तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:05 PM2018-11-15T18:05:30+5:302018-11-15T18:06:01+5:30

आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घरकामात अंग चोरणारी, जिममध्ये घाम गाळणारी आईवडिलांना कामात मदतच न करणारी तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

Are young children irresponsible? | तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

Next
ठळक मुद्देही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? 

- विकास बांबल

जिममध्ये मरेस्तोवर घाम गाळतात आणि घरकामात अंग चोरतात. हे असं ऐकलंय का तुम्ही? म्हणजे असा शेरा, राग वडीलधार्‍यांच्या तोंडून निघतोच आताशा! आज आपली पिढी तब्येतीबाबत  सजग झालेली दिसून येते. ती चांगलीच गोष्ट आहे. अगदी खेडय़ातील मुलंमुलीसुद्धा हल्ली राहणीमानाच्या बाबतीत चोखंदळ झालेली आहेत. छान दिसणं, नीटनेटकं राहणं हे चांगलंच आहे आणि प्रत्येकानं तसं असावंदेखील; परंतु या राहणीमानाच्या चोखंदळपणात आपली कर्तव्य, जबाबदार्‍या यांचा विसर पडता कामा नये.
छानछोकी आणि मोबाइल यात तरुण मुलंमुली असे गुरफटू लागलेत की त्यांना आईच्या कंबरेवरचा पाण्याचा हंडा किंवा वडिलांच्या हातातील पिठाचा डबापण दिसत नाही.
असं होतंय का?
घरकाम करणं, आईवडिलांसोबत राबणं आपल्याला कमीपणाचं वाटतं का? घरात इकडची काडी तिकडे न करणं हे योग्य आहे का?
एकीकडे आईवडील रक्ताचं पाणी करून, हाल अपेष्टा सहन करून, उसनवार पैसे घेऊन मुलांमुलींचं शिक्षण पूर्ण करतात. आपली जिंदगी बर्बाद झाली; पण आपल्या मुलांची व्हायला नको म्हणून माझी मुलं शिकली पाहिजेत असा हट्ट करतात. मला जे नाही मिळालं ते सर्व मी माझ्या  मुलांना मिळावं म्हणून राबतात; पण बर्‍याच मुलांना याची जाणीवच नसते.
काहीजण तर स्वच्छ सांगतात,   ‘मायबापाचं ते कर्तव्यच असतं, असं काय मोठं केलं!’ 
मात्र त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना आपली कर्तव्य आपण विसरतोय का, याचा विचार कुणी करायचा? काही मुलं तर बापाला नुसता भाजीवरील भाकर समजतात. चारचौघात बसलेले असले की बापाच्या नावाने एकमेकांना हाक मारतील, चेष्टा करतील. कट्टय़ावर तर बाप हा वाटेल तसा छळला जातो, हातावर तंबाखू मळावा तसा चोळला जातो, मळला जातो.
कालपरवा मी कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. जातांना वाटेत एक आलिशान जीम दिसलं. मुलं व्यायाम करत होती. सायंकाळी जेव्हा घरी आलो तेव्हा  त्याच भागातल्या स्त्रिया हातपंपावरून पाणी भरताना दिसल्या. त्यांची मुलं समोरच्याच मैदानात खेळत होती. कुणी चौकात गप्पागोष्टी करत होती.
आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घर कामात थोडाही हातभार न लावणारी, ही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हणतात,

असेल कुस्तीमाजी बरवा 
परि जो प्रसंगी कामी न यावा 
तो मल्ल म्हणोनि गौरवावा 
कोणत्या न्याये ?? 

कपडय़ास न पडावी वळी 7
म्हणोनि दुरूनीच सांभाळी 
कामे करिती माणसे सगळी 7
परी तो जागचा हालेना 

हाते घेवोनि दंड मारणे 
त्याहुनि उत्तम पाणी ओढने 
दळणे, फोडणे, जमीन खोदणे
आरोग्यदायी..

हे सारं तरुण मुलांना खरंच कळत नसेल का?


 

Web Title: Are young children irresponsible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.