आठ बजेतक आप हो सोते?
By admin | Published: April 26, 2017 05:48 PM2017-04-26T17:48:38+5:302017-04-26T17:48:38+5:30
लवकर उठत नसाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही!
Next
-ऑक्सिजन टीम
‘ आठ बजेतक जो सोते, बडे कहॉँ लोग ऐसे होते?’ असा सवाल हम साथ साथ साथ है नावाच्या सिनेमात करिश्मानं जगजाहीर विचारला होता सैफअलीला, आठवतंय?
एवढंच काय महाराष्ट्रातल्या एका जेष्ठ राजकीय नेत्यानं एका वयानं लहान असलेल्या नेत्यालाही जरा सकाळी लवकर उठत जा असा सल्ला दिला होता.
हे सारं महत्वाचं यासाठी की लवकर उठण्याची भारतीय फिलॉसॉफी आता जगभरातल्या कार्पोरेट वतरुळात स्वीकारली जात आहे.
यशस्वी उद्योगपतींच्या, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या उत्तम सवयी अशी यादी आजकाल वारंवार प्रसिद्ध होते. त्यात एक सवय हमखास दिसते.
लवकर उठण्याची.
जो तो सांगतो की, मी सूर्यदयापूर्वीच उठतो आणि दिवसाचा काही वेळ स्वतर्साठी राखून ठेवतो. त्यानं माझ्या यशाला हातभार लागतो.
आता हे वाचून आपल्याला प्रश्न पडतो की, लवकर उठण्यानं हे लोक कसे काय बुवा यशस्वी आणि श्रीमंत झाले? सगळ्यांच्या आधी ऑफिसला जावून बसत होते का?
तर तसं नाही!
लवकर उठलं की ते काय काय करतात याची एक झलक पाहिली तरी आपण काय करत नाही हे कळू शकेल.
1) मी लवकर उठलोय, उशीर झालेला नाही ही भावना फार महत्वाची असते. ती लवकर उठण्यानं स्वतर्त जागी होते. नाहीतर आपण कायमच उशीरा उठतो, धावपळ करतो. आपल्याला कायमच उशीर होतो आणि मग आपलं एकही काम धड होत नाही. त्यासाठी लवकर उठायचं.
2) व्यायाम आणि फुरसत
मनासारखं काम करायला, व्यायाम करायला, 5 मिनिटं शांत बसायला आपल्याकडे फुरसतच नसते. त्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. पंतप्रधान मोदी जर पहाटे उठून व्यायाम करण्याइतपत वेळ काढू शकत असतील तर आपण काय त्यांच्यापेक्षा जास्त बिझी नाही.
3) दिवसाचा मूड ठरतो
होतं काय उशीर झाला की आपली चिडचिड होते. त्यात खाणंपिणं धड होत नाही. मग आपला मूड जातो. एक काम त्यानं धड होत नाही. मग आपण चिडतो. भांडतो. इतरांशी खुसपट काढतो. सगळंच बिघडतं. आणि मग यश मिळण्याची शक्यता संपतच जाते. लवकर उठलो, वेळ हातात असला तर आपला मूड चांगला राहतो.
4) ट्राफिकची कटकट
मुद्दा छोटा वाटतो. पण हमखास आपल्याला त्रास देतो. आपण वेळेवर उठल्यानं आपण लवकर निघतो घरातून आणि मग आपण ट्राफिकमध्ये अडकत नाही. त्यामुळे पुढे उशीर होवून आपली महत्वाची कामं बिनसत नाही. आपण कायम लेटलतीफ म्हणून आपल्याला यश मिळत नाही हा स्वतर्वरचा रागही कमी होतो.
5)असे फायदे बरेच आहेत, पण त्यासाठी लवकर उठावं लागेल. यशस्वी माणसांच्या सवयीतून एक सवय एवढी आपण स्वीकारली तर काय सांगावं आपणही यशस्वी होवू.