बेबंद
By admin | Published: May 12, 2016 03:14 PM2016-05-12T15:14:38+5:302016-05-12T15:14:38+5:30
प्रेमात पडणा:यांच्या वाटेत कधी कुटुंब आडवं येतं, कधी सबंध गाव. कधी चिरेबंद जातवास्तव आणि कधी या सगळ्यांसहित सबंध पाषाणी व्यवस्था. मात्र कोवळ्या छातीतून उसळत असलेला बेलगाम निसर्ग. तो जुमानत नाहीच कशाला. त्याला ना परिणामांची तमा असते, ना माणसांनी उभ्या केलेल्या रूढी-रिवाजांच्या, जाती-धर्माच्या, गरिबी-श्रीमंतीच्या बेवकूफ चौकटी कबूल असतात.
Next
>वयात येताना कुणीतरी आवडणं, प्रेमात पडणं, त्यासाठी जगणं हेच नैसर्गिक असतं. कृत्रिम चौकटींनी कितीही कोंडलं, तरी जिंकणार हा निसर्गच असतो!
निसर्ग आधी असतो की जात-धर्म आधी असतात? जीवशास्त्र आधी असतं की लोकांच्या टोळ्यांनी एकत्र येऊन लिहिलेलं सोयीचं स’माज’शास्त्र आधी असतं? शाश्वत काय असतं नि लादलेलं काय असतं? मातीतून रक्तात आलेलं अधिक खरं असतं की या-त्या सत्तेच्या माजातून उद्भवतं, ते खरं असतं? यांच्यात संघर्ष उभा होतो तेव्हा जिंकण्याचा हक्क कुणाला असतो मग?
‘सैराट’ नावाच्या सिनेमानं हे प्रश्न मनात आणलेच. या सैराटचं जेवढं प्रचंड कौतुक झालं तेवढीच प्रचंड विखारी टीकाही सैराटने सोसली आहे. या-त्या जातीचे लोक आमनेसामने आले, विशेषत: समाजमाध्यमातून ही तेढ अधिक मोठय़ा प्रमाणात उफाळून येताना दिसली. जाती-अंताच्या वाटेवरून हयातभर चालत आलेल्या महापुरु षांची नावे घेत घेत आपण तीच व्यवस्था मजबूत करण्याकडे चाललेलो आहोत, याचं अजिबात भान लोकांना उरलेलं दिसलं नाही. अगदी चित्रपटात दाखवलेल्या नायिकेच्या चित्रपटातल्याच जातीपासून, ती भूमिका करणा:या मुलीच्या वास्तवातल्या जातीची चर्चा करण्यार्पयत सोशल साइट्सवर वावरणा:या कथित सुज्ञ सुशिक्षितांनी पातळी सोडलेली दिसली.
खरंतर सैराटमध्येच असं वेगळं काय आहे मग, की त्यानं एवढं चर्चेत यावं? एक चित्रपट करून आपण हे समाजातलं जातीपातीचं चित्र बदलून टाकू असा काही आशावाद मनाशी बाळगण्याइतका नागराज, या सिनेमाचा दिग्दर्शक, नक्कीच भाबडा नसणार. नागराजचा आजवरचा प्रवास लक्षात घेता, त्याच्या कवितेत तो जे म्हणतो तेच पुरेसं बोलकं आहे यासंदर्भात. ‘‘माङया हाती नसती लेखणी, तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला. मी कशानेही उपसतच राहिलो असतो, हा अतोनात कोलाहल मनातला.’’
या त्याच्या कवितेतल्या ओळी नागराजची सबंध भूमिका खुलेपणाने सांगून टाकणा:या आहेत. त्याला लोकांना काही शिकवायचं नाहीये. या सबंध व्यवस्थेने भयानक गुंतागुंत करून ‘व्यवस्थितपणो रचून’ ठेवलेला अराजकी कोलाहल त्याला बाहेर उपसायचा आहे. तो बाहेर मांडून ठेवला, तर त्यातलं भयावहपण दिसून येऊन कदाचित काही मानवी संवेदनांमध्ये पुनश्च प्राण फुंकले जातील, अशी काहीशी आशा त्याच्या मनात असू शकेल कदाचित.
जातीबितींच्या पार पल्याड जाऊन निसर्गाने जन्मसिद्धपणो प्रदान केलेल्या ऊर्मी विरु द्ध बाहेरच्या कृत्रिम चौकटी असा हा संघर्ष. या झगडय़ात अंतिमत: निसर्गाचंच जिंकणं अपरिहार्य आहे. कारण तो शाश्वत असतो.
याच निसर्गाने वयाच्या एकविसाव्या वर्षी मला स्वत:ला अत्यंत खोलवर प्रेमात पाडलं होतं. जिच्या प्रेमात पडलो ती मुलगी तेव्हा पंधरा वर्षाची होती. ‘मला तुङयाशीच लग्न करायचं आहे’ हे नंतर वर्षभरानं मी तिला सांगून टाकलं. जातीधर्मातल्या, आर्थिक स्तरांतल्या, कथित सामाजिकतेतल्या भेदांना आणि छोटय़ा गावातल्या अभेद्य जात-वास्तवातल्या निष्ठुर टणकपणाला भेदून त्यानंतर तब्बल सात वर्षानी आम्ही लग्न केलं. त्याही आधी पौगंडावस्थेपासून आणखी कुणाला पाहून माङया मनात उत्कट प्रेमसदृश असं काही उफाळून आलंही असेल, पण गंधित अत्तराच्या एखाद्या झुळुकीसारखं ते विरूनही गेलं असणार. तोही निसर्गाचाच एक नियम असतो.
तेरा-चौदा ते सतरा-अठरा हे वयच असं असतं की शरीरात प्रचंड रासायनिक उलथापालथ घडत असते. प्रचंड ऊर्जा ओसंडून येत असते. काहीतरी अफाट घडून यावं, घडवावं अशा ऊर्मी उसळत असतात. हे वय धोक्यांना जुमानत नाही. उफाळत्या ऊर्मीना पायबंद घालण्याऐवजी ‘बेबंदपणो’ त्या ‘सैराट’ क्षणांना सामोरं जाऊन ते क्षण जगून घेताना आयुष्य पणाला लागलं तरी बेहत्तर !’ असं काहीसं छातीत धडका मारत असतं.
‘गुटखा खाऊन मरण्यापेक्षा आर्चीवर प्रेम करून मरणं आपल्याला चालेल’ असं त्या सिनेमातला परश्या त्याच्या जिवाभावाच्या दोस्तांना, लंगडय़ा आणि सल्ल्याला सांगतो ते उगीच नाही. मनातल्या उसळत्या ऊर्मींना दाबून ठेवण्यासाठी निरंतर सक्रिय असलेली जी एक बुलंद सामाजिक व्यवस्था असते, तिला या ऊर्मी अशाच पद्धतीने फाटय़ावर मारत असतात. यातून मग अफाट हिंमत छातीत असलेली एखादी आर्ची उभी राहते, समंजस बुजरा तरीही मातीत पाय रोवून ठाम उभा राहणारा परश्या येतो. ते तर प्रेमात पडलेले असतात, दिवाने झालेले असतात. पण त्यांच्या दोस्तीसाठी व्यवस्थेच्या तटबंदीला आपल्या सर्व शक्तीनिशी धडका मारण्यासाठी लंगडा प्रदीप किंवा छातीच्या बरगडय़ा मोजता येतील एवढीच देहयष्टी असलेला सल्ल्यासुद्धा त्यांच्या जोडीला उभा राहतो.
असे जिवाला जीव देणारे काही मित्र माङयाही आयुष्यात होते, बहुतेकांच्या असतातच.
या मित्रंनी त्या काळात माङयासाठी जे काही केलं ते कुठल्याही रक्ताबिक्ताचे नाते असलेल्या कुणीही माङयासाठी कधीही केलेले नव्हते. हे मित्र कुठल्या जातीचे होते, त्यांचा धर्म काय होता या गोष्टी इथे अत्यंत गौण ठरतात. निसर्गधर्माला साथ देण्याची जी ऊर्मी त्याच निसर्गधर्माने त्यांच्यात ठासून प्रज्वलित केलेली होती, ती शाश्वत मूल्यांना शाश्वतपणो जिवंत ठेवणारी आहे.
छोटय़ा गावांमधून अशा अनेक प्रेमकथा आकार घेतात. पूर्वीही घेत होत्या, आजही घेतात. पण त्या प्रेमकथा आकारास येतात, उमलू लागतात तेव्हा सबंध भोवताल कसा क्रूर पद्धतीने प्रतिक्रि या देत असतो हे मी अनुभवलेलं आहे.
तुमची जात कुठलीही असू दे, कुठलाही असू दे तुमचा धर्म-वर्ग, माणसांनी उभारलेल्या कृत्रिम व्यवस्थेच्या हितसंबंधांना तुम्ही छेद देताय हे लक्षात आलं की ही व्यवस्था अत्यंत आक्रमक व हिंसक होते.
कधी कुटुंब आडवं येतं, कधी सबंध गाव. कधी चिरेबंद जातवास्तव आणि कधी या सगळ्यांसहित सबंध पाषाणी व्यवस्था. कोवळ्या छातीतून उसळत असलेला बेलगाम निसर्ग. तो जुमानत नाहीच कशाला. त्याला ना परिणामांची तमा असते, ना माणसांनी उभ्या केलेल्या रूढी-रिवाजांच्या, जाती-धर्माच्या, गरिबी-श्रीमंतीच्या बेवकूफ चौकटी कबूल असतात.
म्हणून तर प्रेमात पडलेले गावोगावचे आर्ची आणि परश्या डरत नाहीत कशालाच.
सर्व शक्ती एकवटून ते लढत राहतात. भोवतालाशी, क्वचित एकमेकांशी, अनेकदा स्वत:शीही. पुरेपूर कोसळून पडावं अशा कित्येक वेळांनी चौफेर आक्र मणं केलेली असतात त्यांच्यावर. मात्र ‘प्रेम’ नावाची गोष्ट त्यातूनही जिद्दीने उभं राहायला बळ देते त्यांना.
कधी अपुरं पडतं बळ, काही गाफिल क्षणांचा आधार घेऊन व्यवस्थेतले गारदी घेरतात त्यांना. काहींच्या गळ्यांतून रक्ताच्या लाटा उसळतात बाहेर. निसर्गाची म्हणा की प्रेमाची म्हणा, ताकद एवढी अशरण असते की त्यांच्या वाहत्या रक्तालाही एकमेकांचा विरह कबूल नसतो. ते मिसळून जातं एकमेकांत. एकजीव होऊन.
आणि काहींच्या प्रेमाला बळजबरी लावलं जातं नख. वरकरणी दाबून टाकलं जातं सारं. कायमचं.
पण ते कायमचं मिटत नाही. मनातल्या डोहात ही बंडखोरी शाबूत राहते तसं ते प्रेमही. ते पुसलं जात नाही. मिटवता येत नाही. बाहेरून, लांबून पाहणा:यांना ती परिस्थितीशरणता दिसते. पण आत खोलवर ते सारं तसंच जागं असतं. कायम.
कुणाही तात्याला, कुणाही प्रिन्सला, त्यांच्या जातींना, त्यांच्या संपत्तीला, त्यांच्या सत्तेला आणि त्यांच्या कहर हिंसक माजाला पुरूनच उरतात हे प्रेम करणारे आर्ची आणि परश्या. रक्तीम पावलांचे ठसे उमटवत चालत गेलेलं त्यांचं एक बाळ मागे उरलेलं असतं, ते जेव्हा भविष्यात बारा-पंधरा वर्षाचं होतं तेव्हा त्याच्या रक्तातून, त्याच्या छातीतून उसळणा:या ऊर्मींतून, पुनश्च तरारून जिवंत सळसळत तीच बंडखोरी, तीच निसर्गओढ वाहू लागणार असते.
जातीबितींना, धर्माबिर्माना, सत्तेबित्तेला पिढय़ान्पिढय़ा हे तरुण असेच आव्हान देत राहतील. जातीधर्मसत्तेच्या, घमेंडमाजाअभिमानाच्या पोकळ ओङयांनी मस्तक बधीर करून घेतलेल्या समाजपुरु षाला हे समजून घ्यावंच लागेल कधीतरी.
‘‘कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कृतीचा सारांश,
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव !’’
आर्ची
परशा
की
तुम्हीच?
प्यार किया नहीं जाता हो जाता है.
असं प्रेमात पडणा:यांनी कितीही म्हटलं तरी पिढय़ान्पिढय़ा त्या प्रेमाला या समाजात विरोध होतोच
आहे. प्रेमात पडणं हे खरं तर अनेकांसाठी समाजाविरोधातलं बंड नसतं, तर ते स्वत:विरोधातच असतं.
दबकत दबकत जगणं नाकारून सरळ स्वत:च्या मनाचं ऐकण्याची ही बंडखोरी असते.
त्या बंडात नेहमीच यश येतं असं काही नाही.
काहींच्या वाटय़ाला यश येतंही.
पण ब:याच जणांच्या वाटय़ाला एक अपेशी झुंज येते.
मन मारण्याची सक्ती किंवा तडजोड येते.
आणि आपल्या मनात अंकुरलेलं प्रेम तिथंच गाडून जगरहाटीप्रमाणं ‘व्यवहारी’ जगणं येतं.
ही सगळी तशी नेहमीची गोष्ट.
या गोष्टीत तसं नवीन काही नाही.
प्रेम + खानदान की इज्जत का सवाल + जातीपातीचे संघर्ष + त्यापायी विरोध +
घरातून आत्महत्त्या करू असं ब्लॅकमेलिंग + उभं चिरून भिंतीत गाडू अशा धमक्या +
मारझोड + मनाविरुद्ध लगA..
हे सारं काही नवीन नाही. अनेक तरुण प्रेमकहाण्या या वळणावर येतातच.
त्याला शहर आणि ग्रामीण भाग, श्रीमंत-मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय अशा आर्थिक स्तरांचाही
काही अपवाद नाही.
वर्तमानपत्रत प्रसिद्ध होणा:या प्रेमापायी आत्महत्त्यांच्या बातम्या आणि
शहरोशहरी पोलीस स्टेशनात दाखल होणा:या मिसिंग कम्प्लेण्ट्स याची साक्ष देतातच.
मात्र या सा:यात एक प्रश्न अनुत्तरितच राहतो.
प्रेमाला विरोध नेमक्या कोणत्या कारणांसाठी असतो?
- जात?
हे एकच कारण सगळ्यात मोठं असतं?
की शिक्षण, आर्थिक स्थिती, रंगरूप, नातेवाइकांचा दबाव किंवा पसंती
की यापलीकडेही असतात काही कारणं, जी लगA या टप्प्यावर तरुणांच्या
प्रेमाला गाडायला टपलेली असतात?
अशी काही कारणं तुम्ही अनुभवली आहेत?
त्या कारणांवर मात केली आहे, लढून लगAाच्या टप्प्यावर नेलंय तुमच्या प्रेमाला?
की तो टप्पा येण्यापूर्वीच संपलं ते प्रेम?
लिहा तुमच्या ‘सैराट’ प्रेमाची गोष्ट.
आणि त्या प्रेमाला झालेल्या विरोधाचीही. त्या विरोधाच्या कारणांचीही.
1) नेमका कुठल्या कारणांनी तुमच्या प्रेमाला विरोध झाला होता? का झाला होता?
2) तो मावळला की तुम्हाला तुमच्या प्रेमाचा हात सोडावा लागला?
3) तुम्ही प्रेमासाठी झुंज दिली का? दिली असेल तर नेमकं काय केलं?
4) नसेल दिली तर का तुम्हाला घरच्यांपुढे किंवा समाजापुढे नमावं लागलं?
5) प्रेमात पडून घरच्यांचा विरोध पत्करून जे लगA केलं, त्या लगAात पश्चात्ताप झाला,
घरच्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं असा काही तुमचा अनुभव आहे का?
6) तुमच्या अवतीभोवती प्रेम करणा:या जोडप्यांना नेमक्या कुठल्या
अन्य समस्यांना सामोरं जावं लागलं?
****
या प्रश्नांची उत्तरं सविस्तर लिहा.
प्रेमाला नख लावणा:या कारणांचीच नाही, तर त्याच्याशी झगडून,
लढून जिंकलेल्या स्ट्रॅटेजीचीही ही चर्चा.
आणि शोध.
पुढारलेल्या म्हणवणा:या या राज्यात तरुण प्रेमाला होणा:या विरोधाच्या मूळ कारणांचा,
त्या मागच्या वृत्तीचाही.
जरूर लिहा.
पत्ता- ऑक्सिजन, लोकमत भवन, एमआयडीसी अंबड, नाशिक-422क्1क्.
अंतिम मुदत -25 मे 2क्16
पाकिटावर-आर्ची
परशा
की
तुम्हीच?
असा उल्लेख करायला विसरू नका.
- ऑक्सिजन टीम
- बालाजी सुतार, अंबाजोगाई
(ग्रामीण वास्तवावर बारीक नजर असलेले लेखक आणि कवी)
majhegaane@gmail.com