हमखास डोकं तापवणारी, वाद पेटवणारी लावणारी १0 कारणं.

By admin | Published: January 8, 2015 08:54 PM2015-01-08T20:54:23+5:302015-01-08T20:54:23+5:30

मोबाईलवरचे सुरुवातीचे तासंतास बोलण्याचे दिवस संपले तरी ‘तासंतास’ बोलणं सुरुच राहतं. सुरुवातीचं बोलणं अर्थातच गुलूगुलू प्रेमाचं, हावरटासारखं खूप काही सांगण्याचं.

10 Reasons to Make Your Heart Feeling Smashy | हमखास डोकं तापवणारी, वाद पेटवणारी लावणारी १0 कारणं.

हमखास डोकं तापवणारी, वाद पेटवणारी लावणारी १0 कारणं.

Next
>भांडण
मोबाईलवरचे सुरुवातीचे तासंतास बोलण्याचे दिवस संपले तरी ‘तासंतास’ बोलणं सुरुच राहतं. सुरुवातीचं बोलणं अर्थातच गुलूगुलू प्रेमाचं, हावरटासारखं खूप काही सांगण्याचं.
हा ‘बोलक्या’ रोमान्सचा भर ओसरला की, मग मात्र भांडणं सुरू होतात, सतत होतात, रोजच्या रोज होतात, दिवसातून कितीदाही होतात! बोलण्याचा एकुण कालावधी तेवढाच असतो मात्र बोलण्यात प्रेम कमी आणि प्रश्न-खुलासे-आरोप-रुसवे आणि सॉरी हेच चक्र फिरतं!
मात्र का होतं असं?
कशामुळे होतात ही भांडणं?
कारणं काय त्यांची?
ही सारी पत्रं वाचताना ‘मोबाईल भांडणाची’ एक यादीच हाती लागते.
 
१) ‘तो’ सतत तासंतास ऑनलाईन असतो, व्हॉट्सअँपवर ‘ऑनलाईन’च, फेसबूकावर दिसतो, सतत गेम खेळतो, पण स्वत:हून फोन करत नाही, ‘तिनं’ केला तर उचलत नाही. मग  तिचं डोकं तापतं.
२) तो किंवा ती, कुणीतरी कितीदाही फोन केले तरी फोनच लवकर उचलत नाही. विचारलं तर काहीतरीच कारणं सांगतात, फोन बॅगेत होता, पॅण्टच्या खिशात सायलेण्टवर होता, कपाटात ठेवला, विसरुन गेलो.असं काहीही.
त्यावरुन सतत फोन करणारा हायपर होतो, सलग ५0-५0 वेळा कॉल मारत राहतो.परिणाम भांडण.
३) स्वत:हून फोन न करण्याचे सतत बहाणे सांगणं. मला रेंजच नव्हती, घरात रेंजच येत नाही, बॅटरीच डाऊन झाली, अशी कारणं म्हणजे हमखास भांडण.
४)आपल्या एसएमएसला उशीरा रिप्लाय येणं, न येणं,स्वत:हून एसएमएस न करणं.
५) आपल्या रोमॅण्टिक एसएमएसला कोरडे रिप्लाय देणं, किंवा काय चाललाय बावळटपणा असं म्हणणं.
६) खूप वेळ ‘तो’ किंवा ‘कती’ आपला कॉल वेटिंगवर ठेवत असेल, कधीही फोन करा, पलिकडचा फोन बिझीच, मग प्रश्नांची सरबत्ती, कोण एवढं महत्वाचं होतं, माझा कॉल वेटिंगवर दिसत नव्हता का, माझ्यापेक्षाही महत्वाचं कुणी आहे का? मुळात एवढं बोलतच काय होतास/होतीस.परिणाम, अविश्‍वास, चिडचिड भांडण.
७) व्हॉट्सअँपवरचा मॅसेज पाहिल्याच्या निळ्या खुणा दिसणं, तरीही माझा फोन बंद होता, बिझी आहे हे ऐकावं लागणं.
८) आपण केलेला फोन ‘कट’ करणं, किंवा उचलून सांगणं की, मी बिझी आहे, थोड्या वेळानं कॉल करीन पण  हे असं म्हणणं समोरच्याला अपमानास्पद वाटतं. थोडया वेळानं आलेल्या किंवा केलेल्या फोनवर भांडणंच मग.
९) परस्परांची कॉल हिस्ट्री चेक करणं, एसएमएस वाचणं, मोबाईल पासवर्ड न देणं, तो मागणं, यावरुन वाद.
१0) सतत फोनवर बोलणं, बोलत राहणं, तरीही पुन्हा पुन्हा फोन करणं, एकमेकांना बाकी काहीच सुचू न देणं, आणि तरीही तू माझ्याशी बोलतच नाही आजकाल असं म्हणणं.
------------------
पत्रांच्या ढिगार्‍यातून  एक ‘बोलकं’पत्र कोरड्या शब्दांतलं लव्ह
 
तिचा फेस पाहण्यासाठी धडपडणारा मी तिला रोज फेसबूकवर पाहायला लागलो. ती सतत व्हॉट्सअँपवर भेटायला लागली. पूर्वी तिला भेटण्यासाठी मी शब्दांचे भांडार गोळा करायचो, ठरवून बोलायचो. प्रत्यक्ष भेटायचो. मिस करतोय, हे सांगायला मिसकॉलची गरज नव्हती. न बोलताही बोलणं व्हायचं. 
आता तसं होत नाही. तिच्याशी बोलताना मी हरवतोही काही क्षणासाठी पण तेवढय़ात तो मोबाईल कामासाठी वाजतो. भेट अर्धवट सोडून मी काम पूर्ण करायला निघतो. आजकाल आमच्या प्रत्यक्षातल्या खूप  भेटी अशा अर्धवटच होऊ लागल्या आहे. व्हॉट्स अँपवर भेट असं म्हणत मी निघतो.  तिथं भेटलं की, सॉरी म्हणून पुन्हा बोलायला लागायचं. पण नुस्ते शब्दच. तसं बोलणं काही होतच नाही. ‘मिस यू अ लॉट’ या शब्दामागची भावना तिच्यापर्यंत पोहचत नाही इतके ते कोरडे झाले आहेत. मग भांडणंही तिथंच होतात. डोकी तापतात.  नातं फुलण्यासाठी संवाद, वेळ व स्पर्श हवा असतो हे कळतं, पण तरी तसं काही आज आमच्या नात्यात उरलेलं नाही..
ते आमच्याचमुळे, आमच्या मोबाईलमुळे. 
 
-याद से एसएसजे

Web Title: 10 Reasons to Make Your Heart Feeling Smashy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.