सिनेमा कीडा आहात?

By admin | Published: June 8, 2017 12:03 PM2017-06-08T12:03:31+5:302017-06-08T12:03:31+5:30

सिनेमा बघायला आवडत नाही, असं क्वचितच आपल्याला कोणी भेटेल. सिनेमा बघून झाला की सिनेमाच्या अनेक पैलूंवर मग उलटसुलट चर्चा करणं ओघानंच आलं.

Are the cinema insects? | सिनेमा कीडा आहात?

सिनेमा कीडा आहात?

Next

 - प्रज्ञा शिदोरे

सिनेमा बघायला आवडत नाही, असं क्वचितच आपल्याला कोणी भेटेल. सिनेमा बघून झाला की सिनेमाच्या अनेक पैलूंवर मग उलटसुलट चर्चा करणं ओघानंच आलं. सिनेमातील कलाकारांच्या त्यांच्या इतर कामांशी तुलना करणं, कोणाला किती प्रसिद्धी मिळाली आहे, बॉक्स आॅफिसमधे कोणी किती गल्ला जमवला अशा चर्चा आपण तासन्तास करतो. अशाच चर्चा करण्यासाठी, त्या कलाकृतीविषयी अजून माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट मूव्ही डाटाबेस हे संकेतस्थळ पाहा.
धम्माल असते तिथं. फक्त फुकट चर्चाच नाहीत, तर आपली मतं आपण इतरांशी पडताळूनही पाहू शकतो.


इंटरनेट मूव्ही डाटाबेस हे संकेतस्थळ कोल नीडमन नावाच्या सिनेरसिकाने १९९० मध्ये सुरू केले. चित्रपट रसिकांना त्यांच्या आवडत्या कलाकृतींविषयी माहिती देणं, जगात प्रकाशित झालेल्या सर्व चित्रपटांची इतरत्र एकगठ्ठा कुठेही माहिती मिळणार नाही अशी एक समग्र यादी बनवणं आणि चित्रपटांचं उत्तम रसग्रहण करता येणं हा यामागचा हेतू होता. आज हे संकेतस्थळ जगभरातील चित्रपट रसिकांना माहिती पुरवणारा सर्वात मोठा साठा बनलं आहे.


इथे तुम्ही बघितलेल्या सिनेमांची त्यांच्या प्रकारानुसार यादी करू शकता. या याद्या वाचून तुम्हाला कोणता चित्रपट बघायला आवडेल अशा सिनेमांची नावं हे संकेतस्थळ तुम्हाला सुचवतं. त्याचबरोबर सिनेमांवर चर्चा, आॅस्कर मिळविलेल्या चित्रपटांची यादी, जगातील सर्वोत्तम २५० चित्रपटांची माहिती या व अशा अनेक गमती या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


याबरोबरच तुम्हाला तुम्ही आजपर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांची यादी इथे तयार करता येईल. म्हणजे तुम्हाला एखादा चित्रपट कोणाला बघायला सुचवायचा असेल तर आयत्या वेळची पळापळ नाही. या संकेतस्थळावर आपण केलेली यादी पाहिली की झालं. . एवढंच नाही तर आता इथे अनेक सिटकॉम्सबद्दलची सविस्तर माहिती आणि त्याचं रेटिंग्जही पाहायला मिळू शकतं.
खरंतर तुम्ही जर हार्ड कोअर मूव्ही बफ असाल ना तर हे संकेतस्थळ म्हणजे तुमच्यासाठी एक अमूल्य साठाच आहे! 


हिंदी, इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन, झेक अशा अनेक भाषेतील चित्रपटांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आणि आपली चित्रपटांबद्दल रु ची वाढविण्यासाठी इंटरनेट मुव्ही डाटाबेसला नक्की भेट द्या.
आणि वाचा http://www.imdb.com/

Web Title: Are the cinema insects?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.