बेधडक भन्नाट भंगार भंकस
By admin | Published: December 25, 2014 07:41 PM2014-12-25T19:41:54+5:302014-12-25T19:41:54+5:30
बेधडक भन्नाट भंगार भंकस ........हे यंदाच्या थर्टीफस्ट सेलिब्रेशनचं नवं लॉजिक आहे. ते ज्याला कळलं, त्याचं सेलिब्रेशन हमखास यादगार तर ठरेलच, पण इतरांपेक्षा वेगळंही असेल.
Next
हे यंदाच्या थर्टीफस्ट सेलिब्रेशनचं नवं लॉजिक आहे. ते ज्याला कळलं, त्याचं सेलिब्रेशन हमखास यादगार तर ठरेलच, पण इतरांपेक्षा वेगळंही असेल.
ए प्लीज ठरवा ना कायतरी,काय करायचं यंदा सेलिब्रेशनचं? काहीतरी मस्त, एकदम कडक,
एकदम ‘हटके’ प्लॅन करू. सोचो.सोचो.सोचो यार. कुछ तो सोचो.’’
‘‘काय सोचो, सोचो. आपलं सेलिब्रेशन म्हणजे नेहमीच्याच पाटर्य़ा. कुणाचा बर्थडे असला तरी तेच,
परीक्षा संपली तरी तेच. इंडियानं मॅच जिंकली तरी तेच. आणि ‘ती’ हो, म्हणाली म्हणून कट्टय़ावर वसूल करण्याच्या पार्टीतही तेच.हॉटेलात जायचं, हादडायचं. बाईक मारायच्या नाहीतर कुणाच्या तरी घरी गाणीबिणी लावून तुफान नाचायचं. नाहीतर आहेच ‘पिणंबिणं’ हे सगळं जाम बोअर होतं आता यार, कुछ हटके सोचो. सेलिब्रेशन को भी लगना चाहिए की, सेलिब्रेशन हो रहा है.’’
‘‘पण म्हणजे काय? हटके म्हणजे काय? एकदम यादगार होईल सेलिब्रेशन, नव्या वर्षाची
धडाक्यात जबरदस्त सुरुवात होईल असं काहीतरी सुचलं पाहिजे यार. समथिंग फॅण्टाब्युलसली
डिफरण्ट मंगता है. पण म्हणजे काय?’’
हे ‘असेच’ वाद चाललेत ना, तुमच्याही ग्रुपमधे? काय म्हणता काय ठरत नाही, काहीच ग्रेट्टबिट्ट सुचत नाही. वरी नॉट. सध्या यंगस्टर्सच्या डोक्यात शिजत असलेल्या खुपिया प्लॅन्सच्या काही खास खबरा आमच्या हाती लागलेल्या आहेत. ते प्लॅन्स कॉपी मारा किंवा नका मारू. पण या आयडिया तुम्हाला खास तुमच्या सेलिब्रेशनची लाइन सापडून द्यायला ‘इन्स्पायर’ तरी नक्की करतील.
त्यासाठी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही जितकं विअर्ड, तरीही साधंसोपं डोकं चालवाल
तितकं हे प्लॅनिंग भन्नाट ठरेल. सो, एन्जॉय, लेटस द सेलिब्रेशन स्टार्टस.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com