दाढी मिशिवाली स्टाईल

By admin | Published: September 1, 2016 12:51 PM2016-09-01T12:51:56+5:302016-09-01T12:51:56+5:30

चिकणा लूक आता तरुण मुलांच्या जगात फार चर्चेत नाही, फॅशन आहे ती स्टायलिश किरकोळ दाढीची आणि मॅनली दिसण्याची

Bearded mishivali style | दाढी मिशिवाली स्टाईल

दाढी मिशिवाली स्टाईल

Next
>- सतीश डोंगरे
(सतीश लोकमतच्या नाशिक आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)
 
‘क्लीन शेव लूक’ ही एकेकाळी केवढी मोठी क्रेझ होती.
एकदम चॉकलेट हिरोटाईप्स चिकणा चकाचक चेहरा.
मात्र त्यासाठी केवढा आटापिटा तरुण मुलांना करावा लागत असे.
आता नव्या फॅशनच्या ट्रेण्डमध्ये त्या आट्यापिट्यातून तरुण मंडळींची सुटका झाली आहे. कारण सध्या जमाना ‘दाढी-मिशांचा आहे. चिकण्या सफाचट लूकपेक्षा दाढी-मिशीचा लूक अनेक तरुणांना जास्त भावतो आहे. सिरीअल्स, सिनेमातही त्या लूकची चलती दिसते. शिवाय या नव्या लूकमुळे कॉन्फिडन्स लेव्हलही वाढते असं अनेकांना वाटतं. त्यामुळे सध्या यंगस्टरमध्ये या नव्या स्टाईलची चांगलीच क्रेझ आहे. त्यातच यंगस्टरचे आॅल टाइम फेव्हरेट असलेले काही हिरोही सध्या चिकण्या लूकऐवजी दाढीमुछवाल्या मर्दानी लूकमध्ये झळकत असल्यानं त्यांची स्टाईल फॉलो केली जाणार हे उघडच. म्हणून तर सध्या स्टबल फ्रेंच, सेमी फ्रेंच, फ्लाइ कट अशा विविध कटमधील दाढीसाठी कोरीव काम करून घ्यायला अनेकजण मेन्स सलून गाठत आहेत.
 
तुरळक दाढी अधिक इम्प्रेसिव्ह
दाढी ठेवण्याची फॅशन जरी रूढ होत असली तरी त्यात तुरळक दाढी ठेवण्याचीच फॅशन अधिक फॉलो केली जाते. कारण घनदाट दाढीने लूक बदलत असल्यानं तरुण तुरळक दाढी ठेवण्याला अधिक प्राधान्य देतात. शिवाय मुलीही हल्ली चिकणा चेहरा किंवा घनदाट दाढीपेक्षा या तुरळक दाढी लूकचंच कौतुक करतात असा काही कॉलेजतरुणांचाही समज आहे. त्यामुळेच हे तरुण या स्टाइलचे दिवाने झाले आहेत. जर इमरान हाशमी याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवला तर तुरळक दाढीचा अर्थ अधिक स्पष्ट होईल. प्रत्येक चित्रपटात तो तुरळक दाढीत झळकतो. अलीकडच्या काही चित्रपटांमध्ये हृतिक रोशन देखील याच लूकमध्ये झळकला आहे. 
जमाना बदल गया है !
तुम्हाला ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील आमीर खानचा लूक आठवतो काय? त्याच्या ‘पेच बिअर्ड’ दाढीने त्यावेळी अक्षरश: धूम उडवून दिली होती. पुढे ही स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली. आजही कित्येक तरुण पेच बियर्ड लूकमध्ये स्टाइल मारताना दिसतात. त्यानंतर ‘रा-वन’ चित्रपटातील अभिषेक बच्चन याचा ‘सेमी फ्रेंच बियर्ड’ लूकही तरुणांकडून मोठ्या प्रमाणात फॉलो केला गेला. अभिषेकच्या या स्टाइलचे केवळ यंगस्टरच दिवाने होते असे नाही, तर कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीदेखील या लूकमध्ये त्यानंतर बघावयास मिळत असत. आजही राहुल यांचा फ्रेंच कट दाढी हा लूक कायम आहे. अर्थात हा सर्व बदल काळानुरूप झाला आहे. स्मार्ट आणि स्टायलिश लूक असावा ही सगळ्यांचीच प्रामाणिक इच्छा असल्याने स्टायलिश बियर्ड लूकची चलती आहे. 
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये दाढीची क्रेझ
हेअर स्टायलिंग आणि बियर्ड केअरिंगची क्रेझ केवळ कॉलेज गोइंग यंगस्टरमध्येच आहे असे अजिबात नाही. खरं तर ही स्टार कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांकडून अधिक प्रमाणात फॉलो केली जात आहे. बिअर्ड कटमुळे स्पोर्टी लूक मिळत असल्यानेच प्रत्येकजण दाढी-मिशांमध्ये स्वत:ला मिरवताना बघावयास मिळत आहे. शिवाय या लूकमुळे कॉन्फिडेंस लेव्हल वाढल्याचा फील आणि मॅच्युअर्ड लूक मिळत असल्याने कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ही स्टाइल सर्वाधिक फॉलो केली जात आहे. 
...अशी ठेवा दाढी
* दाढी-मुछचा जरी जमाना असला तरी, त्यात तंत्रशुद्धपणा असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण चेहऱ्याला साजेशी दाढी असली तरच तुमचा लूक खुलून दिसेल.
* जसे की, तुमचा चेहरा लांब असेल तर फ्रेंच आणि सेमी फ्रेंच कट बिअर्ड स्टाइल ही अधिक आकर्षक दिसेल. 
* गोल चेहऱ्याच्या लोकांनी ‘प्लाय आणि बिअर्ड’ कट ठेवायला हवा, 
तर मोठ्या किंवा रुंद चेहऱ्याच्या लोकांनी ‘स्टबल’ स्टाइलला प्राधान्य द्यायला हवे. 
* या स्ंगळ्यांसाठी ‘स्पाय हेअर कट’ अधिक आकर्षक दिसतो. दुसऱ्या हेअर कटमध्येदेखील ही स्टाइल अडॉप्ट करता येऊ शकते.

Web Title: Bearded mishivali style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.