उधार, उसनवार, कॉपी-पेस्ट! ती वाट सोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 06:50 AM2020-01-09T06:50:00+5:302020-01-09T06:50:01+5:30

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

2020 - life's 20-20 - Atul Deulgavakar shares what he would like to share with his 20-year-old-self | उधार, उसनवार, कॉपी-पेस्ट! ती वाट सोड!

उधार, उसनवार, कॉपी-पेस्ट! ती वाट सोड!

Next
ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- अतुल देऊळगावकर

अतुल.
हे जागतिकीकरणाचं जग आहे. विश्व आपल्या हातात आहे; पण मेंदूत नाहीये. आपण फक्त उपकरणांनी आधुनिक झालो आहोत, मानसिकतेत ती आधुनिकता नाहीये. वैश्विक गाभा आपल्याला गवसलेलाच नाही.
1981 साली आलेलं थर्ड वेव्ह नावाचं ऑल्विन टॉफ्लरचं पुस्तक आहे, ते जमलं तर वाच. तंत्रज्ञान आणि गांधी विचार यांची सांगड घालायला पाहिजे. विचार वैश्विक व्हायला पाहिजे. नेमकं त्याच काळात फक्त स्व-प्रतिसादात रमतो आहेस तू.
तो घात आहे. अडथळा आहे. कुटुंब, समाज, देश, जग सगळ्यांच्याच वाटेतला अडथळा आहे.
विचार कर की, हा अडथळा तोडण्यासाठी मी काय करायला हवं?
तुझ्या ‘मी’ भोवतीची वेलांटी फार घट्ट व्हायला लागली आहे ती सोडव, सैल कर ते पेच. विचार स्वतर्‍ला, मला कळतंय का ग्रेटाचं काय चाललंय ते? ब्राझीलमध्ये धडधडून पेटलेलं जंगल मला दिसतंय का?
होतोय का संवाद त्या जगाशी?
तुला सांगतो, विसावं वय असं असतं, ज्या वयात वेगळी संस्कृती तयार करतो आपण. ती तशी संस्कृती तयार करणं हेच विसाव्या वर्षीचं खरं आव्हानही आहे. परंपरेतून काय घ्यायचं आणि काय टाकायचं, आधुनिकतेतून काय घ्यायचं आणि काय टाकायचं, हे समजून निवडलं पाहिजे. एकत्र गुंफलं पाहिजे. ते आपण करतोय का?
ते करण्यासाठी प्रय} कर.
ते केलं तर तुझी अभिव्यक्ती अधिक सुंदर, सशक्त होत जाईल. आज सगळीकडे जी अभिव्यक्ती दिसते ती उधार, उसनवार, कॉपी-पेस्ट दिसते. 
ती वाट सोड, अधिक वैश्विक हो. आपलं करिअर, विचार, अभिव्यक्ती, आधुनिकता आणि पारंपरिकता यांची सांगड सोपी केली तर जगणं अधिक सशक्त होत जाईल.
हे आव्हान आहे तुझ्यासमोर.
सांग, स्वीकारतोस का?


( सुप्रसिद्ध पर्यावरणविषयक लेखक)


 

Web Title: 2020 - life's 20-20 - Atul Deulgavakar shares what he would like to share with his 20-year-old-self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.