अट्टल आजा-यांची 4 लक्षणं

By admin | Published: July 9, 2015 07:44 PM2015-07-09T19:44:30+5:302015-07-09T19:44:30+5:30

साधा चहा वेळच्या वेळी मिळाला नाही, तर अनेकजण अस्वस्थ होतात.

4 symptoms of Atal Ajaas | अट्टल आजा-यांची 4 लक्षणं

अट्टल आजा-यांची 4 लक्षणं

Next

 - मनोज कौशिक (सहाकर्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे)

दारूच कशाला,

साधा चहा वेळच्या वेळी मिळाला नाही,
तर अनेकजण अस्वस्थ होतात.
कुणाचं डोकं दुखतं,
तर कुणाला प्रेशरच येत नाही.
आणि मग सुरू होते फक्त चिडचिड.
चहाच्या व्यसनाची ही गत,
तर दारू पिणा:यांचं काय होत असेल?
 
व्यसन हादेखील एक आजार आहे आणि तो आजार आपल्याला झालाय हे कसं ओळखायचं?
 
व्यसनाला आजार  म्हणतात असं का?
आजारीपणाची कुठली लक्षणं व्यसनात दिसतात? आजारी माणूस काही स्वत: पडत नाही पण व्यसन तर स्वत:हून करतो, मग त्याला आजार का म्हणायचं?
असे प्रश्न होतेच. मुक्तांगणच्या माङया अभ्यासफेरीत मी या सा:याचा अभ्यास करत होतो. त्याच काळात डॉ. आनंद नाडकर्णी यांचं ‘मुक्तिपत्रे’ नावाचं पुस्तक वाचायला मिळालं. त्यांनी म्हटलंय की, व्यसन हा आजार आहे. त्याची फोड  त्यांनी इंग्रजीत ‘डिसीज’ म्हणजेच ‘डीस’ अॅण्ड ‘इज’ अशी केली आहे. दॅट इज समथिंग दॅट डिस्ट्रब्स यू फ्रॉम युवर इझ-कम्फर्टेबल लाइफ. हे वाचलं तर लक्षात येतं की व्यसनाला आजार का म्हणतात. इतर कोणत्याही आजारात माणसाला अस्वस्थ वाटतं. बेचैनी येते तसंच या व्यसनांच्या काळातही होतंच.
सर्व आजारांचा संबंध, निसर्गातील विषाणू, जंतू किंवा शरीरातील काही व्यवस्थांमधील अकस्मात बदल यांच्याशी संबंधित असतो. त्याचप्रमाणो अतिरिक्त प्रमाणात दारू पिणा:या व्यक्तीस हा आजार होतो. बहुतेक सर्व मोठय़ा आजारांचा थेट संबंध माणसाच्या जीवनशैलीशी निगडित असतो. अयोग्य आहार-विहार, काही अंशी मनाचा कमकुवतपणा या गोष्टींशी संबंधित असतात. हृदयरोग, मधुमेह, संधिवात, गाउट, पचनसंस्थेचे विकार हे सारे आजार अयोग्य जीवनशैलीचा परिणाम आहेत. दारूचा/व्यसनांचा आजार हासुद्धा जीवनशैलीशी थेट संबंधित आजार आहे. लोणचं जसं बरेच दिवस मुरल्यानंतर चविष्ट लागतं, त्याला खार सुटतो तसंच व्यसन या आजाराचंही होतंच. लगेच काही कुणी व्यसनी बनत नाही. काही वर्षे सतत तेच व्यसन केलं की माणूस संपूर्ण व्यसनी बनतो. प्रत्येक आजारात त्याचा असा काही लक्षण समूह असतो. या आजाराचं निदान व्हावं म्हणून मग रक्त, लघवी इत्यादि गोष्टींची तपासणी करावी लागते. माझा एक सर्जन मित्र सांगत होता, ‘‘अनेकदा गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करतानाच आम्हाला कर्करोग आहे का नाही याचं निदान झालेलं असतं.’’
दारूच्या आजारातसुद्धा एक विलक्षण महत्त्वाचा भाग म्हणजे निदान. कोणी माणूस व्यसन जास्त प्रमाणात करीत असेल तर त्याला आजार झालाच आहे असं लगेच म्हणणं चुकीचं आहे.
मात्र निदान त्या आजाराची लक्षणं तरी आपल्याला माहिती हवीतच. 
ही लक्षणं कुठली? आपल्याला व्यसन नावाचा आजार झाला आहे, यासाठी या लक्षण यादीतल्या काही गोष्टी ताडून पहाच! व्यसनाचा आजार झाल्याचे ओळखावे कसे? यासाठी एक लक्षण यादी खाली दिली आहे.
यातील कोणती लक्षणं तुमच्या स्वत:त किंवा तुमच्या जवळच्या माणसांना लागू पडतात हे पहा आणि मग ठरवा की व्यसन नावाचा आजार तुम्हाला झाला आहे की नाही? 
 
आपलं व्यसन हाताबाहेर चाललंय हे कसं ओळखायचं?
1) सुरु वात असते तेव्हा माणूस अगदी कमी प्रमाणात अमली पदार्थाचा वापर करतो. उदाहरणार्थ अर्धी बाटली बिअर किंवा एखादा छोटा पेग व्हिस्कीचा. परंतु सुरुवातीला मिळालेली नशा त्याला पुरेशी वाटत नाही. त्यामुळे तो अधिक प्रमाणात नशा करतो आणि एक विशिष्ट पातळीची नशा झाली की त्या पातळीवरची नशा ही त्याच्यासाठी अगदी योग्य आहे असे वाटू लागते. त्या पातळीवर नशा मिळण्यासाठी त्याचं दारूचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि अपेक्षित पातळीची नशा मिळावी म्हणून तो प्रयत्न करीत राहतो. परिणामी त्याच्या शरीरात दारू जाण्याचं प्रमाण वाढत राहतं. ‘अरे माणसा इतकी दारू मी पचवू शकत नाही रे’ असा संदेश शरीर देतं. पोटातली दारू उलटी होऊन बाहेर पडते. अशा उलटय़ा तुम्हाला होतात का, मग तुम्हाला व्यसन लागतंय!
2) सुरु वातीला महिन्यातून एखादे वेळी प्यायली जाणारी दारू, मग आठवडय़ातून एकदा सुरू होते, मग आठवडय़ातून दोनदा, मग रोज, आणि शेवटी पहिली नशा उतरली की लगेच पुन्हा नशा असं चक्र  सुरू होतं. काही जण ठिबक सिंचन रीतीने नशा करतात. दर थोडय़ा तासानं दोन पेग पितात. त्यामुळे ते पूर्ण नशेत नसतात. पण दिवसभरात भरपूर दारू पोटात गेलेली असते. थोडक्यात दारू वारंवार प्यायली जाते. 
3) अचानक एखाद्याने दारू बंद केली तर त्याला विलक्षण त्रस होतो. अगदी कमीत कमी उत्तेजक पेय म्हणजे चहा. तो जर वेळेवर मिळाला नाही तर माणूस अस्वस्थ होतो. कुणाचं डोकं दुखतं. कुणाला शौचाला होत नाही असे प्रकार अनुभवास येतात. जर चहाच्या वियोगाची ही कथा तर दारूसारख्या मादक पदार्थाचा वियोग किती त्रसदायक असेल? बहुतेक सर्व व्यसनी व्यक्तींना आपल्याला त्रस कधी सुरू होणार आहे याची जाणीव असते. त्यामुळे शक्यतो वियोग लक्षणो सुरू होण्याआधीच दारू पिऊन वियोग लक्षणांचा  त्रस  होणार नाही याची दक्षता घेतात. दारू नाहीच मिळाली की स्वत:त कुठली लक्षणं सुरू होतात याकडे लक्ष ठेवा, इतरांना ठेवायला सांगा.
4) मुक्तांगणमध्ये रुग्णमित्र दाखल झाल्यावर त्याक्षणी त्याची दारू बंद होते. थोडय़ाच वेळात त्याची दारूच्या वियोगाची लक्षणं दिसू लागतात. हातपाय थरथरणं, डोकं दुखणं, संभ्रम, मला घरी जाऊ द्या हा हट्ट. असं काही दिसले तर वियोग लक्षणं सुरू झाल्याचं लगेच समजतं. काही मित्रंना 24 ते 72 तासात फीट येतं. त्याला रम-फीट असं नाव आहे. तर काही जणांना संभ्रमाचा त्रस सुरू होतो. ते वर्तमानकाळात जगतच नसतात. त्यांना आपण कोठे आहोत, आत्ताची वेळ काय, आजची तारीख कोणती असं साधंसाधंही समजेनासं होतं. काही जणांना तर इतका त्रस होतो की ते दिवसभर कुठंही फिरू पाहतात. पण त्यांना जिने आणि पाय:या कुठे आहेत ते समजत नाही. लघवी आणि  शौचावरचं नियंत्रण सुटतं. आणि अशा अवस्थेत त्यांना बांधून ठेवणं याचा त्यांना राग येतो.
 
 
ज्यावेळी सर्व तीव्र भावना (काम, क्रोध, मोह, मत्सर, नैराश्य, चिंता वगैरे) अनिर्बंधपणो उफाळून येतात आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र, जे सद्सद्विवेकबुद्धीशी जोडलेले असते, ते निद्रिस्त होते अशी अवस्था म्हणजे हा व्यसन आजार.
- मार्क गोल्ड
अमेरिकन अध्यक्षांचे अमली पदार्थ दुष्परिणामविषयक सल्लागार

 

Web Title: 4 symptoms of Atal Ajaas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.