.आणि पाऊस बरसला तेव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 04:24 PM2018-12-13T16:24:42+5:302018-12-13T16:24:51+5:30

शेजारचा ‘तो’ कान टवकारून आपलं बोलणं ऐकतोय असं तिला वाटलं. सुनसान ठिकाणी भर पावसात एकटी मुलगी आणि ‘तो’? आता काय होणार.?

And when rain bells!A girls night out & rain.. | .आणि पाऊस बरसला तेव्हा!

.आणि पाऊस बरसला तेव्हा!

Next

 -श्रुती मधुदीप

 रात्रीचे  साडेअकरा वाजले होते. प्रचंड पाऊस पडत होता. जडच्या जड मोठी बॅग घेऊन ती जवळच्या एका निर्जन ठिकाणी उतरली. पावसाने कुडकुडलेली तिची नजर स्वतर्‍साठी आणि त्या बॅगसाठी आसरा शोधत होती. समोरच तिला एका बंद दुकानाचा पत्र्याचा शेड दिसला. पावसाला ठेंगा दाखवत ती त्या शेडच्या खाली गेली. बॅग एका बाजूला ठेवून तिने तिचा  ओला झालेला ड्रेस झटकला. चेहरा पुसून घेतला. आणि तिची नजर आसपासच्या घरांवर, आसपासच्या वातावरणावर गेली. आजूबाजूला कुणीच नव्हतं. अगदी एका दूर टोकाला कुणी एक माणूस जाताना दिसत होता. काही घरात लाइस होता. काही घरं झोपायच्या तयारीत अंधारली होती. आता काय करावं तिला कळेना. मामानं इतक्या हक्कानं लगेच ये म्हणून सांगितलं म्हणून ती इथं आली होती. 
      इतक्यात दूरवरून एक मुलगा पावसात आपलं जॅकेट डोक्यावर घेऊन पळत येताना तिला दिसला. तो पळता पळता धापा टाकत तिच्या पत्नाच्या शेडखाली आला. आणि डोक्यावरचं जॅकेट सरकवून त्यानं स्वतर्‍चे हात स्वतर्‍च्या शरीराभोवती घट्ट पकडले. जणू तो त्या थंडीत स्वतर्‍ला शाबूत ठेवायचाच प्रयत्न करत असावा. एकदम त्यानं स्वतर्‍च्या मनगटावरच्या घडय़ाळात पाहिलं. आणि त्याच्या तोंडातून ‘च.’ असा उद्गार निघाला. मघापासून डोळ्याच्या एका कोन्यातून त्याचं निरीक्षण करणार्‍या तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणात आपल्या शेजारी कुणीतरी आहे असं जाणवून त्यानंही तिच्याकडे पाहिलं. मग एका झटक्यात तिने नजर खाली घेतली. तिला एकदम आपल्यासमोर कुणीतरी आरसा धरला असावा असं जाणवलं आणि  त्यात आपण व्यवस्थित दिसतो आहोत ना, आपली ओढणी इकडे तिकडे तर नाही गेली, याची ती खात्नी करून घेऊ लागली. आणि मग आपली ओढणी स्वतर्‍च्या शरीराभोवती गुंडाळून तिनं स्वतर्‍च्या शरीरावरचे चढउतार झाकून टाकले. तो आता इथं का आला असावा असा ती विचार करू लागली. याची नजर वाईट असली तर, याचा विचार करून तिला अस्वस्थ वाटू लागलं. या आजूबाजूच्या अंधारात फक्त त्याचं असं असणं तिला भीतिदायक वाटत होतं. काय करावं तिला कळेना. तिच्या शरीराची तिला तीव्रतेने जाणीव होऊ लागली. ती त्याचे सगळे हावभाव, हालचाली तिच्या डोळ्याच्या एका कोन्यातून टिपत होती. आणि एकदम तिला टीव्हीवर पाहिलेल्या, पेपरमध्ये वाचलेल्या रेपच्या, मुलींवर केलेल्या जोरजबरदस्तीच्या बातम्या आठवू लागल्या आणि तिनं डोळे घट्ट मिटले. या बातम्यांना पण आताच आठवणीतून वर यायचं होतं का, असं वाटलं तिला. इतक्यात त्या दोघांच्या समोरून एक टपोरी मुलांची टुव्हीलर उगाचच आवाज करत आली. आणि जाता जाता त्यांनी तिच्या शेजारच्या या मुलाला ‘ए’’ असं म्हणून हात केला आणि डोळा मारून तिच्याकडे बोट करून   ‘बढिया है भाई’ असं म्हणून ते यूटर्न घेऊन सुसाट गेले. 
हे सगळं पाहून ती गडबडलीच. स्वतर्‍जवळच्या या मोठय़ा बॅगचंही आता तिला जास्तच ओझं वाटू लागलं आणि तिने त्याच्याकडे घाबरून पाहिलं. त्यानंही तिच्याकडे पाहिलं; पण मग लगेच त्यानं नजर चोरली. इतक्यात तिने तिच्या पर्समधला फोन बाहेर काढला आणि फोन कानाला लावत ती म्हणाली, 
‘हॅलो. हं मी पोहोचलीय इथे.’
‘अच्छा! बरं बरं. दादाला पाठवताय ना ?’’
‘किती वेळात?’
‘‘बरं बरं दहा मिनिटात ना? ओके’
‘हो हो. वाट बघतेय.’
शेजारचा ‘तो’ कान टवकारून आपलं ऐकतोय असं वाटलं तिला. आणि तिनं फोन ठेवून दिला. 
पाऊस सुरूच होतो. तिचं मन विचलित होतं, अस्वस्थ होतं. आपल्या या बॅगकडे बघून शेजारचा तो आपल्याला? अं ती पुन्हा पुन्हा फोनशी चाळे करत राहिली. मग पुन्हा तिने फोन कानाला लावला.
‘हॅलो . हं हॅलो! ’
  ‘दादा कुठली गाडी घेऊन येतोय ? ’
  ‘अच्छा नाही नाही तसं नाही. माझ्याकडे एक मोठी बॅग आहे. जड आहे बरीच. म्हणजे त्यात काही नाहीय विशेष. पुस्तकं  आहेत पुस्तकं.’
बॅगमध्ये पुस्तकं आहेत हे त्याने ऐकलं ना, हे पाहण्यासाठी तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं. 
‘अहो नाही! पुस्तकांशिवाय कसं पान हालणार माझं. हो हो. काय म्हणताय? अं?’
अचानक असं ती बोलत असतानाच तिचा फोन वाजला. मामाचा फोन होता. तिने एकदम शरमून फोन खाली घेतला. आणि त्याच्याकडे पाहिलं. मगापासून ऑकवर्ड असलेल्या त्यानं तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पकडले गेल्याची भावना होती. त्याच्या चेहर्‍यावर न आवरता येणारं गोड हसू आलं. आणि ती त्याच्याकडेच पाहत राहिली.
‘फोन?’ - तो म्हणाला.
‘अं.?’ - तिनं प्रश्नार्थक नजरेने विचारलं
‘फोन येतोय ना’
‘अं., हो’ असं म्हणून तिने फोन घेतला. 
‘हां मामा. मी पोहोचलीय. अच्छा! पाऊस कमी झाला की येते म्हणून थांबले होते इथे. आलेच’ आणि तिने फोन ठेवला. 
तिने चोरून चोरून त्याच्याकडे पाहिलं तो हसू दाबत दाबत हसत होता. तिनंही स्वतर्‍ची जीभ चावली आणि ती स्वतर्‍शीच हसली. 
‘काय आहे त्या बॅगेत ?’ - त्यानं विचारलं
‘पुस्तकं!’ - ती डोळ्यांत डोळे न घालता म्हणाली
‘नक्की?’ - तो 
‘हं’ - ती शरमून म्हणाली.
‘कसली?’ - त्यानं उत्सुकतेनं विचारलं 
‘कथा, कादंबर्‍या.’ 
‘हो ? मीपण वाचतो कांदबर्‍या.’
‘वॉव. फिक्शन फार आवडतं मला’ - ती 
‘मलाही!’ - तो मृदुपणे म्हणाला. 
अखेर तिनं त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं, तिला त्याचे डोळे खूप हळवे वाटले. त्यानं समजुतीचे डोळे मिचकावले. पाऊस ओसरत आला होता; पण पावसाला खूप खूप बरसायचं होतं कारण त्यानं या दोघांना छत मिळाल्याची खात्नी करून घेतली होती!

Web Title: And when rain bells!A girls night out & rain..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.