उकळी फुटल्यावर.. 2
By Admin | Published: January 11, 2017 03:10 PM2017-01-11T15:10:42+5:302017-01-11T15:10:42+5:30
कोवळ्या वयातच डसलेलं अनावर शारीरिक आकर्षण मर्यादा ओलांडून पुढे गेलं, तर वाट्याला येणाऱ्या ताणातून मार्ग कसा काढायचा?
>कॉलेजातल्या तरुणच नव्हे, शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात
डोकावून पाहणाऱ्या खास अंकाचा पार्ट - 2
‘कळतं हो सगळं, पण पटत नाही. मान्य कसं करणार, आमची मुलं अशी वागत असतील?’
- गेल्या गुरुवारी आॅक्सिजनचा अंक प्रसिद्ध झाल्यानंतर एका घाबऱ्याघुबऱ्या आईचा फोन आला. त्यांचा प्रश्न होता की, मुलांच्या जगात ‘असं’ काही आहे हे मान्य कसं करणार?
मान्य करा अगर करू नका, मुलामुलींच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत, हे वास्तव.
‘हे’ चित्र सर्वसमावेशक आहे का? म्हणजे सगळीच मुलं आणि सगळ्याच मुली ‘त्यातल्या’ असतात का? - असेही प्रश्न अनेकांनी विचारले. त्याचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं आहे. पण हे खरं, की ही लागण मोठी आहे आणि वाढती आहे.
गंभीर आहे, ते हे की या स्वाभाविक वाटणाऱ्या थ्रिलचे ‘परिणाम’ कुणी या मुलांना वेळेवर सांगत नाही आणि आपापली लढाई एकेकट्याने, गुपचूप लढत राहणं.. त्यापायी येणारा असह्य ताण सोसत राहणं आणि हे सगळं आपल्या आईवडिलांपासून, घरापासून लपवत राहण्याचा आटापिटा त्यांच्या वाट्याला येतो.
ही मुलं आतून एकेकटी पडत जातात. त्यातून बरेच जण बाहेरही पडतात. काळ हे औषध इथेही लागू पडतंच की! पण मनावर ओरखडे राहतात.
जी बाहेर पडू शकत नाहीत, त्यांच्या बाकीच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. तोल हरवतो. त्यातून कुणी गुन्हेगारीच्या चक्रात अडकलं की आयुष्य नको त्या वळणांनी सटकत राहतं. विशेषत: मुलगे. आधीच्या परस्पर संमतीतून चालू झालेली नाती नंतर काही कारणांनी बिनसली की आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. प्रकरण ब्लॅकमेलिंगपर्यंत पोचतं. दबाव. दडपण. बळजोरी. मग पोलीस. तक्रारी. चौकश्या.
- हे असं समजा झालं, तर..
पुढे काय?
- या सर्वात कळीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा अंक.
- आॅक्सिजन टीम
सुटायचंय?
यातलं काही तुम्हाला माहितीये?
तुम्ही काही अनुभवलंय?
कधी अडकला आहात, नको त्या गुंत्यात?
मदत हवी आहे तुम्हाला त्यातून सुटण्यासाठी?
- तर मोकळेपणाने विचारा प्रश्न,
शेअर करा तुमचे अनुभव.
पुढच्या भागात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा
प्रयत्न आपण करू!
नाव लिहू नका. लिहिलंत तरी ते गुप्त राहील याची खात्री बाळगा.
ईमेल : oxygen@lokmat.com