ग्लॅमरस दिसण्याची 5 सूत्रं

By admin | Published: June 11, 2015 02:33 PM2015-06-11T14:33:17+5:302015-06-11T14:33:17+5:30

महागडे कपडे आणि मेकअप करून तर कुणीही ग्लॅमरस दिसेल, पण साधेसेच कपडे घालून ग्लॅमरस आणि ट्रेण्डी कसं दिसायचं?

5 Formulas of Witch Looks | ग्लॅमरस दिसण्याची 5 सूत्रं

ग्लॅमरस दिसण्याची 5 सूत्रं

Next
हल्ली प्रत्येकालाच ग्लॅमरस दिसायचंय, सुंदर दिसायचंय आणि खास दिसायचंच. कुणाचं लग्न असो, पार्टी असो आपण छानच दिसलं पाहिजे, असा आग्रह असतोच.
एवढंच कशाला सोशल मीडियावर डीपी म्हणून टाकायचा फोटो जरी काढायचा असला तरी बरेचजण अगदी नटूनथटून ते फोटो शूट करतात.
मात्र, हे सारं करताना आणि ग्लॅमरस दिसण्याचा आग्रह धरताना आपल्याला कळायला हवं की, ‘हाऊ मच इज टू मच’? बॅलन्सिंग कळलं पाहिजे! तरच आपला लूक लाउड न दिसता सुंदर आणि ग्लॅमरस दिसू शकतो. 
त्यासाठी या काही सोप्या आयडिया..
त्यातलं मूळ सूत्र एकच, आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू, कपडे घालूनच ग्लॅमरस आणि सुंदर दिसायचं. ही आयडिया जर नीट समजली ना तर आपल्या साद्याशाच कपडय़ांच्या जिवावर तुम्ही ‘ग्लॅमरस’ दिसू शकाल!
 
साडी ड्रेप कशी करताय?
‘साडी ड्रेपिंग’ असा शब्द उच्चरला की, ब:याच मुलींना वाटतं की, लगेच त्याचा क्लास तरी लावायला हवा नाहीतर पार्लरमध्ये तरी जायला हवं. त्याची काही गरज नाही. एक साधं सूत्र लक्षात ठेवा.
जर तुमच्या साडीचे काठ मोठे असतील तर ती बॉर्डर ठळकपणो दिसावी म्हणून साडीचा पदर मोकळा सोडा, पिनअप करू नका. 
पण जर साडीचा काठ छोटा असेल तर पदर असा पिनअप करा की, तो काठ तुमच्या खांद्यावर चापूनचोपून बसेल. तुमच्या खांद्यापेक्षा मोठा पदर काढायचा नाही. तो खांद्यावरच चपखल बसला पाहिजे,  तर तुमची कंबर कमनीय असेल तरच साडी जरा खाली नेसा नाहीतर नेहमीप्रमाणो साडी झाकूनपाकून नेसणंच उत्तम.
 
बाह्या मोठय़ा की छोटय़ा?
कॅप स्लिव्हजची सध्या अजिबात फॅशन नाही. कॅप स्लिव्हज म्हणजे अगदी छोटय़ाशा बाह्या.
त्यामुळे तशा बाह्यांचे कपडे वापरू नका. सध्या फॅशनेबल आहेत त्या स्लिव्हजलेस स्टाइल्स. त्या नको असतील तर सरळ फुल स्लिव्हज नाहीतर थ्रीफोर्थ वापरा.
बंदगळा, क्लोज्ड नेकलाइन्स, स्टॅण्ड कॉलर्स यांचीही सध्या फॅशन आहे. कुर्ता, टॉप्स आणि साडय़ांचे ब्लाऊज यासगळ्याच साठीचा साडय़ांचा हा नियम लागू पडतो.
 
पलाझो इन, केप्रीज आउट!
गेले काही दिवस केप्रीजची खूप फॅशन होती. आता ती बाद झाली. आता पलाझो, हेरम, घोटय़ार्पयतच्या पॅण्ट्स यांची फॅशन आहे.
 
जॅकेट्स आणि कव्हरअप्स
श्रग्ज, जॅकेट्स, फिटेड जॅकेट्स, लॉँग कव्हरअप्स हे सारं मुलांसाठीही सध्या खूप ट्रेण्डी आहेत. जॅकेट बिनधास्त वापरा.
 
काना-गळ्यातलचं काय?
 1) नुसता कपडय़ांचा विचार करून चालत नाही. ग्लॅमरस दिसायचं तर अॅक्सेसरीजही महत्त्वाच्या. त्यातली महत्त्वाची म्हणजे बॅग. फार मोठय़ा, गच्च भरलेल्या, झोळ्या वाटणा:या बॅग वापरू नका.
2) अती लाउड किंवा भरमसाठ दागिने वापरू नका. मोठे कानातले घातले तर गळ्यातलं घालू नका. त्याऐवजी एखादी मोठी बांगडी किंवा ठसठशीत अंगठी घाला.
 
- प्राची खाडे
पर्सनल स्टायलिस्ट आणि ब्यूटि एक्सपर्ट

Web Title: 5 Formulas of Witch Looks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.