3Cची कमाल
By admin | Published: June 11, 2015 03:04 PM2015-06-11T15:04:51+5:302015-06-11T15:04:51+5:30
आपल्याला आपल्या जगण्याचा राग येतो, कधी आपल्या नियतीचा, नशिबाचा कधी घरच्यांचा राग येतो.
Next
>आपल्याला आपल्या जगण्याचा राग येतो,
कधी आपल्या नियतीचा, नशिबाचा
कधी घरच्यांचा राग येतो.
वाटतं, आपल्याच नशिबात काही यश नाही,
काही घडत नाही. आपल्यालाच काही मिळत नाही.
पण आपलं नशिब बदलायची एक किल्ली आपल्याच हातात असते हे आपल्याला कुठं माहिती आहे?
आपण तीन किल्ली वापरतच नाही
म्हणून आपलं आयुष्य बदलत नाही!
थ्री स्टेप की म्हणू आपण त्याला
आणि प्रयत्न करू तिच्या जोरावर आपलं आयुष्य घडवायचा!
त्या किल्लीचं नाव आहे,
3 उ
हे तीन सी वापरून आपलं आयुष्य आपण सहज बदलवू शकतो.
पण त्यासाठी हवी धमक.
कारण हे तीन सी म्हणजे अंगारे आहेत, आणि जळते निखारे हातात घेतल्याशिवाय कसं आपल्या गुणांचं सोनं उजळायचं?
1) CHOICES
कुणीतरी आपल्या वतीनं निर्णय घेईल, कुणीतरी आपलं जग बदलेल हा भाबडेपणा सोडून द्या. आहे त्या परिस्थितीत आपल्यासाठी चांगलं काय याची निवड करा, चॉईस तुमचा, जबाबदारी तुमची.
2)CHANCES
नुस्ती निवड करुन उपयोग नाही तर त्या निवडीनं आलेल्या संधी मिळवणं किंवा संधी निर्माण करणं, धोका पत्करणं हे दुसरं सूत्र. आपल्यालाच पुढे होऊन स्वत:हून काही संधींचं सोनं करावं लागेल हे कधीच विसरता काम नये.
3) CHANGES
जो निर्णय घ्याल त्यावर ठाम राहिलात आणि सर्वप्रकारच्या बदलांना तयार राहिलात, ते बदल केले, आलेले बदल ङोलले, पचवले आणि सहन केले तर तुमच्या निवडीचे काही वेगळे आणि मनासारखे परिणाम तुम्हाला नक्की दिसतील.
एक लक्षात ठेवायला हवं की,
You must make a choice
to take a chance
or
Your life will never change.