जागा ६९ प्रवेश शुल्कापोटी जमले १९ कोटी २५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 08:53 AM2018-02-22T08:53:33+5:302018-02-22T08:53:56+5:30

राज्यसेवा परीक्षेचा विचार केल्यास बड्या क्लासेसमध्ये प्रत्येक तुकडीत ३००हून अधिक विद्यार्थी असतात. त्यामुळे एका क्लासेसच्या विद्यार्थ्यांची संख्या १००० ते १२०० इतकी असते. ८ ते ९ महिने एक बॅच चालते

19 crore 25 lakhs collected from the entrance fees | जागा ६९ प्रवेश शुल्कापोटी जमले १९ कोटी २५ लाख

जागा ६९ प्रवेश शुल्कापोटी जमले १९ कोटी २५ लाख

googlenewsNext

- गजानन दिवाण

हजारो मुलं गुणिले हजारो रुपये

* प्रत्येक क्लासचं पॅकेज वेगळं. त्याप्रमाणे मुलं पैसे भरतात. पॅकेज निवडतात. मग पॅकेजप्रमाणे क्लासवाले त्यांच्या तुकड्या अर्थात बॅचेस करतात. क्लासच्या क्षमतेनुसार साधारणपणे क्षमतेनुसार तीन ते चार तुकड्या केल्या जातात. दिवसभरात काहीजणांना पूर्ण क्लास असतो, काहींना विशिष्ट वेळी बॅच असते. पॅकेज तशी बॅच.
* राज्यसेवा परीक्षेचा विचार केल्यास बड्या क्लासेसमध्ये प्रत्येक तुकडीत ३००हून अधिक विद्यार्थी असतात. त्यामुळे एका क्लासेसच्या विद्यार्थ्यांची संख्या १००० ते १२०० इतकी असते. ८ ते ९ महिने एक बॅच चालते.
* सराव परीक्षांसाठी दीड ते दोन हजार रु पये काही क्लास वेगळे आकारतात. या परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
* वेगवेगळ्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज, मुलाखतींची तयारी असे वर्ग फक्तकाही मुलं करतात. त्याचे वेगळे पैसे मोजावे लागतात.

पुण्यातून ‘अटेम्प्ट’ द्यायचाय? - वर्षाला किमान दीड लाख !

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया एका विद्यार्थ्याला करावा लागणारा किमान खर्च.
कोचिंग क्लास -४० ते ८० हजार रुपये.
घरभाडे -२००० ते २५०० रुपये
खानावळ - २२०० ते २५०० रुपये
अभ्यासिका - ५०० ते १२०० रुपये
चहा-नास्ता - १००० रुपये किमान
वृत्तपत्र, मासिके, इतर पुस्तके - १००० रु पये
इतर खर्च- ५०० ते १००० रु पये
वर्षभराचा खर्च - किमान १.५ लाख रुपये फक्त


पुण्यातल्या पेठांना सुगीचे दिवस
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया लाखो विद्यार्थ्यांमुळं पुण्यातील विशेषत: पेठांमधील अर्थव्यवस्थेला बळ मिळालं आहे. आता शहराच्या पेठांमधील क्लास, अभ्यासिका, भाड्याने मिळणारी घरं हाऊसफुल्ल असल्यानं उपनगरांकडं विद्यार्थ्यांची पावलं मोठ्या प्रमाणात वळू लागली आहेत. जिथं क्लास, अभ्यासिका आहेत त्याच भागात जवळपास हे विद्यार्थी जागा शोधतात. प्रवास खर्च आणि पुण्याच्या ट्राफिकमध्ये वाया जाणारा वेळ वाचावा म्हणून जवळपास जागा शोधतात. त्या भागातील चहाची दुकानं, छोटी हॉटेल्स, नास्ता विक्री करणारे खानावळी, स्टेशनरी-भुसार दुकानं यांची कमाई बºयापैकी या मुलांच्याच कृपेनं चालते. पुस्तकांची दुकानं, वसतिगृह, क्लासेस, अभ्यासिकांना मिळणारं उत्पन्न तर लाखोंच्या घरात आहेच. एक मोठं अर्थचक्र या स्पर्धा परीक्षांमुळे चालताना दिसतं. मग या मुलांना वास्तव कोण कशाला सांगेल? त्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर असला तरी अनेकांचं वर्तमान आणि भवितव्य त्यांच्या पैशावर पोसलं जातं आहे.

छोट्या मोठ्या खासगी क्लाससेचं पॅकेज
राज्यसेवा परीक्षेची तयारी - ४० ते ८० हजार रुपये
इतर अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी - २५ ते ४० हजार रुपये
प्रत्येक विषयनिहाय मार्गदर्शन - ४ ते ६ हजार
यूपीएससी परीक्षेची तयारी - ८० ते १ लाखभर रुपये.


१९ परीक्षांची परीक्षा
दरवर्षी एमपीएससीद्वारे नागरी प्रशासनाचा गट अ व गट ब या श्रेणीच्या पदांसाठी एक परीक्षा घेतली जाते. यात प्रशासनातील जवळजवळ १९ पदांसाठी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यांत होते.
एमपीएससीद्वारा भरली जाणारी पदे - १) उपजिल्हाधिकारी २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त ३) सहायक विक्रीकर आयुक्त ४) उपनिबंधक सहकारी संस्था ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकार ६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ७) मुख्याधिकारी, नगरपालिका/ परिषद, ८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ९) तहसीलदार १०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा १२) कक्ष अधिकारी १३) गटविकास अधिकारी १४) मुख्याधिकारी नगरपालिका, १५) सहायक निबंधक सहकारी संस्था १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख १७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आणि १९) नायब तहसीलदार

आयोगाची करोडोंची कमाई
* एमपीएससीची एकच परीक्षा नसते. या परीक्षेंतर्गत विविध विभागांच्या विविध परीक्षा देतात. कुठंतरी चान्स लागेल या आशेनं मुलं अनेक परीक्षा देतात. एकाच अभ्यासात अनेक परीक्षा असं चक्र त्यांना सोयीचं वाटतं.
* पण प्रत्येक परीक्षेसाठी शुल्क वेगळं मोजावं लागतं. म्हणजे परीक्षेचा अर्ज भरायलाही पैसे लागतात. प्रत्येक परीक्षेचा अर्ज वेगळा, त्यासाठीचं शुल्क वेगळं.
* खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ५५० रुपये परीक्षा शुल्क असतं तर आरक्षित गटांसाठी ४५० रुपये शुल्क मोजावं लागतं.
* मुख्य परीक्षेसाठीचं शुल्क वेगळं द्यावं लागतं.
* मागच्या वर्षी आयोगानं १३० पदांची भरती केली. त्यासाठी प्राप्त अर्जाच्या शुल्कांपोटी आयोगाला अंदाजे १० कोटी ६४ लाख ४३ हजार १५० रुपये मिळाले.
* आयोगानं २९ डिसेंबर २०१७ रोजी राज्यसेवेच्या ६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. या जागांच्या पूर्व परीक्षेसाठी तब्बल तीन लाख ५० हजारांपेक्षा जास्त अर्ज आले. त्या शुल्कापोटी सरासरी १९ कोटी २५ लाख रुपये एवढी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली.

औरंगाबादचा खर्चही किमान लाखभर रुपये
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ज्यांना पुणं गाठता येत नाही ते अनेकजण औरंगाबादला येतात. औरंगाबादला कोचिंग क्लासची फी असते ३० ते ४० हजार रुपये. एक बॅच साधारण ८ ते १० महिन्यांची असते. एका बॅचची फी भरल्यानंतर तो विद्यार्थी परीक्षेत अयशस्वी झाला तर पुढील बॅचलाही त्याला काही क्लासवाले मोफत प्रवेश देतात. बाकी राहण्याचा खर्च, दोनवेळचं जेवण, चहा, नास्ता, प्रवास यापायी महिन्याला काटकसरीचे का होईना पाच हजार रुपये तरी लागतात.
लाखभर रुपयांची सोय केल्याशिवाय या मुलांना औरंगाबाद गाठता येत नाही.

फाउण्डेशनचं फॅड
हल्ली फाउण्डेशन नावाचा एक नवा कोर्सही अनेक क्लासेसवाले घेत आहेत. बारावीनंतरच मुलं स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात. त्याला फाउण्डेशन म्हणतात. त्यासाठीची फी २० हजार ते ५० हजार रुपये असते.

Web Title: 19 crore 25 lakhs collected from the entrance fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.