कृत्रिम बुद्धिमत्ता

By admin | Published: June 21, 2016 08:32 AM2016-06-21T08:32:39+5:302016-06-21T08:42:29+5:30

५० वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या. माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले.

Artificial intelligence | कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम बुद्धिमत्ता

Next

- गजानन दिवाण

तुम्हाला माहिती आहे काही यासंदर्भात,
हे वाचा..


५० वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या. माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले. काही वर्षांपर्यंत मेंदूचे काम तेवढे बाकी होते. आता तेही जवळपास केले जात आहे. वातावरण, त्यावेळच्या किंवा आधीच्या घडामोडी, परिस्थिती या साऱ्या गोष्टीचा परिणाम एकवेळ माणसाच्या मेंदूवर होऊ शकतो. या यंत्रावर तसा कुठलाही परिणाम होणार नाही. 
तो होईल तरी कसा?
पण या यंत्रांकडे बुद्धिमत्ता आली तर? 
सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावर जगभरात चिंतन सुरू आहे. सगळ्याच गोष्टी यंत्राच्या सहाय्याने होत गेल्या तर मग माणसाचा उपयोग तो काय? 
त्याची खरंच गरज राहील काय?
विख्यात प्रोग्रामर्स, तत्वज्ञ आणि उद्योजकांना याबाबत काय वाटतं? 
याचा हा आढावा...

.......
सॅम अल्तमन
कृत्रिम बद्धिमत्तेचा विकास हाच अल्तमनचा अभ्यासाचा विषय आहे. काही मोजक्या लोकांना सध्या या कृत्रिम बद्धिमत्तेचा लाभ घेता येतो. तो सर्वांना मिळायला हवा, यासाठी अल्तमन झटत आहे. ३० वर्षीय कॉम्प्यूटर प्रोग्रामर असलेला अल्तमन स्टार्टअप इन्क्युबेटर वाय कॉम्बिनेटरचा अध्यक्ष आहे. या तंत्रज्ञानामुळे माणसाची बुद्धिमता काही दशकांनी पुढे नेता येईल. मात्र ते काही लोकांसाठी न राहता सर्वांनाच उपलब्ध व्हायला हवे, असे तो म्हणतो. 
.....

निक बोस्ट्रोम 
आॅक्सफोर्ड फ्यूचर अ‍ॅण्ड ह्युमॅनिटी इन्स्टीट्यूटचा संचालक असलेल्या ४२ वर्षीय निकने आपल्या ‘२०१४ बुक सुपरइंटेलिजन्स’ पुस्तकात कृत्रिम बद्धिमत्तेचा मानवजातीला प्रचंड धोका असल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘या बुद्धिमत्तेमुळे आर्थिक प्रगती होईल. तंत्रज्ञानदखील कुठल्या कुठे पोहचेल. मात्र त्याचा उपयोग करून घेण्यासाठी कोणी माणूस शिल्लक राहणार नाही. म्हणजेच मुलांशिवाय डिस्नेलॅण्ड असा प्रकार होईल.’
.........
बिल गेट्स
मायक्रोकॉफ्टचे सहसंस्थापक ६० वर्षीय बिल गेट्स म्हणतात, ‘सर्वत्र कमी भासणाऱ्या मजुरांची ती योग्य रिप्लेसमेंट असेल. हे तंत्रज्ञान योग्यच आहे. त्याचा वापर फक्त सकारात्मक विचारातून व्हायला हवा. आगामी काही दशकांत हे तंत्रज्ञान सर्वत्र दिसेल तेव्हा चिंताही वाढलेली असेल.’ 
..........
स्टीफन हॉकींग
सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि कृष्णविवर भौतिकशास्त्र प्रणेते स्टीफन यांना हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचे वाटते. या माध्यमातून युद्ध, रोगराई आणि गरिबीवर मात करता येईल. यामुळे आयुष्याला एक प्रचंड गती येईल. आर्थिक बाजार, मानवी संशोधन, शस्त्रास्त्रांचा विकास समजण्यापलिकडे झालेला असेल. यातील धोके कसे टाळायचे हे जर आम्ही समजून नाही घेतले तर मानवी इतिहासातील तो शेवटचा इव्हेंट असेल, असा इशाराही ते देतात.
................

मिशीयो काकू
बेस्टसेलर लेखक आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ ६९ वर्षीय काकू यांच्या मते या हा शतकातील अडचणींचा शेवट असेल. 
...............

रे कर्झवेल
गुगलमधील अभियांत्रिकी विभागाचे संचालक ६८ वर्षीय रे यांच्या मते २०२९पर्यंत आपण हे यश मिळविलेले असेल. रोगराई आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी याची मोठी मदत होईल. 

...............
इलोन मस्क
टेस्टा मोटर्सचा सीईओ आणि ४४ वर्षीय उद्योजक इलोन म्हणतो, हा अनुभवातून घेतलेला सर्वात मोठा धोका असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण काही वेडेपणाचे पाऊल तर उचलत नाही ना याचाही विचार करायला हवा. अर्थात याचा वापर चांगल्या हेतूतूनच व्हायला हवा. 
............
 

Web Title: Artificial intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.