शब्दांच्या पिचवरही झहीरच फास्ट
By admin | Published: October 16, 2015 12:09 AM2015-10-16T00:09:31+5:302015-10-16T00:09:31+5:30
जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले
महेश चेमटे ल्ल मुंबई
जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘राम-राम’ ठोकल्यानंतर ‘लोकमत’शी त्याने खास संवाद साधला; तेव्हा तो बोलत होता.
भारताने २०११ साली जिंकलेल्या विश्वचषकात त्याचा सिंहाचा वाटा होता. दुखापतींनंतरही मिळवलेला ‘विश्वचषक’ या सर्व गोष्टींवर त्याने टाकलेला दृष्टीक्षेप. तो म्हणाला, प्रत्येक गोष्टीला आज ना उद्या थांबावे लागते. खुप विचार केल्यानंतर मी ठरवले, ‘होय, निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ आहे.’ हा निर्णय घेण्याआधी मी माझ्या कुटूंबियांना विचारले. माझ्या मित्रांचा म्हणजे सचिन तेंडूलकर, अजित आगरकर, आशिष नेहरा यांच्यासह सर्व मित्रांचा सल्ला घेतला. प्रशिक्षकांना जेव्हा सांगितले, मी निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. तेव्हा त्यांनी होकर दर्शविला. त्यांच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी हा निर्णय घेतला.
तुर्तास मी, क्रिकेट नंतर काय? याचा विचार केलेला नाही. आगामी आयपीलमध्ये मी खेळताना दिसेल. क्रिकेट वगळता अन्य गोष्टींचा विचार सध्या तरी नाही. भविष्यात क्लबच्या माध्यामातून मी क्रिकेटशी जोडलेला असेल. दुखापतींतून सावरल्यानंतर
मी टेनिस बॉलच्या साहाय्याने सरावास सुरुवात केली.
कौंटी क्रिकेटमुळे मी यशस्वी पुनरागमन करु शकलो. मला अनेक दिग्गज गोलंदाजांनी सल्ला दिला की, मी रनअप कमी करावा. त्यांच्या सल्ल्यानुसार
मी धावण्यात बदल केला. त्यामुळे मला स्वत:वर
नियंत्रण मिळवता आले.
शिवाय गोलंदाजीही भेदक
करता आली.
>> श्रीरामपूर ते भारतीय संघ या प्रवासात मी अनेक चांगले-वाईट अनुभव घेतले. एका गावातील मुलगा एक स्वप्न पाहतो, त्याचा पाठलाग करतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, असे काहीसे माझ्याबाबत बोलता येईल. रणजी सामन्याने मला खुप काही दिले. त्यावेळी सुधीर नाईक यांनी दिलेला सल्ला आज ही लक्षात आहे, ते म्हणाले, जहीर क्रिकेटचा गंभीरपण विचार कर. मस्करीत खेळणे वेगळे आणि खेळाची मस्करी करणे यात फरक आहे. त्या सल्ल्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळली.
>>भारताने विश्वचषक जिंकला तो दिवस आजही आठवतो. संपुर्ण स्टेडिअम प्रेक्षकांनी भरलेले. त्या आधी मोहालीमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला होता. वानखेडेवर उतरण्यापुर्वी आम्ही संगळ््यांनी आपले सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करायचे असे ठरवले. मैदानात ‘वंदे मातरम’ने वातावरणात भरलेला उत्साह या वातावरणात एक वेगळी उर्जा होती. अंतिम सामन्यासाठी कोणता दबाव नव्हता हे जरी खरे असले तरी आम्ही पुर्णपणे विश्रांती ही घेऊ शकत नव्हतो. अखेर तो क्षण आला आणि आम्ही विश्वचषकावर नाव कोरले.