आयुष्यात सगळ्याच गोष्टी फार गंभीरपणे घेऊ नयेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:55 AM2020-01-09T07:55:05+5:302020-01-09T08:00:16+5:30

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

2020 - life's 20-20 - Cricketer Sanjay Manjrekar shares what he would like to share with his 20-year-old-self | आयुष्यात सगळ्याच गोष्टी फार गंभीरपणे घेऊ नयेत!

आयुष्यात सगळ्याच गोष्टी फार गंभीरपणे घेऊ नयेत!

Next
ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- संजय मांजरेकर, 

संजय.
पहिले तर ना एक कर, रिलॅक्स.
जरा रिलॅक्स हो.  ते म्हणतात ना, जरा चील राहा, बिनधास्त राहा, तर ते कर! आयुष्यात सगळ्याच गोष्टी खूप जास्त गंभीरपणे घेण्याची गरज नसते. आपल्या यशाचा आणि त्याचबरोबर त्या प्रवासाचा किंवा प्रक्रियेचा (प्रोसेस) आनंद घ्यायला शिकायला हवं.
आणि अजून एक, जरा आपल्या वजनाकडे आणि फिटनेसकडे जास्त लक्ष दे. मला माहितीये तुझं खेळताना सगळं लक्ष कौशल्याकडे (स्किल्स) होतं. तंत्र आणि कौशल्य ते फार महत्त्वाचं आहेच तुझ्यासाठी; पण ते करताना फिटनेसकडे मात्र हवं तेवढं लक्ष दिलं नाहीस. ते दे. क्रि केट सोडून तुला काही आयुष्यच नाही, काही मजाच केली नाहीस. पण ऐक, सकाळी तू ग्राउंडवर मेहनत घेत असशील तर संध्याकाळी थोडी मजा करायला काही हरकत नाही. थोडं बाहेर फिरायला जा.  त्यामुळे जरा रीचार्ज व्हायला मदत होते.
क्रिकेटविषयीच बोलायचं तर,  कसोटी क्रिकेट हे महत्त्वाचंच आहे. मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण आज आपण क्रिकेटचे तीन प्रकार पाहतो. त्यानुसार खेळाचा विकास करणंही महत्त्वाचं आहे. कसोटी क्रिकेट महत्त्वाचं आहेच, पण सध्या सुरू असलेला  पॉवर गेमही महत्त्वाचा आहे. चेंडू उचलून मारलास आणि हवेत उडाला म्हणून शिक्षा होते हे आठवतं तुला, पण तो आता तो काळ राहिलेला नाही, गेम बदलला.
क्रिकेटमध्ये करिअर करायचं तर अजून एक गोष्ट कर. खेळ बदलला आता, त्यामुळे तू एका एजंटची निवड कर. खेळाडूंना एजंट वगैरे असण्याचा काळ नव्हता एकेकाळी मला मान्य आहे. पण त्यामुळे  अनेकदा आपल्याला नेमकं  काय करायचं हे समजतच नाही. एक चांगला एजंट सोबत हवा, तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. क्रिकेट व्यतिरिक्त ज्या अन्य गोष्टी असतील त्या एजंटला सांभाळू दे.   प्रोफेशनल एजन्सीबरोबर काम केलं तर बरेच प्रश्न सुटू शकतात. तेव्हा नव्या जगाचं हे नवंपणही स्वीकार.
मुळात खेळाचं सारं कल्चरच बदललं. कमर्शिअल गोष्टी वाढल्या आहेत, हे समजून घ्यावंच लागेल.  जे काही बदल झाले आहेत ते प्रभावीपणे समजून घ्यायला हवेत. त्यांचा त्नास होता कामा नये किंवा त्यामुळे आपल्या वाटेत कोणतेही अडथळेही येता कामा नयेत. 
जे आपल्याला आवडत नाही ते सारं आपल्यासाठी बदलेल असा जर विचार करणार असशील तर लक्षात ठेव, तसं काहीही होणार नाही. जी काही खेळसंस्कृती बदललेली आहे ती आत्मसात कशी करून घेता येईल, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरेल.
सध्या ट्वेन्टी-20 क्रि केट चांगलंच प्रसिद्ध होतं आहे, त्यासाठी आपल्या खेळामध्ये सुधारणा करणं तुझ्यासाठी महत्त्वाचं ठरेल. या सार्‍या गोष्टींबाबत तुम्ही लवचीक किंवा परिवर्तनशील अर्थात फ्लेक्झिबल असायला हवं. हे बदल एकेकाळी जरा हळूहळू होत होते. 
बघ ना, 1877 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला, त्यानंतर 1975 साली 60 षट्कांचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक खेळवला गेला. किती हळू झाले हे बदल. आता क्रिकेटमध्ये फटाफट बदल होतात. त्या वेगाकडे जरा लक्ष ठेव.
एकेकाळी सुट्टी असली की, सकाळी 9.30 वाजता खाली खेळायला जायचो आणि फक्त जेवायला घरी यायचो. कितीही काही खाल्लं तरी वजन वाढायचं नाही. खेळणं खूप व्हायचं. लोकांशी तेव्हाच खूप गप्पा व्हायच्या. जिंकणं-हरणं सुरू होतंच, भांडणंही व्हायची; पण ती  कशी सोडवायची, हे आपलं आपण शिकता यायचं. कुठल्या गोष्टीवर कसा मार्ग काढायचा, हे शिकता यायचं. 
 स्वतर्‍हून शिकणं असा हा मार्ग होता. हल्ली शिकणं बंद आणि अमुक कर हे सांगणं जास्त असं जरा होताना दिसतं आहे. स्वतर्‍हून झटपट विचार करणं किंवा निर्णय घेणं, महत्त्वाचं आहे. ते सोडू नकोस. तंत्रज्ञानाचा परिणाम आपल्या मानसिक-शारीरिक ताणावर आणि आरोग्यावर कसा होतो हे पण जरा बारकाईने बघ.
आणि स्वतर्‍च शिकत राहा. शिकत राहा कायम. 


(तंत्राचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला एकेकाळचा आघाडीचा माजी क्रिकेटपटू. आणि आता ख्यातनाम समालोचक आणि स्तंभलेखक)

Web Title: 2020 - life's 20-20 - Cricketer Sanjay Manjrekar shares what he would like to share with his 20-year-old-self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.