झिम्बाब्वे-अमिरात

By admin | Published: February 20, 2015 01:10 AM2015-02-20T01:10:23+5:302015-02-20T01:10:23+5:30

सीन विलियम्सचा झंझावात : यूएईवर चार गडी राखून मात

Zimbabwe-Emirate | झिम्बाब्वे-अमिरात

झिम्बाब्वे-अमिरात

Next
न विलियम्सचा झंझावात : यूएईवर चार गडी राखून मात
झिम्बाब्वे विजयी पथावर
नेल्सन : अनुभवी फलंदाज सीन विलियम्स याच्या शानदार ७६ धावांच्या बळावर झिम्बाब्वेने खडतर मार्ग काढून विश्वचषकात संयुक्त अरब अमिरात(यूएई) संघावर गुरुवारी चार गडी राखून मात केली. झिम्बाब्वेचा हा पहिला विजय आहे.
दोन कमकुवत संघांतील ही लढत यूएईच्या झुंजार खेळीमुळे अखेरपर्यंत रंगतदार ठरली. यूएईने फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ७ बाद २८५ धावा उभारल्या. वन डेतील ही त्यांची सवार्ेच्च खेळी होती. झिम्बाब्वेने ३३ व्या षटकापर्यंत अर्धा संघ गमविल्यानंतरही ६ बाद २८६ धावा असे लक्ष्य गाठले. विश्वचषकात त्यांनी गाठलेले हे सवार्ेच्च लक्ष्य होते. विलियम्सने कारकिर्दीत १८ वे अर्धशतक पूर्ण केले. क्रेग इर्विन याने ३२ चेंडूंवर ४२ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी करीत सामना खेचून आणला. याशिवाय ब्रेंडन टेलर ४७, सिकंदर रझा ४६ आणि रेगिस चकाबवा याने ३५ धावांचे योगदान दिले.
त्याआधी यूएईकडून कृष्णचंद्रणन ३४, खुर्रम खान ४५ आणि स्वप्नील पाटील ३२ यांनी धावसंख्येला आकार दिल्यानंतर पाकमध्ये जन्मलेल्या अन्वरने ५० चेंडूंवर ६७ धावा ठोकून कारकिर्दीतील सवार्ेच्च खेळी केली. झिम्बाब्वेकडून चताराने तीन बळी घेतले. झिम्बाब्वेचा अर्धा संघ बाद झाल्याने १५ षटकांत त्यांना विजयासाठी १०९ धावांची गरज होती. १९९६ नंतर दुसर्‍यांदा विश्वचषक खेळणार्‍या यूएईला सामना जिंकण्याची संधी चालून आली; पण विलियम्स-इर्विन यांनी त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
झिम्बाब्वेला पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. विलियम्सने सात चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Zimbabwe-Emirate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.