लिव्ह इच मोमेंट ऑफ युवर लाइफ! लिव्ह इट फुलेस्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:45 AM2020-01-09T07:45:00+5:302020-01-09T07:45:02+5:30
माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक
- राजदीप सरदेसाई
राजदीप.
रिलॅक्स! डोन्ट ओव्हरथिंक.
उद्या काय होईल? परवा काय? 10 वर्षानंतर काय? वीस वर्षानंतर काय? तीस-चाळीस वर्षानंतर काय होईल?
कशाला एवढा विचार करतोस?
हे ओव्हर थिंकिंग थांबव. त्यातून आजचं जगणं हातातून सुटून जातं.
लिव्ह इच मोमेंट ऑफ युवर लाइफ! लिव्ह इट फुलेस्ट! जगून घे. प्रत्येक क्षणात किती आनंद आहे ते पाहा. मी कुठं जाईन, कुठं पोहोचेन, याचा इतका विचार करायलाच हवा का? किती विचार करशील? थांब जरा.
आणि अजून एक गोष्ट.
आताच लॉ करून आलास ना तू? सहा महिनेच झालेत हायकोर्टात जाऊन प्रॅक्टिस सुरू करून.
मान्य आहे की ते तुला आवडत नाही; पण जरा थांब.
करून बघ, जरा कळ काढ, काय सांगावं कदाचित तुला आवडेलही ते.
नाहीच आवडलं तर सोडून दे.
पण घाई करू नकोस!
मान्य आहे की, वयाच्या विशीत फार प्रेशर्स असतात, फार अपेक्षा असतात पालकांच्याही, स्वतर्च्याही. मात्र त्याचं ओझं स्वतर्च्या मनावर घेऊ नकोस. हेच वय असतं ज्या वयात मनात काही धारणा पूर्ण नसतात, पैसे किती मिळतील, हा प्रश्न तर मनात नसतो. मनासारखं काम करायचं असतं.
तू तुझा मार्ग निवडलासच. तेव्हा नाऊ चेझ युवर ड्रिम्स.
मात्र ओव्हर थिंकिंग करायची सवय तेवढी सोड.
(ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार)