तुम्ही स्मार्टफोन अॅडिक्ट आहात का? -ही टेस्ट तुमच्यासाठी!
By admin | Published: June 25, 2016 05:41 PM2016-06-25T17:41:31+5:302016-06-25T17:48:08+5:30
मोठमोठे अभ्यास काहीही म्हणोत, सांगोत, फोन आपल्या शरीराचा एक अवयव झाला आहे.
Next
>- निशांत महाजन
मोठमोठे अभ्यास काहीही म्हणोत, सांगोत, फोन आपल्या शरीराचा एक अवयव झाला आहे. फोनशिवाय जगणं अशक्य. आता तर या फोनचे व्यसनी, अॅडिक्ट झाल्यानं मानसिक संतूलन बिघडत असल्याचे अहवाल जगभरात प्रसिद्ध होऊ लागलेत.
पण आपल्याला वाटतं, आपला काय संबंध यासाºयाशी.
आपल्याला काही फोनचं व्यसन लागलेलं नाही.
नसेल तर छानच, पण ही एक साधी टेस्ट घ्या.
आणि आपल्याला व्यसन आहे की नाही, हे तपासून पहा.
१) तुम्ही रात्री झोपता तेव्हा फोन तुमच्या उशाशीच असतो. किंवा अगदी जवळ असतो?
२) तुम्हाला रात्री जाग आली तर तुम्ही त्याही वेळेस फोन उचलून व्हॉट्सअॅप चेक करता?
३) तुमचा चार्जर सापडत नसला तर तुम्ही चिडता, अस्वस्थ सैरभैर होता?
४) दर मिण्टाला तुम्ही फोन हातात घेऊन नवीन काही अपडेट आहे का म्हणून व्हॉट्सअॅप चेक करता?
५) फोन पडला, हरवला असं वाटलं किंवा काही मिण्टं तो सापडला नाही, घरीच राहिला बाहेर जाताना तर तुम्ही पराकोटीचे अस्वस्थ होता. सारं सोडून आधी तो फोन शोधता?
६)ड्राईव्ह करत असताना कुणाचा फोन आला तर तो तुम्ही उचलता?
७)फोन तुम्ही टॉयलेटमध्येही सोबत नेता?
८)फोनचा पासवर्ड, पॅटर्न सतत बदलता?
९)कुणी तुमच्या फोनला हात लावला तर चिडता?
१०) फोनवर रोज गाणी ऐकता आणि मित्रांचा फोन आला तर बोलणं टाळता?
*****
या दहा प्रश्नांपैकी फक्त ३ प्रश्नांची उत्तरं जरी तुम्ही ( मनातल्या मनात) ‘हो’ अशी दिली असतील तर तुम्ही स्मार्टफोन अॅडिक्ट आहात असं समजा, आणि आपल्या या व्यसनाचं काय करायचं हे ठरवा.