५ नवे स्किल्स

By admin | Published: January 15, 2015 06:13 PM2015-01-15T18:13:33+5:302015-01-15T18:13:33+5:30

करिअर घडवण्यासाठी आवश्यक असा नवा फॉर्म्युला

5 new skills | ५ नवे स्किल्स

५ नवे स्किल्स

Next
>
 
- मृण्मयी सावंत
 
नवीन वर्ष सुरू झालं; आता एकदा ‘डे’ज् चा ज्वर ओसरला आणि ऊन तापायला लागलं, की परीक्षा जवळ आल्याची जाणीव होते. काही ठिकाणी तर कॅम्पस रिक्रुटमेण्टही सुरू होतात. अनेक ठिकाणी तर डिसेंबरच्या शेवटीच कॅम्पस इण्टरव्ह्यू पार पडल्या. कुणाला जॉब मिळाला, कुणी मागेच राहून गेले. आता ते नव्यानं जॉब शोधतील, नव्या कंपन्या येतील तेव्हा नव्यानं स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करायला धडपडतील.
पण हे सारं करताना आपल्याला नक्की माहिती हवं की, आपल्या डिग्य्रा आणि आपलं टॅलण्ट यापलीकडंही कंपनी मॅनेजमेण्ट बरंच काही शोधत असते.
आणि ते बदल आपल्या गावीही नसतात. असे कोणते स्किल्स आहेत, की जे सध्या तरुण उमेदवारांमध्ये असावेत म्हणून कंपन्या अत्यंत ‘शोधक’ नजरेनं इण्टरव्ह्यू घेत आहेत?
एचआर अर्थात ह्युमन रिसोर्स एक्सपर्ट तज्ज्ञांशी आणि कन्सल्टण्टशी बोललं तर सापडतात, असे काही स्किल्स जे सध्याच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मुख्य म्हणजे हे स्किल्स आपल्याकडे असो- नसोत, ते मिळवण्यासाठीचा ‘अँटिट्यूड’ तरी समजून घ्यायलाच हवा!
म्हणून तर सध्या ‘सबसे जरुरी’ असलेल्या स्किल्सची ही एक ओळख.
 
१) प्रॉब्लम सोडवण्याची क्षमता.
ज्याला इंग्रजीत प्रॉब्लम सॉल्वविंग अँबिलिटी म्हणतात म्हणजे काय तर आपल्याला ‘दिसणारा’, समोर आलेला प्रश्न सोडवण्याची क्षमता, त्यासाठी असणारी दृष्टी. अनेक लोक काही अडचण, समस्या आली की एकतर ती बॉसवर ढकलतात, नाहीतर तर तो सोडवेल म्हणून वाट पाहत बसतात. प्रोफेशनली निर्णय घेत, जे आपल्याला शक्य आहे ते करणं, जे शक्य नसेल ते योग्यवेळी वरिष्ठांपर्यंत पोहचवणं आणि तोडगा काढायचा प्रयत्न करणं. काहीतरी तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्न टाळणं किंवा तात्पुरती वाट काढणं यात अभिप्रेत नाही, तर मुळात कामात ज्या अडचणी येतात, त्यावर काही उत्तम तोडगा शोधणं या वृत्तीची आवश्यकता आहे. फार कमी लोक आलेल्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात आणि जे करतात ते नव्या मॅनेजमेण्टला हवे आहेत.
 
२) विेषण येतं?
 डाटा ओतला की त्याचं विेषण तर काय कम्प्युटरच्या एक्सेल शिटमधेही करून मिळतं. मग तरी ही क्षमता का महत्त्वाची ठरावी? कारण माणसाच्या मेंदूची, कल्पनाशक्तीची आणि अपार बुद्धीची जागा कुणीच घेऊ शकत नाही. जे कम्प्युटरला सुचू शकत नाही, ते माणसाला सुचतं. समोर एकच डाटा असताना त्यातून वेगळं दिसण्याची, पाहण्याची आणि विेषण करण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. माहितीचा उत्तम वापर करून विेषण करता येणं हे फार ‘युनिक’ स्किल आहे.
 
३) ‘बोलता’ येतं?
म्हणजे काय तर नुस्ता संवाद उपयोगाचा नाही. पॉवर पॉईण्ट प्रेझेंटेशन तर कुणीही करेल; मात्र माणसांच्या काळजाला हात घालत, त्यांच्याशी थेट इमोशनल कनेक्ट साधण्याची ताकद, त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात बोलता येण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. त्यासाठी माणसाचं मन कळावं लागतं, त्याच्या सुखदु:खात आपण सहभागी व्हावं लागतं आणि त्यातून जे नातं निर्माण होतं, ते नातं व्यावसायिक नात्यापलीकडे टिकतं. इमेज, ब्रॅण्ड्सच्या नव्या जगात असं ‘बोलू’ शकणारी, माणसं वाचू शकणारी माणसं हवी आहेत. दुर्दैवानं फेसबुक-व्हॉट्सअँप यावर बोलणार्‍या तरुण मुलामुलींना आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं, समाजाचं काय चाललंय हे समजतच नाही. आणि म्हणूनच ‘कनेक्ट’ संपतो. अशी कनेक्टच नसणारी माणसं काही कामाची नाहीत, असं अनेक कंपन्यांना आता वाटू लागलं आहे.
 
४) भविष्य कळतं?
आपण ज्या विषयात काम करतो आहोत, ज्या विषयातले तज्ज्ञ म्हणवतो, त्या क्षेत्रात येत्या पाच वर्षांत काय घडणार आहे? इतर अनेक क्षेत्रं, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण या सार्‍याचा आपल्या कामावर काय थेट परिणाम होणार आहे हेच अनेकांना माहिती नसतं. आला दिवस केलं काम, चालले घरी असाच एकूण मामला. मग अशी माणसं कंपनीचा येत्या पाच वर्षांतला प्रवास, नफा, काय प्लॅन करणार, आपली कंपनी कुठल्या दिशेनं जावी, तिनं कुठले बदल स्वीकारावेत, कुठल्या सुधारणा कराव्यात हे कसं सुचवणार? त्याप्रमाणे कसं काम करणार?
आणि करणार नसतील तर त्यांचा काय उपयोग? म्हणून तर ज्या माणसांना भविष्यात काय होईल, करता येईल अशी नजर आहे, त्या माणसांची नव्या व्यवस्थापनांना गरज आहे.
 
५) मास्टरी कसली?
मान्य आहे की, जमाना मल्टिटास्किंगचा आहे. सगळ्यांना सगळं जमलं पाहिजे. अनेक विषय समजले पाहिजेत, अनेक गोष्टी करता आल्या पाहिजेत. मात्र तरीही नवा काळ म्हणतो की, एक असा विषय सांगा की, ज्या विषयात तुम्ही खोलात जाऊन काम करू शकता. जो तुमचा विषय आहे त्या विषयातलं काहीही विचारा तुम्हाला येतंच. तुम्हीच; बाकी त्या विषयात तुमच्या आसपासही कुणी फिरकू शकत नाही असे ‘मास्टर्स’ मिळणं आता महामुश्कील झालं आहे. सगळेच गुगल एक्सपर्ट, त्यापलीकडे जाऊन जो एखाद्या विषयात मास्टरी मिळवेल, तो नव्या काळात चलनी नाणं ठरू शकतो.
 
 
एवढं कराच.
 
अनेकदा प्रश्न पडतो की, हे नवीन स्किल्स कुठून शिकणार? कोण शिकवणार? खरं सांगायचं तर, जरा डोकं शाबूत ठेवलं तर बर्‍याच गोष्टी आपले आपल्याला शिकता येतील.
 
१) आपलं मातीतलं ज्ञान, व्यवहारज्ञान विसरू नका. जे जे अंगावर येईल त्याला भिडण्याची, डोकं चालवण्याची वृत्ती सोडू नका.
२) बिचकू नका, बोला. तुम्ही जितकं साधंसोपं बोलाल. स्थानिक भाषेत, जिव्हाळ्यानं बोलाल, तितकं माणसं समजतील, उलगडत जातील. माणसं हीच तुमची पुंजी.
३) लोकांना नेमकं काय हवं, त्यांच्या गरजा काय हे ओळखायला शिका.
४) तुमच्यातला उत्साह कमी होऊ देऊ नका. उत्साहातून ज्या कल्पना सुचतात त्या बेशकिमती असू शकतात.
५)  कम्प्युटरवरचा डाटा, एक्सेल यापलीकडे विेषक नजर कमावता येते. त्यासाठी जे दिसतं, ते पाहा..
 
मुळात आपल्याकडे डिग्री आहे, म्हणजे आता आपलं करिअर सुरू होईल आणि आपण ठरवलेल्या टप्प्यावर, किंवा खरंतर ‘टॉप’वर आपण पोहचूच, असं ठरवणं नव्या काळात भाबडेपणा ठरावा. एकतर जे अनेक माणसांना येत नाही ते तुम्हाला यायला हवं, ते जपायला हवं आणि शिकायला हवं. नव्या काळात महत्त्वाची असलेली पाच सूत्रं खरंतर कॉमन सेन्सचा भाग आहेत. या क्षमता उत्तम असल्या तर माणसाचं करिअर नाही, आयुष्यही उत्तम होऊ शकतं. मात्र शिक्षणातून ते येत नाही आणि ते तसं येत नसेल तर आपण ते कमवायला हवं. ज्यांची ही कमाई उत्तम तेच नव्या काळात टिकतील, यशस्वी होताना दिसतील.
- पंकजा शेवाळकर
मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी एचआर कन्सल्टण्ट

Web Title: 5 new skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.