बाजे रे.. ढोल बाजे..

By Admin | Published: September 30, 2016 10:43 AM2016-09-30T10:43:30+5:302016-09-30T10:43:30+5:30

उद्यापासून नवरात्र. अक्षय उमेद आणि नवं घडवण्याची आस यांचा ताल धरता येईल आपल्यालाही आपल्या जगण्यात?

Baaje Re .. Dhol Baaj .. | बाजे रे.. ढोल बाजे..

बाजे रे.. ढोल बाजे..

googlenewsNext


- ऑक्सीजन टीम

साऱ्या तक्रारी, सारं नैराश्य आणि त्या नैराश्यातले काळसर तवंग मनातून पुसून काढावेत, उमेदीचं बीज घटात घालून ते फुलू द्यावं, वाढू द्यावं.. म्हणून करायची शक्तीची उपासना..सृजनाची आराधना.. 
उद्यापासून त्या आराधनेला प्रारंभ होणार..
आपल्या मनघटात आनंदाचं बी आपणच पेरावं..
आशेचा अखंड दीप उजळवावा..
आणि ती उमेद, तो आनंद वाढीस लावून
आपल्या भोवती आपणच बांधलेल्या सीमा ओलांडाव्यात..
पराक्रमाचे उत्तुंग सीमोल्लंघन करत
‘विजयाचं’ तोरण लावावं आयुष्याला..
म्हणून तर येतात दरवर्षी हे नऊ दिवस आपल्याला भेटायला..
**
उद्या.. तोच दिवस.
नवरात्राचा प्रारंभ.
उद्यापासून नऊ दिवस घरोघर शक्तीची उपासना होईल..
सर्वत्र गरबा-दांडियाच्या उत्साहाला उधाण येईल..
ज्यांना शक्य ते नऊ रात्री
गरब्यावर अखंड थिरकतील..
ताल धरतील..
नाचतील भान हरपून..
गरब्याच्या गिरक्यांवर असे काही 
आनंदानं भरभरून जगतील की,
जशी काही परत येणारच नाहीये ही रात्र...
आपलं शिक्षण, आपली नोकरी, 
आपली सामाजिक प्रतिष्ठा 
आणि मनावर चढवलेली जबाबदारीची पुटं 
उतरवून ठेवतील काही काळ..
आणि साऱ्यांच्या तालाशी ताल जुळवत,
नाचताना स्वत:लाही विसरत जातील..
आनंदानं बेभान नाचण्याचे आणि
जगण्याच्या रंगात रंगून जाण्याचे हे दिवस..
या नऊ दिवसातला प्रत्येक दिवस
अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे जगतात..
कुणी श्रद्धा म्हणून, तर कुणी आनंद म्हणून साजरा करतात..
जगून घेतात.. काही मोकळे श्वास..
***
कुणी डाएट करतं.. 
कुणी पूर्णत: शाकाहार स्वीकारतं..
कुणी कुणी तर आताशा
व्हॉट्स-फेसबुक बंद करण्याचा आधुनिक उपवासही करतं..
कुणी बिना चप्पल चालतं..
कुणी वाहन उपवास करतं..
आणि कुणी कुणी तर 
नऊही दिवस दांडियाला जायचंच
म्हणून घरी भांडणही करतं..
जगण्याचे असे अनेक रंग दाखवणारे हे नऊ-रात्र..
त्यांचा उद्यापासून प्रारंभ..
जगण्यात उमेदीचा दिवा अक्षय उजळता राहो
आणि आपल्याच सीमा ओलांडून आपण
नवं काहीतरी घडवण्याचं सीमोल्लंघन करावं..
म्हणून अनेक शुभेच्छा!

Web Title: Baaje Re .. Dhol Baaj ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.