आर्ची परश्या की तुम्हीच?

By admin | Published: May 12, 2016 03:16 PM2016-05-12T15:16:05+5:302016-05-12T15:16:05+5:30

एक दूजे के लिए, कयामत से कयामत तक पासून प्रेमाचा बळी घेणारी प्रेमाची सैराट ष्टोरी.

Archie Parashya you? | आर्ची परश्या की तुम्हीच?

आर्ची परश्या की तुम्हीच?

Next
>‘तू असशील मोठा बादशहा, मी नाही घाबरत तुला जा.’
असं सांगणारी अनारकली कोणो एकेकाळी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर झळकली होती.
ती भर राजसभेत बादशहाला ठणकावून सांगते की, ‘पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या..’
अर्थात या बेडरपणाची किंमत पण तिला मोजावीच लागते. बादशहा तिला भिंतीत जिवंत गाडतो. सलीम-अनारकलीची प्रेमकथा इथं संपते पण त्यांचं प्रेम बादशहाच्या दहशतीलाच नाही, तर आलम दुनियेला फतेह करत कायमचं अमर होतं.
अशा किती कहाण्या हिंदी सिनेमात आपण आजवर पाहिल्या.
एक दूजे के लिए जगू पाहणारे वासू -सपना भाषिक संघर्षाच्या विस्तवात भरडले जातात आणि शेवटी संपवून टाकतात स्वत:ला एकदुस:याच्या साक्षीनं.
साथ जी तो नहीं सकते, पर मर तो सकते है म्हणत ‘कयामत’ घेऊन आलेले आणि खानदानांच्या वैरापायी बळी गेलेले राज-रश्मी. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून ते पळून तर जातात पण त्यांच्या जिवावर उठलेली माणसं त्यांना गाठतात आणि शेवटी संपवतातच.
ज्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे तो सैराट तरी काय सांगतो. जातीपातीच्या आणि गरीब-श्रीमंतीच्या चरकात शेवटी पिळवटून कापलंच जातं आर्ची-परश्याचं प्रेम!
हीर-रांझा, सोहनी-महवाल ते वासू सपना, आर्ची-परश्या.
काळ किती बदलला.पण गोष्ट तीच.
सच्च्या प्रेमाची आणि प्रेमावर उठणा:या निष्ठूर दुनियेची.
कुठल्याच भेदाला न जुमानणारं आणि त्यापल्याड गेलेलं तरुण जोडप्यांचं प्रेम आणि निर्दयतेची कुठली सीमाच न राखता त्या प्रेमाला संपवायला निघालेली भवतालची माणसं. समाज..
या गोष्टीतलं सूत्र काळाबरोबर आपल्या समाजात बदललंच नाही हेच सांगतोय का हा सिनेमाचा प्रवास? 
प्रेम असफल झाल्यानं एकेकटय़ानं किंवा जोडप्यानं जीव दिल्याच्या बातम्या आणि ऑनर किलिंगच्या निर्घृण बातम्या अजूनही जागा व्यापतच आहेत वर्तमानपत्रतही आणि टीव्हीवरच्या प्राइमटाइममध्येही.
हे असं का होतं; याचीच एक चर्चा पान 4-5 वर.
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Archie Parashya you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.