झिम्बाब्वे-हाँगकाँग; अफगाण-स्कॉटलंड यांच्यात सलामी
By admin | Published: March 7, 2016 11:29 PM2016-03-07T23:29:50+5:302016-03-07T23:29:50+5:30
आयसीसी टी-२० विश्वचषकाचा शुभारंभ आज मंगळवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये खेळविण्यात येणाऱ्या दोन पात्रता सामन्यांनी होत आहे. झिम्बाब्वे- हाँगकाँग आणि अफगाणिस्तान-स्कॉटलंड यांच्यात
नागपूर : आयसीसी टी-२० विश्वचषकाचा शुभारंभ आज मंगळवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये खेळविण्यात येणाऱ्या दोन पात्रता सामन्यांनी होत आहे. झिम्बाब्वे- हाँगकाँग आणि अफगाणिस्तान-स्कॉटलंड यांच्यात दुपारी ३, तसेच सायंकाळी ७.३० पासून ‘ब’ गटात सामने खेळले जातील.
पात्रता फेरीत आठ संघ झुंज देत असून, यातील अव्वल दोन संघ सुपर टेन संघांसोबत मुख्य फेरीत खेळणार आहेत. झिम्बाब्वेचा सध्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे हाँगकाँग अपसेट करण्याच्या इराद्याने खेळेल. २०१४ च्या पात्रता फेरीत या संघाने बांगलादेशचा पराभव केला होता. पण, मुख्य फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. आशिया कप पात्रता फेरीतही हा संघ पराभूत झाला होता. अफगाण संघ सलग चौथ्यांदा विश्वचषकासाठी तयार होत आहे. २०१४ मध्ये त्यांना पात्रता फेरीचा अडथळा दूर करणे अवघड गेले होते. अलीकडे आशिया चषकाची मुख्य फेरीदेखील गाठता आली नव्हती. झिम्बाब्वे आणि ओमानवरील मालिका विजयाने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. २०१५ मध्ये आयसीसी पात्रता स्पर्धेत हॉलंडसोबत संयुक्त विजेता राहिलेल्या स्कॉटलंडची टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याची ही तिसरी वेळ आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
> झिम्बाब्वे : हॅमिल्टन मस्कद्जा कर्णधार, सीन विलियम्स, तेंदई चतारा, वेलिंग्टन मस्कद्जा, तिनाशे पेनयंगारा, पीटर मूर, एल्टन चिगम्बुरा, सिकंदर बट्ट, रिचमंड,मुटुम्बामी, चामू चिभाभा, तेंदई चिसोरो, तवांदा मुपारिवा, माल्कम वॉलर, वुसुमुझी सिबांडा, डोनाल्ड तिरिपानो.
हाँगकाँग : तन्वीर अफझल कर्णधार, मार्क चापमन, हसीब अमजद, नदीम अहमद, जेम्स अटकिन्सन, तन्वीर अहमद, रेयॉन कॅम्बेल, वकास बरकत, बाबर हयात, ख्रिस्टोफर कार्टर, इजाज खान, निजाकत खान, अंशुमन रथ, वकास खान, किंचित शाह.
> अफगाणिस्तान : असगर स्तानिकजई कर्णधार, मोहम्मद शहजाद, नूर अली जरदान, उस्मान गनी, मोहम्मद नबी, करीम सादिक, शफिकउल्लाह, राशिद खान, आमीर हमजा, दावलत जरदान, शापूर जरदान, गुलबादिन नेब, समीउल्ला शेनवारी, नजिबुल्लाह जरदान, हामीद हसन.
स्कॉटलंड : प्रेस्टन मोमसेन कर्णधार, काईल कोएत्झर, अलासदेअर इव्हान्स, कॅलम मॅक्लॉईड, कोन डी लांगे, गॅविन माईन, जॉर्ज डेव्ही, मार्क वॅट, मॅट मॅकन, मॅथ्यू क्रॉस, मायकेल लियास्क, रिची बॅरिंग्टन, रॉब टेलर, सफियान शरीफ.