एष्टीनं कॉलेजात जाणा:या रस्त्यावरचं दिव्य

By admin | Published: November 19, 2015 10:00 PM2015-11-19T22:00:20+5:302015-11-19T22:00:20+5:30

बसने रोज उठून कॉलेजात जाणा:या खेडय़ापाडय़ातल्या मुलींच्या वाटय़ाला येणा:या खाचखळग्यांचे हादरे.

Achievement in college: Divine on this road | एष्टीनं कॉलेजात जाणा:या रस्त्यावरचं दिव्य

एष्टीनं कॉलेजात जाणा:या रस्त्यावरचं दिव्य

Next
>बसने रोज उठून कॉलेजात जाणा:या खेडय़ापाडय़ातल्या
मुलींच्या वाटय़ाला येणा:या खाचखळग्यांचे हादरे.
 
 
एखादी बातमी वाचून 
आपण तेवढय़ापुरते हळहळतो.
हादरतोही.
पण तेवढय़ापुरतेच!
पण त्या जगात जगण्याची कुचंबणा किती
आणि काय काय ओरबडत राहते
हे कळतही नाही अनेकदा!
तसंच एक जग आहे,
खेडय़ापाडय़ात राहणा:या 
पण जवळच्या तालुक्याच्या गावी 
नाहीतर शहरात 
एसटीनं अपडाउन करणा:या मुलामुलींचं!
बाइकवर बसून भुर्रकन कॉलेजात जाणा:या
बुंगाट शहरी जन्तेला
 कदाचित कळणारही नाही की,
 कुठल्याशा फाटय़ावर उभं राहून
बसची वाट पाहत
धावतपळत कॉलेजात पोहचणं 
आणि बस चुकू नये म्हणून
लास्ट लेक्चर न करता 
पुन्हा बसअड्डा गाठणं 
हेच त्यांचं कॉलेजलाइफ.
त्यात यंदा दुष्काळ. 
यासा:यात किती मन मरतं,
काय काय सलतं आणि डाचतं.
ेतेच समजून घेणारा हा 
एक प्रवास या अंकात आहे.
पान उलटा.
आणि अस्वस्थ वाटलंच खूप वाचून.
तर वाटू द्या. तेवढं तरी!!
 
- ऑक्सिजन टीम
 

Web Title: Achievement in college: Divine on this road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.