झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक मालिका विजय

By admin | Published: July 10, 2017 05:40 PM2017-07-10T17:40:59+5:302017-07-10T19:57:24+5:30

एकदिवसीय क्रमवारीत तळाच्या संघांमध्ये असलेल्या झिम्बाब्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या

Zimbabwe's historic series victory over Sri Lanka | झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक मालिका विजय

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक मालिका विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
हंबानटोटा, दि. १० -  एकदिवसीय क्रमवारीत तळाच्या संघांमध्ये असलेल्या झिम्बाब्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने तीन गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या २०४ धावांच्या आव्हानाचा झिम्बाब्बेने ३९ व्या षटकात फडशा पाडला. या विजयाबरोबरच झिम्बाब्वेच्या संघाने एकदिवसीय मालिकेवर ३-२ अशा फरकाने कब्जा केला. झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्धचा हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. त्यातही या मालिकेपूर्वी झिम्बाब्वेने श्रीलंकेला श्रीलंकेत एकदाही नमवले नव्हते हे विषेश.   
श्रीलंकेने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हॅमिल्टन मसाकाद्झा (७३) आणि सोलोमोन  मिरे (४३) यांनी झिम्बाब्वेला झंझावाती सुरुवात करून दिली. त्यानंतर २४ व्या षटकात झिम्बाब्वेचा संघ १ बाद १३७ अशा सुस्थितीत होता. मात्र श्रीलंकन गोलंदाजांनी पलटवार केल्याने झिम्बाब्वेची अवस्था ७ बाद १७५ अशी झाली. तरी सिकंदर रझा आणि ग्रीम क्रेमर यांनी चिवटपणे खेळ करत झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला.  
 अधिक वाचा
( "लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा )
( Happy Birthday Little Master, तर सुनील गावसकरांना करावी लागली असती मासेमारी )
(सुनील गावसकर यांच्यासोेबत मृणालने घेतले डिनर) 
दरम्यान या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण  करण्याच्या निर्णय  झिम्बाब्वेने घेतला. त्यांच्या गोलंदाजांनीही भेदक मारा करत हा निर्णय सार्थ ठरवला. सिकंदर रझा आणि ग्रीम  क्रेमर यांच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजांना फार मोकळीक मिळाली नाही. अखेर धनुष्का गुणतिलका (५२) आणि अशेला गुणरत्ने (नाबाद ५९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने ५० षटकात ८ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली होती. 
श्रीलंका आणि झिम्बाब्वेमधील ही मालिका कमालीची अटीतटीची झाली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने तीनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत विजय मिळवला होता. त्यानंतर पुढचे दोन्ही सामने जिंकत श्रीलंकेने मालिकेत आघाडी घेतली होती. तर पावसाचा व्यत्यय आलेल्या चौथ्या लढतीत झिम्बाब्वेने डकवर्थ/लुईस-स्टर्न नियमानुसार विजय मिळवला होता. त्यामुळे आज झालेल्या निर्णायक लढतीकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. 

Web Title: Zimbabwe's historic series victory over Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.