झहीर आणि राहुल द्रविडचा फैसला होणार 22 जुलैला

By admin | Published: July 15, 2017 04:17 PM2017-07-15T16:17:34+5:302017-07-15T17:03:09+5:30

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवलेला नाही.

Zaheer and Rahul Dravid will decide on July 22 | झहीर आणि राहुल द्रविडचा फैसला होणार 22 जुलैला

झहीर आणि राहुल द्रविडचा फैसला होणार 22 जुलैला

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 15 - सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवला नसून, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट तूर्तास बासनात गुंडाळून ठेवले आहेत. सल्लागर समितीकडून सपोर्ट स्टाफमध्ये राहुल आणि झहीरची नावे सुचवण्यात आली आहेत पण मुख्य प्रशिक्षिक रवी शास्त्री यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे क्रिकेट प्रशासकांच्या समितीने स्पष्ट केले. येत्या 22 जुलैला झहीर आणि राहुल द्रविड संबंधी अंतिम निर्णय होईल. 
 
बीसीसीआयचे अध्यक्ष सीके खन्ना, अमिताभ चौधरी, डायना इडुलजी, राहुल जोहरी यांच्या समितीची 19 जुलैला बैठक होणार आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच आता सपोर्ट स्टापच्या निवडीवरुन पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. काल बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे दौरा विशेष असल्याचे स्पष्ट केले. 
 
त्यामुळे आता रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्रिर्मुर्तीने निवडलेल्या सहयोगी स्टाफवर प्रशासनिक समितीने (COA) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यामधून आपले हात काढत त्यांची निवड ही परदेश दौऱ्यासाठी असेल असे स्पष्ट केले. त्यामुळे तिमुर्तीने निवड केलेल्या सपोर्ट स्टापवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 
 
आणखी वाचा 
सचिन, सौरव आणि लक्ष्मण कोच निवडीच्या लायकीचे नाहीत - संदीप पाटील
2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा
झहीरची नियुक्ती फक्त विशेष दौऱ्यांसाठीच
 
गोलंदाजी कोच म्हणून शास्त्री यांची पसंती अरुण यांनाच होती. पण सीएसीने झहीरच्या नावाला संमती दिली. याचा अर्थ गोलंदाजी कोचची नेमणूक करतेवेळी सीएसीने शास्त्री यांना विश्वासात घेतले नसावे. पूर्णकालीन कोच म्हणून संघाला २५० दिवस देण्याची अट आहे. झहीर इतका वेळ देऊ शकणार नाही, असे कळते. झहीर १०० दिवसांच्या वर उपलब्ध राहणार नाही. इतकेच नव्हे तर झहीरच्या वेतनाचे पॅकेज अद्याप निश्चित झाले नाही.
 
गोलंदाजी प्रशिक्षकाऐवजी झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करावी अशी शास्त्रींची भूमिका आहे. झहीरकडे भरपूर माहिती आहे पण कोचिंगचा अनुभव नाही. झहीरच्या तुलनेत भारत अरुण यांच्याकडे गोलंदाजीतल्या ज्या तांत्रिक गोष्टी, बारकावे आहेत त्याचा अनुभव जास्त आहे असे शास्त्री यांचे मत आहे. झहीर संघाला वर्षातले 250 दिवस देऊ शकतो का ? ही शास्त्री यांना चिंता आहे. त्याने नेटमध्ये येऊन अरुण यांना सहाय्य करावे असे शास्त्री यांना वाटते.

Web Title: Zaheer and Rahul Dravid will decide on July 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.