T20 - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात झिम्बाम्बेचा भारतावर 2 धावांनी विजय
By Admin | Published: June 18, 2016 04:15 PM2016-06-18T16:15:51+5:302016-06-18T20:17:25+5:30
पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाम्बेने शेवटच्या चेंडूवर बाजी मारत भारतीय संघाचा 2 धावांनी पराभव केला आहे
>ऑनलाइन लोकमत -
हरारे, दि. 18 - वन-डे सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्विप केलेल्या भारतीय क्रिकेट संघाला टी-20 सामन्यांच्या मालिकेत मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाम्बेने 2 धावांनी भारताचा पराभव केला आहे.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघ जिंकेल अशी आशा असताना झिम्बाम्बेने बाजी मारली. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 171 धावाचं आव्हान ठेवलं होतं. एल्टन चिगुंबुराची अर्धशतकी खेळी करत 54 धावा केल्या.
भारतीय संघाला सुरुवातीलाच लोकेश राहुलची विकेट केल्याने धक्का बसला. एकही धाव न करता लोकेश राहूल तंबूत परतला. त्यानंतर संघाने संयमी खेळी केली. मनिष पांडेने 35 चेंडूत 48 धावा करत भारताला विजयाच्या जवळ नेलं. दोन धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतीय संघाची खेळी उत्तम चालली असताना अक्षर पटेलची विकेट पडली. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना बेस्ट फिनिशर धोनी स्ट्राईकवर होता. मात्र चेंडू सीमारेषेपार न गेल्याने भारताचा पराभव झाला आहे.