चौकस, बोलकी, प्रसन्न ‘कला’ तेजीत
By admin | Published: July 2, 2015 03:43 PM2015-07-02T15:43:39+5:302015-07-02T15:43:39+5:30
चौकस, ग्राहकाभिमुख कौशल्य आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेल्या मनुष्यबळाचा शोध सुरू झाला. आणि आर्ट्सवाल्यांना एकदम सुगी दिसायला लागली..
Next
वर्षा माळवदे
भारतीय बाजारपेठ बदलते आहे. जाहिरात, मार्केटिंग, वितरण व्यवस्था, विक्री व्यवस्था या सा-या आमूलाग्र बदललेल्या क्षेत्रत एकाएकी बोलक्या, चौकस, ग्राहकाभिमुख कौशल्य आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेल्या मनुष्यबळाचा शोध सुरू झाला. आणि आर्ट्सवाल्यांना एकदम सुगी दिसायला लागली..
-----------------
साधारण 2क् ते 25 वर्षापूर्वीचीच गोष्ट! माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने कला शाखेत प्रवेश घ्यायचा म्हटलं की पालकांच्या कपाळाला आठय़ा पडत असत आणि ज्या विद्याथ्र्याच्या गुणांनी 8क् टक्क्यांपार ङोप घेतलेली असेल त्यांनी असा नुसता विचार जरी केला तरी घरीदारी रान उठत असे.
आणि पालकांना आपलं म्हणणं पटवून देण्यात ज्यांना यश मिळत असे त्यांचा हिरमोड करायला त्यांचे शाळेतले किंवा नव्याने येणारे महाविद्यालयातले शिक्षक हजर असत. यातून जर ते यशस्वीपणो जगले- तरले तर त्यांच्या वृत्तपत्रीय बातम्या होत.
गेल्या पाच- सहा वर्षामध्ये मात्र या स्थितीत अगदी लक्षणीय असा बदल दिसून येतो आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होणारे जास्तीत जास्त विद्यार्थी कला शाखेकडे विचारपूर्वक वळताना दिसत आहेत. किंबहुना त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या पालकांचा आणि समाजाचाही वाढता पाठिंबा दिसतो आहे. इतकेच नव्हे तर अकरावी- बारावीची दोन वर्षे विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा (हेतूपूर्वक) अभ्यास करून वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी कला शाखेत दाखल होणारे विद्यार्थीही आता संख्येने कमी नाहीत. आपल्याकडे म्हणूनच या नव्या ट्रेण्डचं कौतुक आहे.
अर्थात कला शाखेत प्रवेश घेण्याचा हा वाढता कल महाराष्ट्रात जरी नव्याने आढळून येत असला, तरी दिल्ली विद्यापीठ किंवा त्याला संलग्न महाविद्यालये आणि उत्तर भारतातील विद्यापीठांमध्ये हे चित्र फार पूर्वीपासूनच आकाराला आलं आहे. आर्ट्सला जाणा:यांचा ओढा तुलनेनं तिकडे जास्तच होता. पण आता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अगदी तरुण वयात मिळणारी अधिकारपदे आणि त्यांची सत्ता, पैसा आणि सन्मान यांचं आकर्षण आज विद्याथ्र्याना या प्रकारच्या करिअरचा गंभीरपणो विचार करायला भाग पाडत आहे. अशा परिस्थितीत विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अकरावी- बारावीची तयारी करत आणि अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखांच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासाच्या ओङयाखाली पिचून जायचं; अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन त्यांचे व्यस्त पाठय़क्रम सांभाळत स्पर्धा परीक्षांची तयारी करणो हे विद्याथ्र्यासाठी अशक्य ठरते. आणि या पदव्या प्राप्त करून स्पर्धा परीक्षा देईर्पयत या तरुणांची स्पर्धा परीक्षांसाठीची वयोमर्यादा उलटून तरी जाते किंवा त्यांचा इरादा तरी बदलतो. त्यापेक्षा तुलनेने कमी व्यस्त अशा कला शाखेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हा चांगला पर्याय असल्याचं आता विद्याथ्र्याना पटू लागलं आहे.
महाराष्ट्रात बदल होतो आहे, तो मुळात या संधीकडे पाहण्याच्या दृष्टीतला बदल आहे. स्वतंत्र (?) बाण्याच्या मराठी माणसाने मानसिक पातळीवर कला शाखेची सांगड नेहमीच बाबूगिरीशी घातली. त्यामुळे इतर काही जमत नाही म्हणून कला शाखा असा संपूर्ण महाराष्ट्रीय समाजाचा आजवर रोख राहिला. ‘सोनार- शिंपी- कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा’ असं सांगत आपला समाज कौशल्याधारित शिक्षणापासूनही दूर राहिला. संपूर्ण देशाचं वित्तीय केंद्र ठरलेल्या मुंबईने वाणिज्य शाखेच्या विकासाला सुपीक जमीन पुरवली. त्यामुळे आजही मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारित येणा:या इतर कोणत्याही शाखेतील विद्याथ्र्यापेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्याथ्र्याची संख्या अधिक आहे. मात्र गुजराथी समाजाचा वित्तीय बाजारावरचा वरचष्मा आणि दाक्षिणात्य समाजाचं स्थलांतर यातून या क्षेत्रत मुसंडी मारायलाही मराठी समाजाला वेळच लागला. चित्रकला किंवा तिच्या उपयोजित शाखा, नाटक-सिनेमा किंवा संबंधित तंत्रे यांना आपल्या समाजाने ‘भिकेचे डोहाळे’ म्हणून बाजूला लोटले. तुलनेने डॉक्टर - इंजिनिअर या व्यवसायांना मात्र आपण नको तितके महत्त्व दिले आणि कुत्र्याच्या छत्र्यांसारखी अभियांत्रिकी महाविद्यालये राज्यात सर्वत्र उभी राहिली.
आज मात्र चित्र पुरते पालटले आहे. संख्येने अपुरी असलेली वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यकीय शिक्षणाचा गगनचुंबी खर्च, शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी उजाडलेली वयाची तिशी आणि स्वत:च्या व्यवसायासाठी लागणारे प्रचंड भांडवल यामुळे या करिअरचे वलय कमी होते आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त या न्यायाने त्याचीही बाजारातली आणि समाजातली किंमत ओसरली आहे. अतिरिक्त संख्येने असलेले वाणिज्य शाखेचे पदवीधर पाहता त्याही शाखेकडचा ओढा कमी होणं नैसर्गिकच आहे. या सगळ्याला जागतिकीकरणाने झालेले बदलही मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहेत. आणि याच बदलांमध्ये कला शाखेच्या वाढत्या महत्त्वाचे आणि मागणीचे गमक दडले आहे.
कलाशाखेचे महत्त्व
अचानक का वाढतेय?
1) जागतिकीकरणाने भारताची प्रचंड मोठी बाजारपेठ सगळ्या जगाला खुली झाली आणि जगाच्या कानाकोप:यातून प्रचंड मोठय़ा प्रमाणात वस्तू आणि सेवांचा ओघ भारताकडे आला. तो पचवण्यासाठी भारतीय बाजारपेठ बदलली. जाहिरात, मार्केटिंग, वितरण व्यवस्था, विक्र ी व्यवस्था या आमूलाग्र बदलल्या आणि ग्राहकाभिमुख कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या मनुष्यबळाचा शोध सुरू झाला.
2) आपल्या विषयात प्रावीण्य मिळवून देणा:या पण प्रसंगी मुखदुर्बलतेकडे झुकतील असे पदवीधर निर्माण करणा:या विज्ञान आणि वाणिज्य शाखेतल्या अभ्यासक्रमांवर प्रश्नचिन्ह उभी राहू लागली. इतक्या टोकाचा विचार केला नाही तरी अतिशय कठोर अशी तर्कशुद्ध विचारक्षमता निर्माण करणा:या या दोन्ही शाखांच्या अभ्यासक्रमांनी ते विचार लिखित किंवा मौखिक स्वरूपात व्यक्त करण्याची क्षमता विद्याथ्र्यामध्ये विकसित करण्यावर कधीच भर दिलेला नाही.
3) तुलनेने प्रत्येक वेळी (कदाचित) बौद्धिक क्षमतांमुळे नसेल पण अभ्यासक्र मात आहे म्हणून नकळत प्राप्त झालेल्या संवाद आणि भाषाकौशल्याचा फायदा मात्र कला शाखेच्या विद्याथ्र्याना होताना दिसू लागला.
4) अतिशय वेगाने विकसित होणा:या आणि समाजमान्य होणा:या प्रसारमाध्यमांची गरज भागवायला कदाचित कमी गुणांनी कला शाखेला प्रवेश घेतलेले आणि बौद्धिक मर्यादा असलेले विद्यार्थी कमी पडू लागले; आणि त्यांची जागा भरायला अधिक गुण मिळवणारे हुशार विद्यार्थी सरसावले.
5) कलाशाखेत जाऊन समाजमान्यता आणि पैसा दोन्ही मिळत नाही हा समज हळूहळू दूर होऊ लागला. अर्थशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र या सर्व सामाजिक शास्त्रंना आणि भाषांना जागतिकीकरणाने बाजारपेठ आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि विज्ञान आणि वाणिज्य शाखेत साचून राहिलेला हुशार विद्याथ्र्याचा लोंढा कला शाखेकडे वळू लागला.
6) याच काळात सरकारनेही शिक्षणावरचा खर्च फार मोठय़ा प्रमाणात वाढवलेला नाही. त्यामुळे आर्थिक क्षमता असलेल्या वर्गाने पूर्वीप्रमाणो पदव्युत्तर पातळीवर मुलांना शिक्षणासाठी देशाबाहेर न पाठवता अगदी पदवीपूर्व शिक्षणासाठी परदेशी पाठवायला सुरु वात केली आहे. यात विशेषकरून विज्ञान शिक्षणाचा समावेश आहे आणि ही संख्या छोटी नाही. याचाच अर्थ असा की, भारतात राहणा:या हुशार मुलांनी नव्याने उदयाला येणा:या आणि कला शाखेतून प्रवेशद्वार असणा:या करिअरची निवड करायला सुरु वात केली आहे.
शेवटी प्रश्न एकच - इतर शाखांकडून कला शाखेकडे वळणा:या या मुलांमध्ये उच्च उत्पन्न गटातले विद्यार्थी आणि सामाजिकदृष्टय़ा उच्चवर्णीय मानल्या जाणा:या गटातल्या विद्याथ्र्याचाच समावेश का आहे?
-
(लेखिका मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयात अर्थशास्त्रच्या प्राध्यापक आहेत आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून कला शाखेत शिकणा:या अनेक विद्याथ्र्याच्या मार्गदर्शक दोस्तही आहेत.)
आर्ट्सला प्रवेश?- हवेत फक्त 105 टक्के!
परंतु उत्तरेकडच्या आर्ट्सच्या विद्यापीठांमधे आर्ट्सला प्रवेश ही गेली अनेक वर्षे अत्यंत स्पर्धात्मक अभिमानाची गोष्ट आहे. यावर्षी तर दिल्ली विद्यापीठात कला शाखेच्या प्रवेशाची गुणवत्ता यादी 1क्5 टक्क्यांर्पयत जाऊन पोचली आहे. आयआयटी कानपूर, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था किंवा नव्याने निर्माण झालेल्या विज्ञान संशोधन संस्था वगळल्या, तर या परिसरात विज्ञान शिक्षण- संशोधनाला चालना देणा:या फारशा संस्था नाहीत. व्यापार-उदिमाचेही केंद्र पश्चिम भारतात असल्याने वाणिज्य शाखेचा विकासही त्या परिसरात संभवत नाही. तुलनेने शासकीय धोरणांची आखणी, अंमलबजावणी आणि कायदा सुव्यवस्था आणि न्याय या विषयांचा उगम आणि विकास मात्र या परिसरात होत राहिला आहे. भारतातील विद्यार्थी चळवळींचा, राजकारण आणि समाजकारणाचा विकास याच परिसरात मोठय़ा प्रमाणात केंद्रित झाला आहे. पूर्व भारताच्या विशेषत: पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा या राज्यांच्या सांकृतिक आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमीचा विचार केला आणि त्यांच्या विकासातील व्यापार-उदीमाचं स्थान पाहिलं तर तिथला कला शाखेकडे आणि वाणिज्य विषयाकडे असलेला कल समजून घेता येतो. दक्षिण भारताच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात या तिन्ही शाखांच्या विकासाला समान महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून या राज्यांमध्ये या तिन्ही शाखांकडे त्या-त्या राज्याच्या आर्थिक गरजांनुसार झुकलेला कल दिसतो. उदा. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये विज्ञान किंवा केरळमध्ये वाणिज्य या शाखांकडे अधिक ओढा दिसतो.