आले आहे, युवराज जर तंदुरुस्त नाही झाला तर त्याच्या जागी अजिंक्य रहाणे किंवा पांडेला संधी मिळण्याची शक्यता आहे.
ट्वेंटी-२0 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत मोहालीत आॅस्ट्रेलियाविरुध्द रविवारी झालेल्या सामन्यात युवराज सिंग धाव घेताना जखमी झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पोहचल्यानंतर लगेचच एमआरआय स्कॅनिंग करुन घेतले आहे. तो यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. संघाचा मेडीकल विभाग त्यासाठी परिश्रम घेत असून तो सेमीफायनल खेळेल असा त्यांना विश्वास आहे. तो फिट नाही झाला तर ३१ मार्चला वेस्ट इंडिजविरुध्द मुंबईत होणाऱ्या सेमीफायनलमध्ये रहाणे किंवा पांडेला संधी मिळेल. मात्र संपूर्ण स्पर्धेत राखीव बेंचवर बसलेल्या रहाणेचे पारडे जड आहे.