5 पेटण्ट ज्यानं कदाचित जगच बदलेल!

By admin | Published: August 13, 2015 02:49 PM2015-08-13T14:49:21+5:302015-08-13T14:49:21+5:30

अमेरिकेत दोन तासांत पोहचता येईल? समुद्राचं खारं पाणी गोड करता येईल? स्मार्ट फोन खाली पडला तरी फुटणार नाही? बाहुला आपली कामं एका नजरेत करू शकेल? आपल्या स्पर्शानं फोनमधला डाटा ट्रान्सफर होऊ शकेल? खरं नाही ना वाटतं?

5 Patents That Will Change The World! | 5 पेटण्ट ज्यानं कदाचित जगच बदलेल!

5 पेटण्ट ज्यानं कदाचित जगच बदलेल!

Next
>तंत्रज्ञानाच्या विश्वात पेटंट असण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  एखादी नवीन कल्पना सुचली की लगेच आधी त्याचे पेटंट घेण्याचा प्रघात गुगल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आहे. पेटंट म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार. पूर्णपणो नवीन कल्पना असेल तरच पेटंट मिळते. पेटंटमुळे त्या कल्पनेवर आणि कल्पनेचे व्यवसायात रूपांतर करून नफा कमवायचा पूर्ण अधिकार पेटंटधारकाला मिळतो.
बौद्धिक संपदा अर्थात हे पेटंट त्या कंपनीचे भविष्यातील यश तर ठरवतेच; पण या पेटंटची माहिती घेतली तर जग भविष्यात कुठल्या दिशेने चालले आहे त्याची चाहूलही लागते. अशाच काही भविष्यवेधी पेटंटबद्दल जाणून घेऊया.
1) विमान प्रवास- एका तासात 5क्क्क् किलोमीटर 
एअरबस या विमाने बनवणा:या कंपनीने नुकतेच ध्वनीच्या वेगाच्या तब्बल साडेचारपट वेगाने उडू शकणा:या स्वप्नातीत विमानाचे पेटंट घेतले. ही कल्पना प्रत्यक्षात आल्यास मुंबई ते न्यूयॉर्क हा प्रवास दोन तासांत होईल. सध्या याच प्रवासाला कमीत कमी 16 तास लागतात. ‘थोडे काम होते न्यूयॉर्कला, सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो’ असं काही वर्षानी कुणी म्हटले तर त्याला वेडय़ात काढू नका.
2) डाटा ट्रान्सफर करायचाय?
- फक्त स्पर्श करा
AT&T  या अमेरिकन कंपनीने घेतलेल्या या पेटंटनुसार डाटा ट्रान्सफर करण्यासाठी चक्क मानवी शरीराचा वापर केला जाऊ शकेल. याच कल्पनेवर आधारित एका मोबाइल हॅण्डसेटचे प्रोटोटाईप डोकोमो या जपानी कंपनीने बनवले आहे. हा हॅण्डसेट हातात धरून कंपॅटीबल हेडफोनमध्ये चक्क गाणी ऐकता येतील. यासाठी वायर किंवा ब्लुटूथ याऐवजी मानवी शरीराचा वापर केलेला आहे.
 
3) पडलो तरी नाक वर!
अॅपलने फाईल केलेले हे पेटंट स्मार्टफोन युगातील एक मोठीच समस्या सोडवण्यासाठी आहे. आपला महागडा स्मार्टफोन गडबडीत हातातून निसटला की टचस्क्रीनच्या जिवावरच बेतणार. किमान स्क्र ॅचेस किंवा क्र ॅक तरी नक्की. पण अॅपलचे हे पेटंट प्रत्यक्षात आले तर तुम्हाला ही काळजी करण्याची गरज नाही. जर तुमच्या हातातून फोन निसटला तर तो हवेत असतानाच आपोआप आपली दिशा बदलून अशा रीतीने पडेल की स्क्र ीनसारख्या नाजूक भागाला कसलीही इजा होणार नाही.
 
4) गुगलचा टेडी
गुगलने एका टेडी किंवा बाहुलीसारख्या दिसणा:या एका अफलातून खेळणीचे पेटंट घेतले आहे. पहिली अफलातून गोष्ट म्हणजे समजा दिवाणखान्यात एका कोप:यात ही बाहुली पडली आहे आणि तुम्ही तिच्याकडे कटाक्ष टाकला तर एखाद्या माणसाप्रमाणो या बाहुलीला तुमचा कटाक्ष लक्षात येईल आणि तीसुद्धा तुमच्याकडे बघेल. दुसरी गोष्ट म्हणजे या टेडी किंवा बाहुलीला तुम्ही गुगल नाऊला जशा कमांड्स देऊ शकता तशा कमांड्स देऊन काही विशिष्ट कामेही करून घेऊ शकता. उदाहरणार्थ टीव्ही बंद-चालू करणो वगैरे. गुगल हा टेडी किंवा बाहुली बनवून विकायची काही शक्यता नाही. पण ही टेक्नॉलॉजी भविष्यात दुस:या अनेक उपयोगांसाठी वापरता येऊ शकेल.
5) पाण्याच्या प्रश्नावरचे उत्तर?
तोशिबा या जपानी कंपनीने नुकतेच एक दूरगामी परिणाम करू शकेल असे पेटंट घेतले. हे पेटंट आहे सुमद्राच्या पाण्याचा खारेपणा दूर करून ते पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान. गोडय़ा पाण्याची आपली गरज पूर्ण करू शकेल एवढय़ा क्षमतेने अशी टेक्नॉलॉजी काम करू शकली तर पाण्याशी संबंधित कित्येक प्रश्न सुटण्यास मोठीच मदत होईल.
- गणेश कुलकर्णी

Web Title: 5 Patents That Will Change The World!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.