2019 गाजवतील अशी 25 टॉप स्किल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 06:00 AM2019-02-07T06:00:00+5:302019-02-07T06:00:06+5:30

लिंकडीन या व्यावसायिक नेटवर्किग साइटच्या मते 2019 या वर्षात ज्यांना मागणी असेल अशी ही 25 कौशल्यं

25 Top Skills in 2019 | 2019 गाजवतील अशी 25 टॉप स्किल्स

2019 गाजवतील अशी 25 टॉप स्किल्स

Next
ठळक मुद्देएक नजर टाका, नव्या जगात आपण कुठं आहोत, याची एक झलक नक्की दिसेल!

- निशांत महाजन

लिंकडीन हे व्यावसायिक प्रोफेशनल नेटवर्क चं सध्याचं मोठं व्यासपीठ आहे. अनेकजण प्रोफेशनल वाटचालीसाठी लिंकडीनचा प्रभावी वापर करतात. त्यांनी अलीकडेच एक डेटा प्रसिद्ध केला. 2019 मध्ये नोकरी देताना कंपनी व्यवस्थापन कोणत्या कौशल्यांना अधिक महत्त्व देतील हे सांगत 25 कौशल्यांची एक यादीही प्रसिद्धी केली. हार्ड आणि सॉफ्ट स्किल्स दोन्हींना महत्त्व असून, त्याहीपेक्षा जास्त महत्त्व क्रिएटिव्हिटीला असेल असं हा डेटा म्हणतो. त्यातही सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व हा अभ्यास अधोरेखित करतो. 57 टक्के व्यावसायिक नेतृत्वाला वाटतं की प्रत्यक्ष कामाच्या कौशल्यांपेक्षा ( हार्ड स्किल) सॉफ्ट स्किल्स अधिक महत्त्वाची आहेत.

त्यानुसार त्यांनी 5 महत्त्वाची सॉफ्ट स्किल्स सांगितली आहेत. आणि 20 हार्ड स्किल्सही. त्यावर एक नजर टाका, नव्या जगात आपण कुठं आहोत, याची एक झलक नक्की दिसेल!

5 टॉप सॉफ्ट स्किल्स

 

1. सृजनशीलता

माणसांना सुचलेल्या कल्पनांची उत्तम अंमलबजावणी करायला आता रोबोट सक्षम आहेत. मात्र त्यांना कल्पना सुचत नाहीत. त्यामुळे ज्यांना नवनव्या कल्पना सुचतील अशा कल्पक माणसांची यापुढे व्यवस्थापनांना गरज असेल.

2. मन वळवण्याची क्षमता

कितीही उत्तम कल्पना सुचली, कितीही उत्तम प्रॉडक्ट असलं तरी लोकांना ती कल्पकता स्वीकारणं, त्यासाठी पैसा उभारण्यासाठी मन वळवणं ही दुसरी क्षमता, ती अंगी हवी.

3. सहकार्य

नवीन काळात काम वाढतं, माणसंच नाही तर यंत्रही प्रोजेक्टशी जोडली जातात, त्या सार्‍यांशी जमवून, जुळवून घेत सहकार्यानं काम करण्याची क्षमता.

4. स्वीकार

जग वेगानं बदलतं आहे, नव्या प्रश्नांना जुन्या उत्तरांची चावी लागणार नाही, हा बदल स्वीकारून नवीन काही करण्याची क्षमता.

5. वेळेचं नियोजन

वेळ ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती उत्तम जमणं आपलं करिअर यशस्वी करण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

 

20 टॉप हार्ड स्किल्स

 

1.  क्लाउड कम्पाउडिंग

क्लाउड कम्पाउडिंग करू शकणार्‍या इंजिनिअर्सना मागणी असेल.

2. कृत्रिम बुद्धिमत्ता

एआयचं ज्ञान असलेले इंजिनिअर या नव्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात लागतील.

3. विेषणात्मक क्षमता

अ‍ॅनालिटिकल रिझनिंग हे नव्यानं झपाटय़ानं विस्तारणारं क्षेत्र आहे.

4. पीपल मॅनेजमेंट

माणसांना ऑर्डर देणं, रुबाब करणं हे सारं आता बदलत चाललं आहे, माणसं जोडणं, टीम बांधणं हे काम येणार्‍यांचं महत्त्व वाढेल.

5. यूएक्स डिझाइन

यूएक्स डिझाइन हे नव्या डिजिटल जगात यशस्वी होण्याचं सूत्र ठरू शकतं.

6. मोबाइल अ‍ॅप डेव्हलपमेंट

अ‍ॅप डेव्हलपरची गेली काही वर्षे चलती आहेच, यापुढेही काही काळ हे काम तेजीत असेल.

7. व्हिडीओ प्रॉडक्शन

व्हिडीओ स्ट्रिमिंग, पाहणं हे सारंच नव्या काळात वाढत जाणारं काम आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ लागेल.

8. सेल्स लीडरशिप

या क्षेत्रात कायमच कुशल माणसं लागतात, नव्या काळात प्लॅटफॉर्म बदलले तरी याकामी कुशल मनुष्यबळ लागेलच.

9. अनुवाद

जग जवळ येतं आहे, भाषेचे अडसर दूर करणारी माणसं आणि काम यांना येत्या काळात जास्त महत्त्व येईल.

10. ऑडीओ प्रॉडक्शन

व्हिडीओ प्रमाणेच ऑडीओ प्रॉडक्शनचं काम आणि त्यासाठीच्या कौशल्यांना मागणी असेल.

11. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग

अलेक्झा, गुगल होम यासाठी वापरली जाणारी ही टेक्नॉलॉजी. नवा काळ व्हाइस अ‍ॅक्टिव्हेटेड असेल त्यासाठीचं मनुष्यबळ लागेल.

12. सायंटिफिक कम्पाउडिंग

डाटा वाढत जाणार आहे, त्यावर काम करण्यासाठी आवश्यक असं हे कौशल्य. 

13. गेम डेव्हलपमेंट

गेमिंग आणि त्याची क्रेझ विलक्षण आहे, नवनवे गेम डिझाइन करू शकणार्‍यांची मागणी वाढणार आहे.

14. सोशल मीडिया मार्केटिंग

हे एक नवीन कम्युनिकेशनचं काम आता पुढच्या काळात अधिक महत्त्वाचं होणार आहे.

15. अ‍ॅनिमेशन

अ‍ॅनिमेशनचा काळ ओसरला नाही तर नव्या काळात हे काम नव्या रूपात येणार आहे. 

16. बिझिनेस अ‍ॅनालिसिस

डाटाचं महत्त्व वाढत असताना व्यावसायिक विेषण, फायदा-तोटा-गुंतवणूक यासाठीचे तज्ज्ञ यांना मागणी असेल.

17. पत्रकारिता

उत्तम पत्रकारिता करू शकणार्‍यांना आगामी काळात मोठं महत्त्व आणि काम असेल.

18. डिजिटल मार्केटिंग 

डिजिटल जगाच्या उदयासोबतच हे नवीन मार्केटिंगचं जग निर्माण झालं आहे, ते विस्तारत आहे.

19 इंडस्ट्रिअल डिझाइन

उपयुक्त आणि कल्पक अशा नवीन वस्तू डिझाइन करू शकणार्‍यांना मागणी वाढेल.

20. स्पर्धात्मक कौशल्य

स्पर्धा वाढेल, त्या स्पर्धेला तोंड देऊ शकेल अशा स्ट्रॅटेजी तयार करून देऊ शकणार्‍यांचं महत्त्व वाढेल.

21. कस्टमर सव्र्हिस सिस्टिम

एक वाइट अनुभव यापुढे ग्राहक तोडेल त्यामुळे उत्तम कस्टमर केअर देणार्‍या यंत्रणा आणि माणसांची गरज वाढेल.

22. सॉफ्टवेअर टेस्टिंग

नवीन सॉफ्टवेअर बाजारात येतात ते काम कसं करतील हे पाहणार्‍या टेस्टरची गरज वाढेल.

23. डाटा सायन्स

या कामाचं महत्त्व गेली काही वर्षे सतत वाढत आहे. पुढे वाढणार आहे.

24. कॉम्प्युटर ग्राफिक्स

टू डी, थ्री डीच्या जगात कॉम्प्युटर ग्राफिक्स बनवणार्‍या कुशल आर्टिस्टची गरज वाढेल.

25. कार्पोरेट कम्युनिकेशन्स

सोशल मीडियात एक लहानशी चूक जगभर भयंकर गहजब करू शकते. ज्यांना उत्तम कम्युनिकेशन येतं, त्या माणसांची गरज वाढणार आहे.

 


 

Web Title: 25 Top Skills in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.