..अ‍ॅण्ड, वी आर देअर!

By admin | Published: January 18, 2017 06:39 PM2017-01-18T18:39:47+5:302017-01-18T18:39:47+5:30

फर्स्ट इअरची सायकल सहल. एका आठवड्यात आठशे किलोमीटर सायकलिंग.

..and, we are there! | ..अ‍ॅण्ड, वी आर देअर!

..अ‍ॅण्ड, वी आर देअर!

Next

 

बॅच सुरू होऊन पंधरा मिनिटं झालीयेत..
ठिकेय, उरलेला पाऊण तास जमके वर्कआउट करेंगे. 
‘लेट कमर्स, बी क्विक! गेट आॅन द सॅडल!’ - रिकी टोमणा मारतोय नेहमीप्रमाणे.
माझ्या नेहमीच्या सायकलवर तो दुसरा मुलगा बसलाय..
ठिकेय, आज ही कोपऱ्यातली सायकल ट्राय करूया. 
‘थ्री टू वन, गो!’
याह! ही खरी मजा - असा असावा वर्कआउट! सुस्साट, तुफान! 
पण असं जोमात पॅडलिंग सुरू केलं की हमखास अलिबागची आठवण येणार. फर्स्ट इअरची सायकल सहल. एका आठवड्यात आठशे किलोमीटर सायकलिंग. असंच तुफान, सुस्साट. समुद्राच्या काठाकाठानं. रणरणत्या उन्हात, रिमझिम पावसात. तशी मजा परत नाही जमली. मात्र आता जिमच्या निमित्तानं ही स्पिनिंग बॅच. डिस्को लाईट्समध्ये. इंग्लिश गाण्यांच्या तालावर. रिकीच्या कॉमेंट्रीसोबत. सुस्साट सायकलिंग.
पाचवीतल्या सुटीत आजोबांनी शिकवली सायकल. ते कसल्या मस्त गोष्टी सांगायचे. त्यांनी जगलेल्या लाइव्ह गोष्टी. सायकलवरून कुठे कुठे फिरले होते ते! किती बदल्या झाल्या. गाव-तालुके बदलले, पण आजोबांची सायकल कायमची सोबत. असंच सायकल चालवता चालवता टाइम ट्रॅव्हल करून मागे जाता आलं तर? - पन्नास वर्षं मागे. तरुण यंग आजोबांसोबत सायकल चालवायला. आरशातल्या माझ्या जागी आजोबा असतील. झब्बा, पायजमा, कोट आणि गांधी टोपी घातलेले! वळणावळणाचा उतार आणि रस्त्यावर आम्ही दोघंच. संध्याकाळ. सूर्यास्त. 
मेडिटेशन म्हणता येईल का असं सायकल चालवण्याला? 
पण मेडिटेशनमधे असं डोकं नसतं चालवायचं म्हणे. 
काहीही असो, आपल्याला लै आवडतं सायकलिंग.
‘अ‍ॅण्ड... वी आर देअर! वेल डन गाईज, लेट्स स्लो डाउन...’

- प्रसाद सांडभोर 
xprsway@gmail.com

 

छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना, कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..?? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट. १. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा. सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा.. पत्ता- शेवटच्या पानावर, तळाशी. २. ईमेल-  oxygen@lokmat.com

Web Title: ..and, we are there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.