झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा, भारताची ‘क्लीन स्वीप’च्या दिशेने वाटचाल

By admin | Published: June 15, 2016 03:30 PM2016-06-15T15:30:23+5:302016-06-15T15:30:23+5:30

मालिकेत विजयी आघाडी घेणारा भारतीय संघाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा उडवला. ४२.२ षटकात झिम्बाब्वेच्या सर्व फलंदाजांना तंबूत धाडले

Zimbabwe's 123 runs in Khurda, India's move towards 'Clean sweep' | झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा, भारताची ‘क्लीन स्वीप’च्या दिशेने वाटचाल

झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा, भारताची ‘क्लीन स्वीप’च्या दिशेने वाटचाल

Next
>ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १५ : मालिकेत विजयी आघाडी घेणारा भारतीय संघाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा उडवला. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना ४२.२ षटकात झिम्बाब्वेच्या सर्व फलंदाजांना तंबूत धाडले. भारताने ३ सामन्याच्या मालिकेत आधीच २-१ ने आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून भारत झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याच्या तयारीत आहे. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी मागील २ सामन्याप्रमाणे याही सामन्यात फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजी पुढे त्यांना ५० षटकेही खेळता आली नाहीत. शिंबदाचा अपवाद वगळता एक फलंदाज फार वेळ मैदानावर टिकला नाही. 
झिम्बाब्वेकडून शिंबदाने ३८ धावांची खेळी केली. सलामीविर चामू चिभाभाने २७ धावांची खेळी केली पण त्याला मोठी खेली करण्यात अपयश आले. ग्रीम क्रेमर, तेंडाई चतारा, डाई चिसोरो, क्रेग इरविन, नेविले मेजिवा, तिमीके यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. 
भारताकडून जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४ फलंदाज बाद केले, तर चहलने २, पटेल आणि कुलक्रणीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करत चागंली गोलंदाजी केली. 
 

Web Title: Zimbabwe's 123 runs in Khurda, India's move towards 'Clean sweep'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.