4 दोस्त आणि 1 हेल्पलाइन-कोरोनाकाळात निराश आहात, बोलायला कुणी नाही मग 'इथे' बोला ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:33 PM2020-06-25T17:33:04+5:302020-06-25T18:10:35+5:30
चार तरुण दोस्त. मानसोपचार क्षेत्रतले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मानसिक आरोग्यासाठी एक 24 तास हेल्पलाइन सुरू केली.
- डॉ. प्रियदर्श
तरुण पिढी सोशल मीडियाच्या नादी लागून स्वत:चे नुकसान करून घेते असं म्हटलं जातं.
परंतु सोशल मीडियावर एकमेकांशी ओळख झालेल्या चार समविचारी मित्र-मैत्रिणी मात्न काही विधायक कामही करू शकतात. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक व शारीरिक आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले. त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊन आत्महत्या, नैराश्य, नात्यांमधले वादविवाद यात अचानक वाढ दिसू लागली. धकाधकीच्या रोजच्या जीवनात पूर्वी झोपेचं वेळापत्नक पाळणारे या लॉकडाऊनमध्ये रात्नभर ऑनलाइन राहण्याचं प्रमाण वाढलं. या सगळ्याने व्यथित होऊन आपापसात चर्चा करीत असताना या चार मित्रंनी ठरवलं की आपण मानसिक आरोग्यासाठी एक उपक्रम सुरूकेला तर.
आणि त्यातून ‘घुसमट मनाची, हितगुज आमच्याशी’ हा मानसिक आरोग्यासाठीचा एक उपक्रम सुरू केला.
पीयूष हेरोडे, ऋचा बागडे, अक्षय ठाकरे आणि श्रद्धा देसाई हे ते चार दोस्त. चौघेही टाटा इन्स्टिटय़ूटचे विद्यार्थी आहेत.
पीयूषने अप्लाइड सायकॉलॉजीमध्ये एमए आणि स्पेशलायङोशन क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये केलं आहे. ऋचानेही अप्लाइड सायकॉलॉजी आणि नंतर स्पेशलायङोशन काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये झाले आहे. ऋचा वैयक्तिक समुपदेशक तर पीयूष जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे समुपदेशक म्हणून काम करीत आहेत. अक्षयने सोशल वर्क आणि मेंटल हेल्थमध्ये स्पेशलायङोशन केलं आहे.
तर श्रद्धाचे सोशल वर्कआणि स्पेशलायङोशन दलित अँड ट्रायबल स्टडिज अँड अॅक्शन्स यात नुकतेच झाले आहे.
या चौघांनी एकत्र येत हा उपक्रम सुरूकेला आणि त्यासाठी 24 तास उपलब्ध असलेली मोफत समुपदेशन हेल्पलाइन सुविधा सुरूकेली.
मानसिक आधाराची गरज जाणवणा:या व्यक्तीला फोन, मेल किंवा फेसबुक पेजवर संपर्ककेल्यास समुपदेशन केलं जातं. या दोन महिन्यात या टीमला 15क् फोन कॉल्स व 25 फेसबुक मेसेजेस आलेत.
समुपदेशन ही गोष्ट अनेकांना खर्चिक वाटते, त्यामुळेही वैद्यकीय सल्ला अनेकजण घेत नाहीत. हितगुज टीमचे सदस्य मात्र म्हणतात की, दोन महिन्यात या फ्री हेल्पलाइनच्या माध्यमातून समुपदेशन करता आलं. काहीवेळा थोडय़ाफार समुपदेशनाने सुटू शकणारे प्रश्न समुपदेशन न मिळाल्यामुळे जिवावर बेततात किंवा आयुष्यावर दूरगामी परिणाम करतात. तर वेळीच असा मदतीचा हात घेतल्यास आयुष्य सावरता येऊ शकतं.
टीममधील समुपदेशक सदस्य त्यांना येणा:या कॉल्सबद्दल सांगतात की, काही वेळा अगदी मध्यरात्नीही आम्हाला कॉल येतात, काही वेळा फोन करणा:या व्यक्तीला सगळ्यांसमोर बोलता येत नसल्याने लपून छपून मदतीसाठी कॉल केले जातात, यात या लॉकडाऊनमुळे एकटेपणा, नातेसंबंधात होणारी भांडणं, नैराश्य, कोरोनासंदर्भात वाटणारी भीती हे विषय होते.
तसेच या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून इतर कामकाज बंद असल्याने पुरुष मंडळी घरीच आहेत. त्यामुळे घरगुती हिंसाचार सहन करणा:या स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय आहे हेही टीमने आलेल्या फोन कॉल्सवरून नमूद केलं,
पीयूष त्याला आलेल्या फोनच्या अनुभवातून सांगतो, एकदा तिशीतल्या तरुणाने फोन केला आणि सांगू लागला, माझा पुण्याला जॉब सुरू होता. लॉकडाऊन सुरू झालं. जॉब गेला. दोन महिने वाया गेलेत, काय करावं सुचत नव्हतं. घरी आई वडील आहेत. लॉकडाऊनमध्ये लग्न पुढे ढकललं. याच काळात पुण्याहून घरी आलेल्या या तरुणाला चौदा दिवस होम क्वॉरण्टाइन करण्यात आलं. नकारात्मक विचार मनात येत होते. पुढं काय होणार? स्वत:च्या क्षमतेवर संशय घ्यायला लागला. कशातच मन लागत नाहीये. मला या नैराश्यातून बाहेर काढा.
त्याला नैराश्यातून बाहेर यायचं होतं. इतके दिवस मनात दाबून ठेवलेलं त्याने मोकळेपणाने सांगितलं. या व्यक्तीला धीर दिला. त्याला हायसं वाटलं, बोलून शांत वाटलं. उमेद वाटली. त्याचा निवळलेला आवाज ऐकूनच बरं वाटलं.
अक्षय त्याचा अनुभव शेअर करताना सांगतो
दुपारी जरा डुलकी घेण्याच्या तयारीत असताना फोन वाजला. अनोळखी नंबर असल्याने आपल्या हेल्पलाइनवर कॉल असणार अशी शक्यता होती. फोन उचलल्यावर पहिलं वाक्य ऐकताच या कॉलचं गांभीर्य लक्षात आलं. हमसून हमसून रडताना आठवीत असलेला एक मुलगा सांगत होता. म्हणाला, माङयाशी बोलायला कुणी नाही. मला एकटं वाटतंय. माङो आई बाबा दोघे आहे घरात. पण ते त्यांच्या कामात दिवसरात्न बिझी आहेत. त्यांना खूप पैसे कमवायचे आहेत. असं एक दमात बोलून राज रडतच होता. त्याला लांब श्वास घ्यायला लावून आधी पाणी प्यायला लावलं. याच पाच मिनिटात त्याचं रडणं थांबलं होतं. आता तो शांतपणो बोलू लागला. माङयाकडे खेळणी आहेत. या बड्डेला मला लॅपटॉप घेऊन दिला डॅडीने. पण मला शाळेत असताना खेळायला माङो फ्रेण्ड्स होते. तसं कुणीच नाहीये खेळायला सोबत. मला एकटं राहून बोअर होतंय अंकल. मी मॉम डॅडला सांगितलं की माङयाशी खेळा, तर ते म्हणतात काम आहे, तुझा तू खेळ.
आम्हाला आमचं काम करू दे. आता एक महिना झाला, मला बोअर होतं. तुम्ही माङयाशी रोज बोलत जा अंकल. मी फोन केला तर चालेल का तुम्हाला?’
इतक्या कमी वयात एकाकी वाटणं, आईवडील आपली काळजी घेत नाही असं वाटणं बरं नाही. मग त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर थोडय़ा वेळाने त्याला विचारलं तुला आमच्या हेल्पलाइनबद्दल कुणी सांगितलं, तर तो म्हणाला, डॅडच्याच व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे कळलं.
त्याच्याशी बोलणं तर झालं, पण त्याच्या पालकांशीही बोलायला हवं असं वाटत राहिलं. असे अनेक अनुभव याकाळात या हेल्पलाइनने ऐकून घेतले.
तणाव पूर्ण परिस्थितीत असणा:या व्यक्ती लॉकडाऊनमुळे आणखी एकटय़ा पडल्या आहेत, कुणाचे निकटवर्तीय कायमचे दुरावले आहेत, जगण्याची भ्रांत निर्माण झालीय अशा कठीणप्रसंगी नि:स्वार्थपणो आपण काही जणांना साथ देऊ शकलो याबद्दल टीम अतिशय समाधानी आहे.
सध्या हा प्रकल्प शून्य खर्चावर सुरू आहे. या चार दोस्तांसह त्यांच्या टीमला नि:शुल्क पोस्टर बनवून देणारे प्रतीक आणि वैशाली यांनीही या उपक्रमातून मानसिक आरोग्याविषयीच्या प्रयत्नांना बळ दिले.
याशिवाय मानसिक समस्यांना योग्य, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन गरजू व्यक्तींना मिळावे म्हणून फेसबुकपेजवर लाइव्ह येत चर्चा घडवून आणण्याची संकल्पना सुरू केली. त्यातही अनेक तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले.
कोरोना आणि मानसिक आरोग्य- डॉ. निलेश मोहिते, लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग व भविष्यासाठी आखायचे मार्ग- दुर्गाप्रसाद बनकर, लॉकडाऊन आणि मुलांचं मनस्वास्थ्य- मुक्ता मोहिते, लॉकडाऊनमधली सक्तीची दारूबंदी आणि बिघडलेली मन:स्थिती- डॉ. धरव शहा, लॉकडाऊनमध्ये मातृ स्वास्थ्य आणि नवजात बाळाच्या स्वास्थ्याचं संगोपन- डॉ. तरू जिंदल, ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य- प्रो. नसरीन रुस्तमफ्राम, लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा:या मुलांना पडलेले प्रश्न व मार्गदर्शन- मुकुल कुलकर्णी, विशेष मुलांच्या गरजांविषयी- डॉ. रविराज शेट्टी, आणि जात-वर्ग-लिंग यांचा तणाव आणि त्यातून होणा:या आत्महत्या यासंदर्भात डॉ. संग्राम पाटील यांनीही अनेक विषय तरुणांसमोर मांडले. ‘घुसमट मनाची - हितगुज आमच्याशी’ या फेसबुक पेजवर सातत्याने ते विविध विषय मांडत आहेत.
***
9595391086, 8928580837, 8793469102
या नंबरवर संपर्क करता येईल.
किंवा मेल करता येईल.
(डॉ. प्रियदर्श छत्तीसगड येथे शहीद हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.)