बहाद्दर!

By admin | Published: September 22, 2016 06:50 PM2016-09-22T18:50:16+5:302016-09-22T18:50:16+5:30

पॅरालिम्पिकमध्ये भारताचा झेंडा सन्मानानं फडकवणार्‍या जिद्दीला एक सलाम!

Bahadar! | बहाद्दर!

बहाद्दर!

Next
>पॅरालिम्पिकमध्ये भारताचा झेंडा सन्मानानं फडकवणार्‍या
जिद्दीला एक सलाम!
 
 
त्यांच्यामुळे किमान दोनदा तरी 
जनगणमन हे 
आपलं
राष्ट्रगीत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या 
स्टेडिअममध्ये वाजलं!
त्य क्षणी उपस्थित सार्‍या प्रेक्षकांनी
आपल्या राष्ट्रगीताचा सन्मान केला!
आपण सर्वोत्तम ठरलो त्याक्षणी
ते केवळ त्यांच्यामुळे!
त्यांचं शरीर अपंग होतं,
पण जिद्द, मेहनत आणि 
देशासाठी पदक कमवून आणण्याचं स्वप्न?
ते सारं बुलंद होतं, इतकं बुलंद 
आणि धडधाकट की,
त्या स्वप्नासाठी त्यांनी सार्‍या जगाला मात दिली!
आज त्या बहाद्दर खेळाडूंची ही खास भेट.
**
रिओतली पॅरालिम्पिक स्पर्धा.
भारतानं २ सुवर्ण, १ रौप्य आणि 
एका कांस्य पदकाची कमाई केली. 
जिथं ऑलिम्पिकमध्ये भारत 
एकेका पदकासाठी आसूसला
 तिथं पॅरालिम्पिकची ही ४ पदकं 
म्हणजे खरंतर भरभक्कम कमाईच 
म्हणायला हवी!
केवळ शारीरिकदृट्या अपंग म्हणून
 या पदकांचं मोल कमी होत नाही, 
उलट ते वाढतं.
कारण, ज्या जिद्दीनं, मेहनतीनं 
आणि संपूर्ण सर्मपणानं 
हे खेळाडू मैदानावर उतरले 
आणि त्यांनी सर्वोच्च कामगिरी केली,
तिची कुणाशीच 
आणि कशाशीच तुलना होऊ शकत नाही.
उलट जिद्दीनं अशक्य 
अवघड वाटेवरुन चालतानाही 
प्रयत्नांची कास सोडली नाही 
तर यश कसं पायाशी लोळण घेतं,
याची ही एक गोष्ट आहे.
जगण्याची, जिंकण्याची गोष्ट!

Web Title: Bahadar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.