स्मार्टफोन वापरताना हमखास होणा-या 5 चुका

By admin | Published: September 3, 2015 07:50 PM2015-09-03T19:50:34+5:302015-09-03T19:50:34+5:30

आपण स्मार्टफोन घेतला की आपण स्मार्ट झालो असा अनेक जणांचा समज असतो! ते सतत त्या स्मार्टफोनशी खेळत असतात.

5 mistakes made when using a smartphone | स्मार्टफोन वापरताना हमखास होणा-या 5 चुका

स्मार्टफोन वापरताना हमखास होणा-या 5 चुका

Next
>- निशांत महाजन
 
आपण स्मार्टफोन घेतला की आपण स्मार्ट झालो असा अनेक जणांचा समज असतो!
ते सतत त्या स्मार्टफोनशी खेळत असतात. फोटोबिटो काढतात. आपण एकदम ट्रेण्डी आहोत, फॅशनेबल आहोत असा समजही करून घेतात.
ते सारं खरं असलं तरी ते खरंच असतं असं नव्हे, कारण स्मार्टफोन वापरताना काही चुका हमखास होतात आणि त्या चुका इतक्या बिनडोक असतात की, त्यामुळे आपल्या इज्जतचा कायमस्वरूपी फालुदा होऊ शकतो.
त्या कुठल्या?
 
1) K
खरंतर आपल्या फोनमधे ऑटो स्पेल चेक असतंच. आपलं इंग्रजी कच्चं असलं तरी हे ऑटो स्पेल चेक आपलं स्पेलिंग करेक्ट करून देतातच. मात्र तरीही काही महाआळशी. त्यात भासमारू. म्हणून ते कुणालाही उत्तर देताना एवढं एकच अक्षर वापरतात. बाकीच्या अक्षरांशी आणि शब्दांशी शत्रुत्व असल्यासारखे!
आपण टॉप बॉस असलो तर हाताखालची माणसं खपवून घेतात; पण आपण ट्रेनी असलो आणि बॉसला के म्हणत रिप्लाय केला, तर तो आपल्याला केर काढायच्या झाडूनं धुणार हे नक्की. आणि सहकारी आपल्याला उद्धटही समजणार!
त्यामुळे असं ‘के’ रीप्लाय करणं तातडीनं बंद!
 
2) OK
तुम्हाला बॉस काहीतरी मेसेज पाठवतो. त्यावर तुम्ही रिप्लाय काय देता? ओके!
बॉसला ओके म्हणणारे तुम्ही कोण?
कार्पोरेट कल्चरमधे बॉसला ओके म्हणून रिप्लाय देणं हे उद्धटपणाचं मानलं जातं. पण बॉसला रिप्लाय तर द्यायलाच हवा. नाही दिला तर तो वैतागणार!
मग त्याला पर्याय म्हणून शुअर, आय विल, थॅँक्स, बघतो, करतो, विल डू असं काहीतरी उत्तर पाठवा. ओके म्हणणं म्हणजे तुम्ही स्वत:ला फार शहाणो समजता असं सांगणं!
 
3) नो स्मायली.
आहेत ना स्मायली, फुकटच मिळताहेत. मग पाठवायच्या बिंधास्त.
पण आपण कुणाला स्मायली पाठवतोय याचा काही विचार करायला हवा ना! तो करत नाही. वाट्टेल त्या स्मायली आणि स्टिकर बिंधास्त कुणालाही पाठवली जातात. अगदी बिझनेस कॉण्टॅक्ट्स, प्रोफेशनल डील, अपॉईनमेण्ट यांसारख्या ठिकाणीही जर तुम्ही मेसेजमधे स्मायली पाठवत असाल तर तुम्ही उथळ आणि अगदीच बिनकामे आहात असा त्यातून मेसेज जातो.
 
4) कॉल मी
आपण कुणाला तरी फोन करतो, ते काही उचलत नाही. मग पुन्हा करतो. पण साताठदा फोन करूनही फोन अॅन्सर होत नाहीच. त्यावर आपण काय करतो, मेसेज पाठवतो. ‘कॉल मी’. - मग आपलं नाव.
संपलं. का करेल ती व्यक्ती आपल्याला फोन? नाहीच करत. कारण आपण कोण कॉल मी म्हणत हुकूम सोडणारे?
त्यापेक्षा, आपलं नाव, गाव, काय काम ते दोन ओळीत आणि वेळ देण्याची विनंती एवढा साधा एसएमएस करायला हवा.
पण ते न करता, कॉल मी मेसेज करणारेच जास्त!
 
5) पाठव फोटो दणादण
आपल्या कॉण्टॅक्ट लिस्टमधल्या सगळ्यांनाच आपले उठसूठ काढलेले फोटो पाठवायची अनेकांना हौस असते!
बाकीच्यांचा काय संबंध?
त्यापेक्षा ज्यांच्याशी दोस्ती त्यांना पाठवा. इतरांना पाठवून तुम्ही तुमच्या इमेजचा पार कचराच करता, कायमसाठी!
 

Web Title: 5 mistakes made when using a smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.